शरद यादव
शरद यादव (जुलै १, इ.स. १९४७- १२ जानेवारी, २०२३: गुरुग्राम, हरयाणा) हे जनता दल (संयुक्त) पक्षाचे विद्यमान पक्षाध्यक्ष व नेते होते
शरद यादव | |
लोकसभा सदस्य
| |
विद्यमान | |
पदग्रहण २००९ | |
मतदारसंघ | माधेपुरा |
---|---|
जन्म | १ जुलै, १९४७ हुशंगाबाद जिल्हा, मध्य प्रदेश |
मृत्यू | १२ जानेवारी, २०२३ गुरुग्राम, हरयाणा |
राजकीय पक्ष | जनता दल (संयुक्त) |
पत्नी | डॉ. रेखा यादव |
कारकीर्द
संपादनते सर्वप्रथम इ.स. १९७४ मध्ये जनता पक्षाचे उमेदवार म्हणून मध्य प्रदेश राज्यातील जबलपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतर त्यांनी इ.स. १९७७च्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्याच मतदारसंघातून विजय मिळवला. इ.स. १९८९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेश राज्यातील बदाऊन लोकसभा मतदारसंघातून विजय मिळाल्यानंतर ते विश्वनाथ प्रताप सिंह सरकारमध्ये इ.स. १९८९ ते इ.स. १९९० दरम्यान वस्त्रोद्योगमंत्री होते. त्यानंतर इ.स. १९९१,इ.स. १९९६,इ.स. १९९९ आणि इ.स. २००९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये ते बिहार राज्यातील माधेपुरा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. त्यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये नागरी विमानवाहतूकमंत्री आणि कामगारमंत्री म्हणून काम बघितले.तसेच इ.स. १९९७ मध्ये ते जनता दलाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. इ.स. २००४ ते इ.स. २००९ या काळात ते राज्यसभेचे सदस्य होते.
बाह्य दुवे
संपादन- अधिकृत संकेतस्थळ Archived 2013-10-08 at the Wayback Machine.