मे २९
दिनांक
<< | मे २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ |
८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ |
१५ | १६ | १७ | १८ | १९ | २० | २१ |
२२ | २३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ |
२९ | ३० | ३१ |
मे २९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १४९ वा किंवा लीप वर्षात १५० वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
संपादनसतरावे शतक
संपादन- १६६० - चार्ल्स दुसऱ्याची इंग्लंडच्या राजेपदी पुनर्स्थापना.
अठरावे शतक
संपादन- १७२७ - पीटर दुसरा रशियाच्या झारपदी.
- १७३३ - क्वेबेक सिटीमध्ये गोऱ्या नागरिकांना स्थानिक लोकांना गुलाम करण्याची मुभा देण्यात आली.
- १७९० - ऱ्होड आयलंडने अमेरिकेचे संविधान मान्य केले व तेरावे राज्य झाले.
एकोणविसावे शतक
संपादन- १८४८ - विस्कॉन्सिन अमेरिकेचे तिसावे राज्य झाले.
- १८६४ - मेक्सिकोच्या सम्राट मॅक्सिमिलियनने मेक्सिकोत पहिल्यांदा पदार्पण केले.
- १८६८ - सर्बियाच्या राजकुमार मायकेल ओब्रेनोविचची बेलग्रेडमध्ये हत्या.
विसावे शतक
संपादन- १९०३ - सर्बियाच्या राजा अलेक्झांडर ओब्रेनोविच व राणी ड्रागाची बेलग्रेडमध्ये क्रना रुका या संघटनेने हत्या केली.
- १९१४ - आर.एम.एस. एम्प्रेस ऑफ आयर्लंड या बोटीला जलसमाधी. १,०३४ मृत्युमुखी.
- १९५३ - एडमंड हिलरी व तेनसिंग नोर्गे यांनी एव्हरेस्ट सर केले.
- १९७२ - तेल अवीवच्या लॉड विमानतळावर जपानी अतिरेक्यांनी गोळीबार केला. २६ ठार.
- १९८५ - ब्रसेल्समध्ये लिवरपूलच्या पाठराख्यांनी केलेल्या दंग्यात ३९ प्रेक्षक ठार व शेकडो जखमी.
- १९८५ - पाय नसलेल्या स्टीव फोन्योने व्हिक्टोरिया, ब्रिटिश कोलंबिया येथे मॅरेथॉन शर्यत पूर्ण केली. ४२ कि.मी. अंतर पार करण्यास फॉन्योला चार महिने लागले.
- १९९० - बोरिस येल्त्सिन रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- १९९९ - सोळा वर्षांच्या लश्करी राजवटीनंतर ओलुसेगुन ओबासांजो नायजेरियाच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- १९९९ - स्पेस शटल डिस्कव्हरी पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला जोडले गेले.
एकविसावे शतक
संपादन- २००४ - सौदी अरेबियाच्या अल-खोबरमध्ये अतिरेक्यांच्या हल्ल्यात २२ ठार.
जन्म
संपादन- १६३० - चार्ल्स दुसरा, इंग्लंडचा राजा.
- १८६३ - आर्थर मोल्ड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८७४ - जी.के. चेस्टरटन, इंग्लिश लेखक.
- १९०५ - हिराबाई बडोदेकर, किराणा घराण्याच्या गायिका.
- १९१७ - जॉन एफ. केनेडी, अमेरिकेचा ३५वा राष्ट्राध्यक्ष.
- १९४० - फारूक लेखारी, पाकिस्तानी राष्ट्राध्यक्ष.
- १९५७ - टेड लेव्हाइन, अमेरिकन अभिनेता.
- १९५८ - ऍनेट बेनिंग, अमेरिकन अभिनेत्री.
मृत्यू
संपादन- १२५९ - क्रिस्टोफर पहिला, डेन्मार्कचा राजा.
- १४२५ - होंग-सी, चीनी सम्राट.
- १४५३ - कॉन्स्टन्टाईन नववा पॅलियोलोगस, शेवटचा बायझेंटाईन सम्राट.
- १५०० - बार्थोलोम्यू डायस, पोर्तुगीझ शोधक.
- १९७२ - पृथ्वीराज कपूर, हिंदी अभिनेता.
- १९८७ - चौधरी चरण सिंग (लोकदलाचे संस्थापक, भारताचे माजी पंतप्रधान)
- १९९४ - एरिक होनेकर, पूर्व जर्मनीचा राष्ट्राध्यक्ष.
- २०२० - अजित जोगी, छत्तीसगढचे पहिले मुख्यमंत्री.
प्रतिवार्षिक पालन
संपादन- लोकशाही दिन - नायजेरिया.
बाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर मे २९ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)