जॉन एफ. केनेडी
जॉन फिट्झजेराल्ड केनेडी (इंग्लिश: John Fitzgerald Kennedy ), टोपणनाव जॅक केनेडी (इंग्लिश: Jack Kennedy), (मे २९, इ.स. १९१७; ब्रुकलिन, मॅसॅच्युसेट्स, अमेरिका - नोव्हेंबर २२, इ.स. १९६३; डॅलस, टेक्सास, अमेरिका) हा अमेरिकेचे ३५वा राष्ट्राध्यक्ष होता. २० जानेवारी, इ.स. १९६१ रोजी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतलेल्या केनेडीची २२ नोव्हेंबर, इ.स. १९६३ रोजी पदावर असतानाच हत्या झाली.
जॉन एफ. केनेडी | |
सही |
---|
केनेडी दुसऱ्या महायुद्धात दक्षिण प्रशांत महासागर आघाडीवरील युद्धमोहिमेत प्रत्यक्ष लढला होता. त्यानंतर इ.स. १९४७ ते इ.स. १९५३ या कालखंडात त्याने अमेरिकन प्रतिनिधिगृहात मॅसेच्युसेट्सच्या ११व्या संसदीय जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले.
केनेडी याची २२ नोव्हेंबर, इ.स. १९६३ रोजी टेक्सासातील डॅलस शहरात हत्या झाली. खुल्या लिमोझिन गाडीतून जात असताना त्यांच्यावर हल्ला झाला होता.[१] टेक्सास प्रांताचे गव्हर्नर जॉन कॉनली गाडीच्या सुरुवातीच्या भागात केनेडी यांच्यासोबत बसले होते. कॉनली या हल्ल्यात जखमी झाले आणि जेडी टिपीट या पोलीस अधिकाऱ्याचा थोड्या वेळाने मृत्यू झाला होता. ली हार्वे ओस्वाल्ड नावाच्या व्यक्तीवर हत्या करण्याचा आरोप ठेवण्यात आला; मात्र खटल्याची सुनावणी होण्यागोदर अवघ्या दोनच दिवसांत जॅक रूबी नामक हल्लेखोराने गोळ्या झाडून त्याची हत्या केली. फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन, वॉरन आयोग व अमेरिकन प्रतिनिधिगृहाच्या हत्या-चौकशी समितीने एकटा ओस्वाल्डच हत्येस जबाबदार असल्याचा निष्कर्ष काढला. त्यासोबतच काही वादग्रस्त श्राव्य पुराव्यांवरून प्रतिनिधिगृहाच्या हत्या-चौकशी समितीने एखादे कारस्थान हत्येस कारणीभूत असल्याचीही शक्यता व्यक्त केली.
परिचय
संपादनजॉन एफ. केनेडी याचे वडील इंग्लंडमध्ये अमेरिकेचे वकील म्हणून काम करत होते. आपल्या पदवी शिक्षणानंतर जॉन याने वडिलांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केले. त्यानंतर नौदलात नोकरी व पुढे पत्रकारितेत काही काळ घालवून त्याने राजकारणात प्रवेश केला. इ.स. १९४७ ते इ.स. १९५३ पर्यंत अमेरिकन प्रतिनिधिगृहात तो सदस्य होते. इ.स. १९५३ साली त्याची सेनेटर म्हणून निवड झाली. इ.स. १९६१मधील अध्यक्षीय निवडणुकींत तो रिचर्ड निक्सन याच्या विरुद्ध उभा ठाकला व निवडणुकींत विजयी होऊन अमेरिकेचा ३५वा राष्ट्राध्यक्ष बनला.
अध्यक्षीय कारकीर्द
संपादनइ.स. १९६१ सालीच क्यूबाच्या विरोधात अमेरिकेने चालवलेल्या मोहिमेत त्याने खंबीर भूमिका घेऊन रशियाला क्यूबामधून क्षेपणास्त्रे मागे घ्यायला भाग पाडले. इ.स. १९६३मध्ये केनेडी प्रशासनाने रशिया व ब्रिटन यांच्याशी मर्यादित अण्वस्त्र चाचणीबंदी करार केला. अवकाश मोहिमा राबवण्यासाठी पुढाकार घेऊन पहिले अंतराळ-उड्डाण यशस्वी केले. चंद्रावर मानव पाठवण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रमही केनेडी प्रशासनाच्या कार्यकाळात आखला गेला. अमेरिकेत सामाजिक विषमतेबरोबरच आर्थिक विषमता दूर करण्यासाठी त्याने प्रयत्न केले. त्यासाठी आर्थिकदृष्ट्या मागास क्षेत्रात मदत देण्यासाठी केनेडी प्रशासनाने विधेयक मंजूर करून घेतले. वृद्धांची काळजी व कॄषिविकासासाठी त्याने एक कार्यक्रम अमेरिकन संसदेपुढे मांडला होता; पण तो संमत करून घेण्यात त्याला यश आले नाही. २२ नोव्हेंबर, इ.स. १९६३ रोजी पिस्तुलातून गोळ्या झाडून त्याची हत्या झाली.
प्रकाशित साहित्य
संपादन- व्हाय इंग्लंड स्लेप्ट
- प्रोफाइल्स इन करेज - या पुस्तकासाठी जॉन एफ. केनेडी यांना पुलित्झर पारितोषिक मिळाले होते.
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ केनेडी हत्येचं रहस्य उलगडणार का?. BBC News मराठी. 12-03-2018 रोजी पाहिले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांच्या हत्येसंबंधी 2,800 फाइल्स शुक्रवारी सार्वजनिकदृष्ट्या खुल्या केल्या आहेत. 52 वर्षांनंतर या मृत्यूभोवतीचं असलेलं गूढ उलगडणार का?
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- "व्हाइट हाउस संकेतस्थळावरील अधिकृत परिचय" (इंग्लिश भाषेत). 2011-06-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-09-25 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती फेब्रुवारी ५, २०१० (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)
- "जॉन एफ. केनेडी: अ रिसोर्स गाइड (जॉन एफ. केनेडी: संसाधनांची मार्गदर्शिका)" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |