विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे.
उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा.

राजकारण ही अनेक व्यक्तींनी एकत्रितरीत्या निर्णय घेण्याची प्रक्रिया आहे. प्रत्येक राष्ट्रामध्ये सत्ता मिळवण्यासाठी व देश चालविण्यासाठी अनेक नेते जे निर्णय घेतात व जे काम करतात त्यास राजकारण म्हणतात. राजकारण काही नुसतं निवडणुकांपुरतं मर्यादित नाही.राजकारणाचा अर्थ खूप व्यापक आहे. राजकारणाचा हेतू खूप मोठा आहे. दुर्दैवाने आपण तशा व्यापक अर्थाने त्याच्याकडे पाहत नाही[१].

राजकारणाची व्याख्यासंपादन करा

"आपला देश किंवा आपले राज्य कसं चाललं पाहिजे? कुठल्या तत्त्वांवर चाललं पाहिजे ? त्याचे आग्रह काय असले पाहिजेत ? राज्य कशासाठी चालवलं पाहिजे?याचा विचार मांडणं, त्या विचारांचा आग्रह धरणं आणि तो पूर्ण करण्यासाठी सत्तेत येणं, सत्तेत येण्यासाठी निवडणुका लढवणं, त्या जिंकणं, त्या जिंकण्यासाठी आपला विचार लोकांना पटवून देणं, व नंतर ते सत्यात उतरवणं" म्हणजे राजकारण[२].

''सामाजिक, सांस्कृतिक, भौगोलिक, आर्थिक घटकाच्या प्रभावाने विशिष्ट विचार अंगीकारुन विशिष्ट समाज, समुह, संस्था, भूभाग यावर सत्ता मिळविण्यासाठी व सत्ता, प्रभुत्व कायम ठेवण्यासाठी केलेली कृती म्हणजे राजकारण''

राजकारणाचा दृष्टिकोनसंपादन करा

राजकारण फक्त निवडणुकीपुरतं किंवा लढायांपुरतं मर्यादित नाही. राजकारणाला विचार असणं व त्या विचारांना मूल्यांचा आधार असणं व हेतू असणं आवश्यक आहे. राजकारणाला काही श्रद्धा व हेतू असणं आवश्यक आहे.असा विचार प्रत्येक नागरिकाने व राजकारण्यांनी ठेवणं गरजेचं आहे[३].

आपल्याला काय करायचंय हे आधी निश्चित करायला हवं,आपली दिशा पक्की असायला हवी.आपण सर्व नागरिकांनी सर्वांनी मिळून एक मोठ्या माणुसकीचं व जगात शांतता नांदेल,प्रत्येक हाताला काम मिळेल,शेतकरी सधन होईल असं काम करणं व ती व्यवस्था निर्माण करणं अत्यंत आवश्यक आहे तेव्हाच अखंड राष्ट्र सुखी झाले असे म्हणता येईल.[ संदर्भ हवा ]

राजकारण हे केवळ निवडणुकी पुरता मर्यादित नाही .

राज्यशास्त्र हे राजकारणाचा अभ्यास, शक्ती संपादन आणि उपयोगाची तपासणी करतो.[४]

संदर्भसंपादन करा

  1. ^ Hague, Rod; Harrop, Martin (2013-05-31). Comparative Government and Politics: An Introduction (इंग्रजी भाषेत). Palgrave Macmillan. ISBN 9781137317865.
  2. ^ "Politics". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2019-08-23.
  3. ^ Hague, Rod; Harrop, Martin (2013-05-31). Comparative Government and Politics: An Introduction (इंग्रजी भाषेत). Palgrave Macmillan. ISBN 9781137317865.
  4. ^ Safire, William (2008). Safire's Political Dictionary (इंग्रजी भाषेत). Oxford University Press. ISBN 9780195343342.