क्षेपणास्त्र
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
क्षेपणास्त्र म्हणजे स्वतःच चालू शकेल असे अस्त्र. परंतु हे अस्त्र क्षेपण करून म्हणजे फेकून अथवा अग्निबाणासारखे उडविलेही जाते. आपले इंधन घेऊन हवेतून उडत जाउन शत्रूवर हल्ला करू शकणाऱ्या अस्त्राला क्षेपणास्त्र म्हणता येते. एका सुुुधारीत तंत्र अशी याची ओळख आहे़
इतिहाससंपादन करा
अग्निबाण मानवाला ज्ञात असला तरी क्षेपणास्त्र हे प्रामुख्याने दुसऱ्या महायुद्धात जर्मनी ने बनवले असे दिसून येते. यातले व्ही१ व व्ही २ हे दोन उडते बॉंब म्हणून कुप्रसिद्ध होते.
तंत्रज्ञानसंपादन करा
लक्ष्यदर्शी किंवा गाईडेड क्षेपणास्त्रात अनेक भाग असतात.
- लक्ष्यदर्शी व्यवस्था - अशी क्षेपणास्त्रे उष्णतेचा माग काढत लक्ष्यावर जाऊन आदळतात. तसेच यासाठी इन्फारेड किरणांचा, लेसर किरण तसेच रेडियो लहरींचा उपयोग होतो.
- लक्ष्य बंधित - माहिती असलेल्या स्थानावर जाऊन धडकणारे. जसे की माहिती असलेले शत्रूचे शहर. यासाठी जी. पी. एस.चाही वापर केला जातो.
- उड्डाण व्यवस्था - ही व्यवस्था क्षेपणास्त्र नेमक्या ठिकाणावर नेण्यासाठी उपयोगी असते. काही वेळा प्रगत व्यवस्थेद्वारे क्षेपणास्त्र मार्ग बदलूनही हव्या त्या ठिकाणी डागले जाते.
- इंजिन - हे बहुदा अग्निबाणाच्या स्वरूपात असते. काही वेळा यासाठी जेट इंजिन वापरले जाते. जसे की क्रुझ क्षेपणास्त्र. अनेकदा क्षेपणास्त्रांना टप्पेदार इंजिने लावलेली असतात. जी निरनिराळ्या टप्प्यांवर काम झाले की गळून पडतात. ही वेग मिळवण्यासाठी उपयोगी पडतात.
- स्फोटके अथवा स्फोटकाग्र[१] - आदळल्यावर विध्वंस घडवण्यासाठी याचा उपयोग असतो.
कार्यानुसार प्रकार व वर्गिकरणसंपादन करा
क्षेपणास्त्राचे प्रकार व वर्गिकरण हे बहुदा त्यांच्या डागण्याच्या प्रकारावरून किंवा ते कोणते लक्ष्य भेदणार यावरून केले जाते.
भूपृष्ठ ते भूपृष्ठसंपादन करा
एखाद्या भूपृष्ठावरुन भूपृष्ठावरच[२] मारा करणारे क्षेपणास्त्र.
आकाश ते भूपृष्ठसंपादन करा
आकाशातून भूपृष्ठावरील एखाद्या ठिकाणी[३]मारा करणारे क्षेपणास्त्र.
आकाश ते आकाशसंपादन करा
आकाशातून आकाशातच[४] असणाऱ्या एखाद्या लक्ष्यावर मारा करणारे क्षेपणास्त्र.
प्रक्षिप्तक क्षेपणास्त्रसंपादन करा
प्रक्षिप्तक[५] क्षेपणास्त्र म्हणजे ते क्षेपणास्त्र जे डागल्यावर प्रक्षिप्तक गती[६] प्रकारच्या उड्डाणमार्गाचा वापर करते व आपले लक्ष्य भेदते..
क्रुझसंपादन करा
जहाज भेदीसंपादन करा
हार्पून (क्षेपणास्त्र) हे एक जहाजविरोधी क्षेपणास्त्र आहे.
रणगाडा भेदीसंपादन करा
विमान भेदीसंपादन करा
लहान पल्ल्याचे क्षेपणास्त्रसंपादन करा
भूपृष्ठावरुन आकाशातील कमी उंचीच्या लक्ष्यावर मारा करण्यास उपयुक्त असणारे क्षेपणास्त्र.
मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्रसंपादन करा
भूपृष्ठावरुन आकाशातील मध्यम उंचीच्या लक्ष्यावर मारा करण्यास उपयुक्त असणारे क्षेपणास्त्र.
=क्षेपणास्त्र भेदीसंपादन करा
उपग्रह भेदीसंपादन करा
आंतरखंडीय क्षेपणास्त्रेसंपादन करा
एका खंडातून दुसऱ्या खंडात मारा करू शकणाऱ्या आणि मोठा पल्ला असणाऱ्या क्षेपणास्त्रांना आंतरखंडीय क्षेपणास्त्रे असे म्हणतात.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |