मे ४
दिनांक
मे ४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १२४ वा किंवा लीप वर्षात १२५ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा
पंधरावे शतकसंपादन करा
- १४९३ - पोप अलेक्झांडर सहाव्याने नवे जग स्पेन व पोर्तुगालमध्ये वाटुन दिले.
- १४९४ - क्रिस्टोफर कोलंबस जमैकाला पोचला.
सतरावे शतकसंपादन करा
- १६२६ - डच शोधक पीटर मिनुइत न्यू ऍम्स्टरडॅम (आत्ताचे मॅनहॅटन) येथे पोचला.
अठरावे शतकसंपादन करा
- १७१५ - पहिली घडीची छत्री फ्रान्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध.
- १७९९ - श्रीरंगपट्टणमच्या लढाईत टिपू सुलतान ब्रिटिशांकडून मारला गेला.
एकोणिसावे शतकसंपादन करा
- १८१४ - नेपोलियन बोनापार्ट हद्दपारीची शिक्षा भोगण्यासाठी एल्बा येथे पोचला.
- १८५४ - भारतातील पहिले टपाल तिकिट प्रकाशित झाले.
- १८६९ - हाकोदातेची लढाई.
विसावे शतकसंपादन करा
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
- १९०४ - अमेरिकेने पनामा कालव्याचे काम सुरू केले.
- १९१० - कॅनडाचे आरमार, रॉयल केनेडियन नेव्हीची रचना.
- १९१२ - इटलीने ऱ्होड बेट बळकावले.
- १९२४ - १९२४ उन्हाळी ऑलिंपिक पॅरिसमध्ये सुरू.
- १९३० - ब्रिटीश पोलिसांनी महात्मा गांधींना अटक करून येरवडा तुरुंगात ठेवले.
- १९४२ - दुसरे महायुद्ध - कॉरल समुद्राची लढाई सुरू.
- १९४५ - दुसरे महायुद्ध - जर्मनीत हांबुर्ग जवळ नॉएनगामे कॉॅंसेन्ट्रेशल कॅम्पच्या बंदींची सुटका.
- १९४५ : पाच वर्षांच्या नाझी गुलामीनंतर डेन्मार्क पुन्हा स्वतंत्र.
- १९४९ - इटलीच्या तोरिनो शहराचा फुटबॉल संघ घेउन जाणारे विमान कोसळले. संपूर्ण संघ व ईतर मदतनीस ठार.
- १९५९ - पहिला ग्रॅमी पुरस्कार वितरण सोहळा साजरा झाला.
- १९६७: श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर नाशिक येथील मंदिरात जाऊन देवाची पूजा करण्याचा अधिकार सर्वांना आहे असा उच्च न्यायालयाचा निर्णय.
- १९७० - अमेरिकेतील केंट, ओहायो येथील केंट स्टेट युनिव्हर्सिटीत व्हियेतनाम युद्धाविरुद्ध निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांचा गोळीबार. ४ ठार, ९ जखमी.
- १९७९ - मार्गारेट थॅचर युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधानपदी.
- १९८९: सर्व पंचायत समित्यांमध्ये महिलांसाठी ३० टक्के जागा राखीव, अशी घोषणा पंतप्रधान राजीव गांधी यांनी केली.
- १९९० - लात्व्हियाने स्वतःला स्वतंत्र जाहीर केले.
- १९९२: संगीतकार भूपेन हजारिका यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला.
- १९९४ : गाझा पट्टी आणि येरिको या पॅलेस्टिनी भागाच्या स्वायत्ततेसाठी इस्राएली नेते यित्झाक राबिन आणि पॅलेस्टिनी नेते यासर अराफत यांच्यात शांती करार.
- १९९५: महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने बॉम्बे हे नाव बदलून मुंबई असे नामकरण करण्याचा निर्णय घेतला.
- १९९६ - होजे मारिया अझनार स्पेनच्या पंतप्रधानपदी.
- १९९६: जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताला ६ तर एन. कुंजुराणीदेवीला दोन रौप्यपदके मिळाली.
एकविसावे शतकसंपादन करा
- २००२ - नायजेरियाच्या ई.ए.एस. एरलाइन्सचे बी.ए.सी.१-११-५०० प्रकारचे विमान कानोहून निघाल्यावर कोसळले. १४८ ठार.
जन्मसंपादन करा
- १००८ - हेन्री पहिला, फ्रांसचा राजा.
- ११३१ - महात्मा बसवेश्वर, मध्यकालीन थोर समाजसुधारक.
- १६४९ - छत्रसाल बुंदेला, बुंदेलखंडचा राजा.
- १६५४ - कांग्क्सी, चीनी सम्राट.
- १७६७ - त्यागराज, भारतीय संगीतकार.
- १८२५: ब्रिटीश जीवशास्रज्ञ आणि विज्ञानकथा लेखक थॉमास हक्सले
- १८४७: धार्मिक आणि राष्ट्रीय मनोवृत्तीचे पुण्यातील एक नामांकित धन्वंतरी व लोकमान्य टिळकांचे स्नेही महर्षी विनायक रामचंद्र उर्फ अण्णासाहेब पटवर्धन
- १८४९: ज्योतिरिंद्रनाथ टागोर – थोर बंगाली साहित्यिक, नाटककार, संगीतकार, चित्रकार व संपादक, रविंद्रनाथ टागोर यांचे वडील बंधू, त्यांनी लोकमान्य टिळकांच्या गीतारहस्याचे बंगालीत भाषांतर केले
- १९२८ - होस्नी मुबारक, इजिप्तचा पंतप्रधान.
- १९२९ - ऑड्रे हेपबर्न, ब्रिटीश अभिनेत्री.
- १९३३: प्रख्यात मराठी कादंबरीकार बाबा कदम
- १९३४: भावगीत गायक अरुण दाते
- १९४०: इंग्लिश कादंबरीकार रॉबिन कुक
- १९४२: विज्ञान आणि तंत्रज्ञान सल्लगार सॅम पित्रोदा
- १९४३: भारतीय अर्थशास्त्रज्ञ प्रसांत पटनाईक
- १९४५: ज्येष्ठ पत्रकार एन. राम.
- १९५७ - पीटर स्लीप, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९६० - मार्टिन मॉक्सॉन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९७० - पॉल वाईझमन, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
- १९८१ - जॉक रूडॉल्फ, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९८३ - डॅनियल क्रिस्चियन, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू.
- १९५८ - रवी बोपारा, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९८४ - मंजुरल इस्लाम, बांगलादेशचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यूसंपादन करा
- १५०६ - हुसेन बयकराह, हेरतचा राजा.
- १७९९ - टिपू सुलतान.
- १९३८: ज्युदोचे संस्थापक कानो जिगोरो
- १९६८: बंगाली साहित्यिक आशुतोष मुखोपाध्याय
- १९८०: आधुनिक कवी, चतुरस्त्र लेखक, पत्रकार आणि नाटककार अनंत कानेटकर उर्फ आत्माराम
- १९८० - जोसेफ ब्रोझ टिटो, युगोस्लाव्हियाचा राष्ट्राध्यक्ष.
- २००८: तबलावादक किशन महाराज
प्रतिवार्षिक पालनसंपादन करा
- जागतिक कोळसा कामगार दिन.
- जागतिक अस्थमा दिन.
- स्मृती दिन - नेदरलँड्स.
- युवा दिन - चीन.
- स्वातंत्र्य दिन - लात्व्हिया.
- आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन
- जागतिक दमा दिन
बाह्य दुवेसंपादन करा
- बीबीसी न्यूजवर मे ४ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)