मे १०
दिनांक
मे १० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १३० वा किंवा लीप वर्षात १३१ वा दिवस असतो.
<< | मे २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ |
८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ |
१५ | १६ | १७ | १८ | १९ | २० | २१ |
२२ | २३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ |
२९ | ३० | ३१ |
ठळक घटना आणि घडामोडी
संपादनया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
- इ.पू. २८ : सौरडागांचे पहिले ज्ञात निरीक्षण चीनमध्ये नोंदले गेले
तेरावे शतक
संपादन- १२९१ - स्कॉटिश सरदारांनी इंग्लंडचा राजा एडवर्ड पहिला याचे वर्चस्व स्वीकारले.
सोळावे शतक
संपादन- १५०३ - क्रिस्टोफर कोलंबसने केमन द्वीपसमूहाला भेट दिली व त्यांचे नामकरण ला तोर्तुगा असे केले.
- १५३४ - जॉक कार्टियेने न्यू फाउंडलंड भेट दिली.
अठरावे शतक
संपादन- १७६८ - न्यू ब्रिटोन या नियतकालिकात राजा जॉर्ज तिसऱ्यावर टीका करणारा लेख लिहिल्याबद्दल जॉन विल्किसला तुरुंगात टाकण्यात आले. लंडनमध्ये दंगे.
- १७७३ : ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीला अमेरिकन बाजारपेठेची मक्तेदारी देणारा टी अॅक्ट ब्रिटिश पार्लमेंटमध्ये संमत झाला. १६ डिसेंबरची विख्यात 'बॉस्टन टी पार्टी' त्याविरोधात होती
- १७७४ - लुई सोळावा फ्रांसच्या राजेपदी.
- १७७५ - अमेरिकन क्रांती - कर्नल बेनेडिक्ट आर्नोल्ड व इथन ऍलेनच्या सैन्याने फोर्ट टिकॉन्डेरोगा हा किल्ला जिंकला.
- १७७५ - अमेरिकन क्रांती - अमेरिकेच्या १३ वसाहतींच्या प्रतिनिधींनी खंडीय सैन्याची उभारणी केली व त्याचे नेतृत्व व्हर्जिनीयाच्या कॅव्हेलियर जॉर्ज वॉशिंग्टनकडे दिले.
- १७९६ - नेपोलियन बोनापार्टने इटलीत ऑस्ट्रियाच्या सैन्याचा पराभव केला.
एकोणिसावे शतक
संपादन- १८०१ - ट्रिपोलीच्या बार्बेरी चाच्यांनी अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारले.
- १८१८: इंग्रज व मराठे यांच्यात तह होऊन रायगड किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.
- १८२४: लंडनमधील नॅशनल गॅलरी सर्वसाधारण लोकांसाठी खुली करण्यात आली.
- १८५७ - पहिला भारतीय स्वातंत्र्य संग्राम सुरू.ब्रिटिशांविरोधात उठावाची पहिली ठिणगी मीरतला पडली
- १८६५ - अमेरिकन यादवी युद्ध - उत्तरेच्या सैन्याने दक्षिणेच्या राष्ट्राध्यक्ष जेफरसन डेव्हिसला पकडले.
- १८६९ - अमेरिकेचे दोन्ही किनारे रेल्वेने जोडले गेले. युटाहमधील प्रोमोन्टरी पॉईंट येथे पूर्व आणि पश्चिमेकडून बांधत आलेले लोहमार्ग जोडले गेले.
- १८७७ - रोमेनियाने स्वतःला तुर्कस्तानपासून स्वतंत्र जाहीर केले.
विसावे शतक
संपादन- १९०९ - सावरकरांनी ब्रिटिशांच्या आनंदोत्सवाला प्रत्युत्तर म्हणून लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये १८५७ च्या वीरांचा गौरव करणारा समारंभ आयोजित केला. त्यात त्यांनी आपल्या भाषणात त्या संघर्षाला उघड उघड स्वातंत्र्यसमर म्हणले.
- १९२२ - अमेरिकेने किंगमन रीफ हा द्वीपसमूह बळकावला.
- १९२४ - जे. एडगर हूवर अमेरिकेच्या एफ.बी.आय.च्या निदेशकपदी. हूवर १९७२ पर्यंत या पदावर होता.
- १९३३ - जर्मनीत नाझींनी पुस्तकांची जाहीर होळी केली.
- १९३७: स्वातंत्र्यवीर सावरकर यांची रत्नागिरीच्या स्थानबद्धतेतून बिनशर्त मुक्तता.
- १९४० - दुसरे महायुद्ध - जर्मनीने इंग्लंडच्या पेलहाम गावावर बॉम्बफेक केली.
- १९४० - दुसरे महायुद्ध - जर्मनीने बेल्जियम, नेदरलँड्स व लक्झेम्बर्गवर आक्रमण केले.
- १९४० - दुसरे महायुद्ध - नेव्हिल चेम्बरलेनने राजीनामा दिल्यावर विन्स्टन चर्चिल युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधानपदी.
- १९४१ - दुसरे महायुद्ध - लुफ्तवाफेच्या बॉम्बफेकीत इंग्लंडचे हाउस ऑफ कॉमन्स नष्ट.
- १९६० - अमेरिकेच्या परमाणुचलित पाणबुडी यु.एस.एस. ट्रायटनने पाण्याखालून पृथ्वीप्रदक्षिणा केली.
- १९६९ - व्हियेतनाम युद्ध - हॅम्बर्गर हिलची लढाई.
- १९७९ - मायक्रोनेशिया प्रजासत्ताक झाले.
- १९८१ - फ्रांस्वा मित्तरां फ्रांसचा राष्ट्राध्यक्षपदी.
- १९८१ : मुंबईत पहिला विद्युतप्रकाशातला क्रिकेट सामना खेळला गेला
- १९९३ - थायलंडमध्ये खेळण्यांच्या कारखान्यास आग. १८८ ठार.
- १९९३: तीन महिला सदस्य असलेल्या एका तुकडीने माऊंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर सर केले. त्यातील २३ वर्षाच्या संतोष यादवने हे शिखर दुसऱ्यांदा सर करणारी पहिली भारतीय महिला होण्याचा मान मिळवला. एका वर्षाच्या आत हे शिखर सर करणारी ती जगातील पहिली महिला बनली.
- १९९४: दक्षिण आफ्रिकेचे पहिले श्वेतवर्णीय राष्ट्राध्यक्ष नोबेल पारितोषिक विजेते नेल्सन मंडेला यांनी देशाची सूत्र हाती घेतली.
- १९९६ - एव्हरेस्टवर हिमवादळ. चढाई करणारे ८ व्यक्ति ठार.
- १९९७ - ७.३ मेगावॅट भूकंपाच्या तीव्र धक्क्याने इराण मधील सुमारे १५६७ लोक ठार, २३०० लोक जखमी आणि ५०००० लोक बेघर झाले.
एकविसावे शतक
संपादनजन्म
संपादनया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
- १२६५ - फुशिमि, जपानी सम्राट.
- १८३८ - जॉन विल्क्स बूथ, अब्राहम लिंकनचा मारेकरी.
- १८५५: भारतीय गुरू आणि शिक्षक युकतेश्वर गिरी
- १८६३- संगीतकार, लेखक आणि चित्रकार उपेंद्रकिशोर राय
- १८७८ - गुस्ताव स्ट्रेसमान, जर्मनीचा चान्सेलर.
- १८८९: स्वातंत्र्यवीर सावरकरांचे बंधू, कादंबरीकार नारायण दामोदर सावरकर
- १८९७ - आयनार गेऱ्हार्डसन, नॉर्वेचा पंतप्रधान.
- १९०५: गायक व संगीतकार पंकज मलिक
- १९०९: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ग्रंथालयशास्त्रज्ञ, पद्मश्री, इंडियन नॅशनल सायंटिफिक डॉक्युमेंटेशन सेंटरचे पहिले संचालक बेल्लारी शामण्णा केशवन.
- १९१४: चित्रपट निर्माते ताराचंद बडजात्या
- १९१८: रिसर्च अँड अॅनॅलेसिस विंग (RAW) या भारतीय गुप्तचर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रामेश्वरनाथ काओ
- १९२७ - नयनतारा सहगल भारतीय लेखिका.
- १९३१: ज्येष्ठ गीतकार जगदीश खेबूडकर
- १९४०: प्रसिद्धी पराङमुख गीतकार व कवी माणिकराव गोडघाटे ऊर्फ ग्रेस
- १९५५ - मार्क चॅपमन, जॉन लेननचा मारेकरी.
- १९५८ - तौसीफ अहमद, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९६० - बोनो, आयरिश गायक.
मृत्यू
संपादन- १०३४ - मियेस्झ्को दुसरा, पोलंडचा राजा.
- १४२४ - गो-कामेयामा, जपानी सम्राट.
- १४८२ - पाओलो डाल पोझो टोस्कानेली, इटलीचा गणितज्ञ व अंतराळतज्ञ.
- १७३७ - नाकामिकाडो, जपानी सम्राट.
- १७७४ - लुई पंधरावा, फ्रांसचा राजा.
- १८६३ - स्टोनवॉल जॅक्सन, अमेरिकन गृहयुद्धातील दक्षिणेचा सेनापती.
- १८९९: रॅंड वधाच्या प्रकरणी द्रविड बंधूंची हत्या केल्याबद्दल महादेव विनायक रानडे यांना फाशी.
- १९८१: विनोदी लेखक प्राध्यापक विमादि तथा विनायक माधव दीक्षित पटवर्धन
- १९९८: पत्रकार, समाजसेवक, लेखक, चरित्रकार, साधना मासिकाचे संपादक यदुनाथ दत्तात्रय थत्ते
- २०००: कवी नागोराव घन:श्याम तथा ना. घ. देशपांडे
- २००१ - जलक्रांतीचे जनक सुधाकरराव नाईक, महाराष्ट्राचे १३ वे मुख्यमंत्री, हिमाचल प्रदेशचे राज्यपाल .
- २००२: गीतकार सय्यद अख्तर हुसेन रिझवी ऊर्फ कैफी आझमी
- २०१५: भारतीय इतिहासकार, लेखक निनाद बेडेकर
प्रतिवार्षिक पालन
संपादन- संविधान दिन - मायक्रोनेशिया.
- पालक दिन - दक्षिण कोरिया.
- मातृ दिन - मेक्सिको.
- जलसंधारण दिन - महाराष्ट्र.
बाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर मे १० च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)