मुख्यमंत्री हा एखाद्या देशाच्या विभागाचा (राज्य, प्रांत, इत्यादी) सरकारप्रमुख आहे.भारतीय राज्यघटनेत कलम १६३ अनुसार मुख्यमंत्र्यांची तरतूद आहे. मुख्यमंत्री हे पद प्रामुख्याने भारत देशामध्ये वापरले जाते जेथे सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासनप्रमुख मुख्यमंत्री असतात. मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख असतात.

भारताखेरीज श्रीलंका, पाकिस्तान तसेच युनायटेड किंग्डमच्या अधिपत्याखालील अनेक परकीय प्रदेशांमध्ये मुख्यमंत्री हे पद अस्तित्वात आहे. अनेक देशांमध्ये राज्य-स्तरीय सरकारप्रमुखाला राज्यपाल असेही संबोधले जाते.

हे सुद्धा पहासंपादन करा