इ.स. १९५५
इसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक |
दशके: | १९३० चे - १९४० चे - १९५० चे - १९६० चे - १९७० चे |
वर्षे: | १९५२ - १९५३ - १९५४ - १९५५ - १९५६ - १९५७ - १९५८ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
संपादन- फेब्रुवारी ८ - पाकिस्तानच्या सिंध प्रांताने जहागीरदारी पद्धत बंद केली व १०,००,००० एकर जमीन कुळांमध्ये वाटुन टाकली.
- फेब्रुवारी २३ - एडगर फौ फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
- मार्च २ - कंबोडियाच्या राजा नोरोदोम सिहानुकने पदत्याग केला. त्याचे वडील नोरोदोम सुरामारित राजेपदी.
- एप्रिल २४ - बांडुंगची सभा समाप्त. २९ देशांच्या या सभेत पंचशील तत्त्वांचा पुरस्कार केला गेला.
- मे ५ - पश्चिम जर्मनीला सार्वभौमत्त्व.
- मे ९ - पश्चिम जर्मनीला नाटोमध्ये प्रवेश.
- मे २५ - जगातील उंचीनुसार तिसरे शिखर कांचनगंगा जॉर्ज बॅंड आणि जो ब्राऊन यांनी प्रथमच सर केले.
- जुलै ११ - अमेरिकेने आपल्या चलनावर इन गॉड वी ट्रस्ट (देवावर आमचा विश्वास आहे) असे मुद्रित करण्याचे ठरवले.
- जुलै २० - चीनने तैवानच्या क्वेमॉय व मात्सु बेटांवर तोफा डागल्या.
- जुलै २७ - दोस्त राष्ट्रांनी ऑस्ट्रियातून आपले सैनिक काढून घेतले.
जन्म
संपादन- फेब्रुवारी २४ - स्टीव जॉब्स, ॲपल कम्प्युटर्सचा संस्थापक.
- मार्च ११ - निना हेगन, पूर्व जर्मनीची अभिनेत्री.
- मे ३ - डेव्हिड हूक्स, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- मे १० - मार्क चॅपमन, जॉन लेननचा मारेकरी.
- मे १८ - चौ युन फॅट, हॉंग कॉंगचा अभिनेता.
- जून २१ - मिशेल प्लाटिनी, फ्रेंच फुटबॉल खेळाडू.
- जुलै १९ - रॉजर बिन्नी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- जुलै २७- ॲलन बॉर्डर, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- ऑगस्ट १ - अरुणलाल, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- ऑगस्ट ४ - बिली बॉब थॉर्न्टन, अमेरिकन अभिनेता.
- सप्टेंबर ७ - अझहर खान, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- डिसेंबर १३ - मनोहर पर्रीकर, गोव्याचे मुख्यमंत्री.
अज्ञात जन्मदिनांक
संपादन- रंजना देशमुख, मराठी चित्रपट अभिनेत्री.
मृत्यू
संपादन- एप्रिल १८ - अल्बर्ट आइनस्टाइन, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.
- मे ११ - गिल्बर्ट जेसप, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.