इ.स. १९५२
इसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक |
दशके: | १९३० चे - १९४० चे - १९५० चे - १९६० चे - १९७० चे |
वर्षे: | १९४९ - १९५० - १९५१ - १९५२ - १९५३ - १९५४ - १९५५ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
संपादन- फेब्रुवारी ६ - ईंग्लंडचा राजा जॉर्ज सहाव्याचा अंत. एलिझाबेथ दुसरी राणी झाली. ज्याक्षणी एलिझाबेथ राणी झाली (जॉर्जचा मृत्यु) त्या क्षणी ती केन्यातील झाडावर असलेल्या हॉटेलमध्ये होती.
- फेब्रुवारी १४ - नॉर्वेची राजधानी ऑस्लो येथे सहावे हिवाळी ऑलिंपिक खेळ सुरू.
- फेब्रुवारी २१ - ईंग्लंडमध्ये नागरिकांनी ओळखपत्र नेहमी जवळ बाळगायची सक्ती रद्ध.
- फेब्रुवारी २१ - पूर्व पाकिस्तान(आताचे बांगलादेश)मध्ये पोलिसांनी विद्यार्थ्यांवर गोळीबार केला. चार ठार. येथून बांगलादेश मुक्ति आंदोलन सुरू झाले.
- मार्च ८ - ऑंत्वान पिनॉय फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
- एप्रिल २८ - ड्वाइट डी. आयझेनहॉवरने नाटोचे सरसेनापतीपद सोडले.
- एप्रिल २८ - अमेरिकेने जपानचा ताबा सोडला.
- मे ३ - अमेरिकेच्या जोसेफ ओ. फ्लेचर व विल्यम पी. बेनेडिक्ट या वैमानिकांनी उत्तर ध्रुवावर विमान उतरवले.
- मे १२ - प्रजासत्ताक भारताचे पहिले संसदीय अधिवेशन सुरू.
- मे १२ - गजसिंग जोधपुरच्या राजेपदी.
- मे ३१ - जनरल ड्वाइट डी. आयझेनहॉवर अमेरिकन सैन्यातून निवृत्त.
- जुलै ३ - अमेरिकेने पोर्तोरिकोचे संविधान मान्य केले.
- जुलै २० - फिनलंडची राजधानी हेलसिंकी येथे पंधरावे ऑलिंपिक खेळ सुरू.
- जुलै २५ - पोर्तोरिकोने नवीन संविधान अंगिकारले.
जन्म
संपादन- फेब्रुवारी २१ - ज्या पिंग्वा, चिनी भाषेमधील कादंबरीकार.
- मार्च ११ - डग्लस अॅडम्स, ब्रिटिश लेखक, नाटककार.
- मार्च ११ - सुसान रिचर्डसन, अभिनेत्री.
- जुलै ३ - वासिम राजा, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- जुलै १७ - डेव्हिड हॅसेलहॉफ, अमेरिकन अभिनेता.
- ऑगस्ट १ - झोरान डिंडिक, सर्बियाचा पंतप्रधान.
- ऑगस्ट १ - यजुर्वेन्द्रसिंग, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- ऑगस्ट ८ - सुधाकर राव, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- ऑगस्ट १६ - महेस गूणतिलके, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
- ऑक्टोबर ३ - गॅरी ट्रूप, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
संपादन- फेब्रुवारी ६ - जॉर्ज सहावा, इंग्लंडचा राजा.
- मार्च ७ - परमहंस योगानंद, भारतीय तत्त्वज्ञ.
- जुलै २६ - एव्हा पेरोन, आर्जेन्टिनाची गायिका.
- सप्टेंबर २६ - जॉर्ज सांतायाना, स्पॅनिश तत्त्वज्ञानी.