बांगलादेश

आशिया खंडातील देश
(पूर्व पाकिस्तान या पानावरून पुनर्निर्देशित)

बांगलादेश हे भारताच्या पूर्वेला असलेले बंगाली भाषिक मुस्लिम बहुल राष्ट्र आहे. १९४७ सालच्या अखंड भारताच्या फाळणीत [[पूर्व ]]आणि [[पश्चिम]] अशा दोन भागात पाकिस्तानची निर्मिती झाली. त्यातला पूर्व भाग हा आजचा बांगलादेश म्हणून ओळखला जातो. तत्कालीन पूर्व पाकिस्तानाची भाषा बंगाली, तर पश्चिम पाकिस्तानात उर्दू वापरात होती. भाषा आणि इतर प्रश्नामुळे पूर्व पाकिस्तानातील जनतेचा असंतोष वाढत गेला. हा असंतोष मोडून काढण्यासाठी पाकिस्तान सरकारने लष्कर पाठविले व लष्करी कायदा लागू केला. पाकिस्तानी लष्कराच्या मोहिमेमुळे आणि तणावाच्या परिस्थितीमुळे पूर्व पाकिस्तानातील नागरिकांचे भारतीय हद्दीत मोठ्या प्रमाणात स्थलांतर होऊ लागले. परिणामी भारताला या प्रकरणात लष्करी हस्तक्षेप करावा लागला. १९७१ मध्ये पूर्व पाकिस्तान वेगळे होऊन बांगलादेशाची निर्मिती झाली.

बांगलादेश
গণপ্রজাতন্ত্রী বাংলাদেশ
बांगलादेश प्रजासत्ताक
बांगलादेशचा ध्वज बांगलादेशचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: जॉय बांगला
राष्ट्रगीत: Amar Shonar Bangla instrumental.ogg अमार सोनार बांगला
अमार शोणार बांगला
बांगलादेशचे स्थान
बांगलादेशचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
ढाका
अधिकृत भाषा बंगाली (बांगला)
 - राष्ट्रप्रमुख झिल्ल-उर-रेहमान
 - पंतप्रधान शेख हसीना
 - सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश मुझ्झमल होसेन
 - {{{नेता_वर्ष१}}} {{{नेता_नाव१}}}
 - {{{नेता_वर्ष२}}} {{{नेता_नाव२}}}
 - {{{नेता_वर्ष३}}} {{{नेता_नाव३}}}
 - {{{प्रतिनिधी_वर्ष१}}} {{{प्रतिनिधी_नाव१}}}
 - {{{प्रतिनिधी_वर्ष२}}} {{{प्रतिनिधी_नाव२}}}
 - {{{प्रतिनिधी_वर्ष३}}} {{{प्रतिनिधी_नाव३}}}
 - {{{उप_वर्ष१}}} {{{उप_नाव१}}}
 - {{{उप_वर्ष२}}} {{{उप_नाव२}}}
 - {{{उप_वर्ष३}}} {{{उप_नाव३}}}
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस (पाकिस्तानपासून)
मार्च २६, १९७१ 
 - प्रजासत्ताक दिन ४ नोव्हेंबर १९७२ 
क्षेत्रफळ
 - एकूण १,४३,९९८ किमी (९४वा क्रमांक)
 - पाणी (%) ७.०
लोकसंख्या
 -एकूण १४,७३,६५,००० (७वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ९८५/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ३०५.६ अब्ज अमेरिकन डॉलर (३१वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न २,०११ अमेरिकन डॉलर (१४३वा क्रमांक)
राष्ट्रीय चलन बांगलादेशी टका (BDT)
आंतरराष्ट्रीय कालविभाग बांगलादेशी प्रमाणवेळ (BDT) (यूटीसी+६)
आय.एस.ओ. ३१६६-१ BD
आंतरजाल प्रत्यय .bd
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +८८०
राष्ट्र_नकाशा


बांगलादेशातील राष्ट्रीय संसद भवनचे समोरचे दृश्य

ढाका ही बांगलादेश ची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. ब्रम्हपुत्रागंगा ह्या येथील प्रमुख नद्या आहेत.