बांगलादेश रेल्वे ((बंगाली: বাংলাদেশ রেলওয়ে) ही बांगलादेश देशाची राष्ट्रीय रेल्वे कंपनी आहे. एकूण ३,६०० किमी लांबीचे लोहमार्गाचे जाळे असलेली बांगलादेश रेल्वे देशामध्ये प्रवासी व मालवाहतूक पुरवते. ब्रिटिश राजवटीदरम्यान १८६२ साली बंगाल आसाम रेल्वे ह्या नावाने स्थापन झालेली बांगलादेश रेल्वे आजच्या घडीला बांगलादेशातील सर्वाधिक वापरली जाणारी वाहतूक यंत्रणा आहे. बांगलादेश रेल्वे प्रामुख्याने ब्रॉड गेजवर धावते व राजधानी ढाकाला देशातील इतर प्रमुख शहरांसोबत जोडते. आजच्या घडीला सर्व रेल्वे वाहतूक डिझेल इंजिनांद्वारेच करण्यात येते.

बांगलादेश रेल्वे
प्रकार सरकारी उद्योग
उद्योग क्षेत्र रेल्वे वाहतूक
स्थापना १५ नोव्हेंबर १८६२
मुख्यालय ढाका, बांगलादेश ध्वज बांगलादेश
सेवा प्रवासी वाहतूक, माल वाहतूक, पार्सल सेवा
महसूली उत्पन्न ८० लाख टका (२०१४ साली)
एकूण उत्पन्न
(कर/व्याज वजावटीपूर्वी)
-८० लाख टका (२०१४ साली)
मालक बांगलादेश सरकार
कर्मचारी २७,५३५
पालक कंपनी बांगलादेश रेल्वे मंत्रालय
संकेतस्थळ http://www.railway.gov.bd/

प्रमुख मार्ग संपादन

 
ढाका ते चट्टग्राम दरम्यान धावणारी शोनार बांगला एक्सप्रेस ही बांगलादेशातील सर्वात प्रतिष्ठेची रेल्वेगाडी आहे

बाह्य दुवे संपादन