ब्रॉड गेज
ब्रॉड गेज हा लोहमार्गांवरील अनेक रेल्वे गेजपैकी सर्वात रूंद गेज आहे. ह्या गेजमध्ये लोहमार्गाच्या दोन रूळांमधील अंतर १६७६ मिमी किंवा ५ फूट ६ इंच इतके असते. ब्रॉड गेज प्रामुख्याने भारतीय उपखंडावरील भारत, पाकिस्तान, नेपाळ, बांग्लादेश व श्रीलंका तसेच दक्षिण अमेरिका खंडातील आर्जेन्टिना व चिली ह्या देशांमध्ये वापरला जातो.
भारत देशात १८५० पूर्वी रेल्वे मालवाहतूक प्रमाण गेजमार्गे होत असे. परंतु ब्रिटिश राजवटीदरम्यान ग्रेट इंडियन पेनिनसुला रेलवे कंपनीची भारतामधील पहिली प्रवासी रेल्वे १८५३ साली मुंबई व ठाणे शहरांदरम्यान धावली. ह्या गाडीसाठी ब्रॉड गेजचा वापर करण्यात आला होता. त्यानंतर भारतभर ब्रॉड गेजचे मार्ग बांधले जाऊ लागले. आजच्या घडीला भारतीय रेल्वे पूर्णपणे ब्रॉड गेजवर धावते. बहुतेक सर्व नॅरो गेज व मीटर गेज लोहमार्ग ब्रॉड गेजमध्ये रूपांतरित करण्यात आले आहेत. परंतु दिल्ली मेट्रो व कोलकाता मेट्रोवरील काही मार्ग वगळता बहुतेक सर्व मेट्रो रेल्वेमार्ग मात्र प्रमाण गेज वापरतात.
ब्रॉड गेजचा जगभरातील वापर
संपादनदेश | रेल्वे | लोहमार्गाची लांबी | टीपा |
---|---|---|---|
आर्जेन्टीना | सान मार्तिन रेल्वे | चालू | |
आर्जेन्टीना | सार्मियेन्तो रेल्वे | चालू | |
आर्जेन्टीना | मित्रे रेल्वे | चालू | |
आर्जेन्टीना | रोका रेल्वे | चालू | |
बांग्लादेश | बांगलादेश रेल्वे | ६८२ किलोमीटर (४२४ मैल) | चालू |
चिली | चिली राष्ट्रीय रेल्वे | चालू | |
भारत | भारतीय रेल्वे | ६७,३६८ किलोमीटर (४१,८६१ मैल) | चालू |
भारत | दिल्ली मेट्रो | ६५ किलोमीटर (४० मैल) | केवळ लाल, निळी व पिवळी मार्गिका; चालू |
भारत | कोलकाता मेट्रो | २७.२२ किलोमीटर (१६.९१ मैल) | केवळ मार्गिका १; चालू |
इराण | झाहिदान पासून पाकिस्तान सीमेपर्यंत | चालू | |
नेपाळ | नेपाळ रेल्वे | ५९ किलोमीटर (३७ मैल) | चालू |
पाकिस्तान | पाकिस्तान रेल्वे | ७,७९१ किलोमीटर (४,८४१ मैल) | चालू |
श्रीलंका | श्रीलंका रेल्वे | १,५०८ किलोमीटर (९३७ मैल) | चालू |
अमेरिका | सॅन फ्रान्सिस्को भागातील बे एरिया रॅपिड ट्रान्सिट | १०९ मैल (१७५ किमी) | चालू |