रेल्वे गेज
रेल्वे वाहतूकीसाठी वापरल्या जाणाऱ्या लोहमार्गावरील दोन रूळांमधील अंतराला रेल्वे गेज किंवा लोहमार्ग मापी असे म्हणतात. जगभरात अनेक रेल्वे गेज अस्तित्वात आहेत. भारत देशामध्ये रेल्वे वाहतूकीच्या सुरुवातीपासून प्रामुख्याने नॅरो गेज, मीटर गेज व ब्रॉड गेज हे तीन अस्तित्वात होते. आजच्या घडीला भारतीय रेल्वे प्रामुख्याने ब्रॉड गेजवर धावते. परंतु जगभरातील अंदाजे ५४ टक्के रेल्वे वाहतूक प्रमाण गेज वापरून केली जाते. तसेच बव्हंशी द्रुतगती रेल्वेमार्ग प्रमाण गेज वापरतात.