प्रमाण गेज किंवा स्टॅंडर्ड गेज हा रेल्वे गेजचा एक प्रकार आहे. ह्या गेजमध्ये दोन रूळांमधील अंतर १,४३५ मिमी (४ फूट ८.५ इंच) इतके असते. स्टॅंडर्ड गेज हा जगातील सर्वाधिक वापरला जाणारा गेज असून आजच्या घडीला जगात्मधील ५५ टक्के रेल्वे वाहतूक हा गेज वापरून होते. सर्व द्रुतगती रेल्वे ह्याच गेजचा वापर करतात. उदा. जपानमधील शिनकान्सेन.

भारत देशामध्ये रेल्वे वाहतूकीसाठी ब्रॉड गेज वापरात असला तरीही बहुतेक सर्व शहरांमधील मेट्रो रेल्वेमार्ग स्टॅंडर्ड गेजच वापरतात.