एप्रिल २८
दिनांक
एप्रिल २८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ११८ वा किंवा लीप वर्षात ११९ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
संपादनबारावे शतक
संपादन- ११९२ - जेरुसलेमचा राजा कॉन्राड पहिल्याची हत्या.
अठरावे शतक
संपादन- १७९६ - चेरास्कोचा तह - नेपोलियन बोनापार्ट व व्हिटोरियो आमेडेओ तिसरा, सार्डिनीयाचा राजा यांच्यात.
एकोणिसावे शतक
संपादनविसावे शतक
संपादनया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
- १९१६: लो. टिळकांनी महाराष्ट्रात होम रुल लीगची स्थापना झाली.बॅरिस्टर जोसेफ बॅप्टिस्टा हे अध्यक्षपदी होते.
- १९२० : होमरूल लीगच्या अध्यक्षपदी महात्मा गांधी यांची निवड.
- १९२० - अझरबैजानचा सोवियेत संघात प्रवेश.
- १९३२ - पिवळा ज्वर तापाची लस सर्वसाधारण माणसांच्या वापरासाठी जाहीर करण्यात आली.
- १९४५ - इटलीच्या स्वातंत्र्यसैनिकांनी बेनितो मुसोलिनीचा वध केला.
- १९४७ - पाच मदतनीसांसह थॉर हायरडाल पेरूच्या किनाऱ्यावरून पॉलिनेशियाकडे कॉन-टिकी नावाच्या तराफ्यावर निघाला.
- १९५२ - ड्वाइट डी. आयझेनहॉवरने नाटोचे सरसेनापतीपद सोडले.
- १९५२ - अमेरिकेने जपानचा ताबा सोडला.
- १९६५ - अमेरिकेने डॉमिनिकन प्रजासत्ताकमध्ये लश्कर पाठवले.
- १९६७ : प्रसिद्ध बॉक्सर मोहम्मद अलीने सैन्यात जाण्यास नकार दिला.
- १९६९ - चार्ल्स दि गॉलने फ्रांसच्या राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
- १९७० - व्हियेतनाम युद्ध - अमेरिकन अध्यक्ष रिचर्ड निक्सनने आपल्या सैन्याला कंबोडियावर हल्ला करण्याचा अधिकृत हुकुम दिला.
- १९७६ : अंतर्गत सुरक्षा कायद्याखाली अटक झालेल्यांना न्यायालयात दाद मागता येणार नाही असा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय.
- १९७८ - अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्ष मोहम्मद दाउद खानची हकालपट्टी व हत्या.
- १९८६ : चर्नोबिलच्या दुर्घटनेनंतर दोन दिवसांनी रश्याने ती मान्य केली.
- १९८८ - हवाईच्या मौई बेटाजवळ अलोहा फ्लाइट २४३ या बोईंग ७३७ जातीच्या विमानाला हवेत असताना भगदाड पडले. वैमानिकांनी कुशलतेने विमान उतरवले. १ ठार, अनेक जखमी.
- १९९६ - ऑस्ट्रेलियाच्या तास्मानिया बेटावर मार्टिन ब्रायन्टने ३५ व्यक्तिंना ठार केले. ईतर १८ जखमी.
एकविसावे शतक
संपादन- २००१ - डेनिस टिटो हा पैसे देउन अंतराळात प्रवास करणारा पहिला अंतराळ प्रवासी झाला.
- २००३ : 'ॲपल'ने 'आयट्यून' स्टोरची सुरुवात केली.
जन्म
संपादन- १४४२ - एडवर्ड चौथा, इंग्लंडचा राजा.
- १७५८ - जेम्स मन्रो, अमेरिकेचा पाचवा राष्ट्राध्यक्ष.
- १८५४ - वासुकाका जोशी, मराठी स्वांतंत्र्यसैनिक.
- १८८९ - ॲंतोनियो दि ऑलिव्हियेरा सालाझार, पोर्तुगालचा हुकुमशहा.
- १९०८ - ऑस्कार शिंडलर, ऑस्ट्रियाचा व्यापारी व नाझीविरोधी.
- १९२४ - केनेथ कॉॅंडा, झाम्बियाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९२६ - वसंत नरहर फेणे, मराठी लेखक
- १९२९ - भानू अथैय्या, ऑस्करविजेती पहिली भारतीय महिला व सिनेवेशभूषाकार.
- १९३१ - मधु मंगेश कर्णिक, मराठी लेखक.
- १९३७ - सद्दाम हुसेन, इराकी राष्ट्राध्यक्ष.
- १९४२ - माईक ब्रेअर्ली, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९६८ - अँडी फ्लॉवर, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.
- १९८१ - जेसिका अल्बा, अमेरिकन अभिनेत्री.
मृत्यू
संपादन- ११९२ - कॉन्राड पहिला, जेरुसलेमचा राजा.
- १७२६ - थॉमस पिट, चेन्नईचा ब्रिटिश गव्हर्नर.
- १७४० - थोरले बाजीराव पेशवे, मराठा साम्राज्याचे पेशवे.
- १९४५ - बेनितो मुसोलिनी, इटलीचा हुकुमशहा यांचा गोळ्या घालून मृत्यू.
- १९७८ - मोहम्मद दाउद खान, अफगाणिस्तानचा राष्ट्राध्यक्ष.
- १९९२ - डॉ. विनायक कृष्ण गोकाक, ज्ञानपीठ पुरस्कारविजेते कन्नड साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ.
- १९९८ - रमाकांत देसाई, भारतीय जलदगती गोलंदाज.
- २०१५ - शांता मोडक मराठी अभिनेत्री
- २०२० - अपर्णा रामतीर्थकर, मराठी समाजसेवक
प्रतिवार्षिक पालन
संपादनबाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर एप्रिल २८ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
एप्रिल २६ - एप्रिल २७ - एप्रिल २८ - एप्रिल २९ - एप्रिल ३० - (एप्रिल महिना)