Imbox content.png
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.

ऑस्कर पुरस्कार अर्थात अकॅडमी पुरस्कार (इंग्लिश: Academy Awards) हे अमेरिकेतील अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स ॲंड सायन्स या चलचित्र अकादमीमार्फत दिले जाणारे वार्षिक पुरस्कार आहेत. चित्रपट क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणार्‍यांना गौरवण्यासाठी हे पुरस्कार दरवर्षी दिले जातात. मेट्रो-गोल्डिन-मेयर स्टुडिओचे लुईस बी. मेयर यांनी अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स ॲंड सायन्स अकादमीची स्थापना केली, तसेच ऑस्कर पुरस्कारांचीही सुरुवात केली.

ऑस्कर पुरस्कार
८५ वा ऑस्कर पुरस्कार
प्रयोजन चित्रपट क्षेत्रातील कामगिरीसाठी
देश अमेरिका
प्रदानकर्ता चलत चित्र कला व विज्ञान अकादमी
प्रथम पुरस्कार मे १६, इ.स. १९२९
संकेतस्थळ http://www.oscars.org/

आरंभसंपादन करा

पहिला ऑस्कर पुरस्कार सोहळा मे १६, इ.स. १९२९ रोजी हॉलिवुड रुझवेल्ट हॉटेलमध्ये अंदाजे २७० जणांच्या उपस्थितीत झाला. या सोहळ्याला पाच डॉलर तिकिटाचा दर होता. इ.स. १९५३ मध्ये ऑस्कर सोहळा प्रथमच टीव्हीच्या माध्यमातून अमेरिकेची संयुक्त संस्थाने आणि कॅनडा पर्यंत दाखवला गेला. इ.स. १९६९ पासून ऑस्कर सोहळा जगभर प्रक्षेपित केला जाऊ लागला. सध्या हा सोहळा २०० पेक्षा अधिक देशात पाहता येतो.

पद्धतीसंपादन करा

पहिल्या सोहळ्यात ऑस्कर विजेत्यांची नावे सोहळ्याच्या तीन महिने आधीच जाहीर केली गेली होती. मात्र, पुढील वर्षापासून विजेत्यांची नावे पुरस्कार सोहळ्यापर्यंत गुप्त ठेवण्यात येऊ लागली. सोहळ्याच्या आधीच विजेत्यांची यादी वर्तमानपत्रांकडे पाठवली जायची आणि सोहळ्याच्या दिवशी रात्री ११ वाजता ती वर्तमानपत्रांनी प्रसिद्ध करायची, असे ठरवण्यात आले. ही पद्धत इ.स. १९४० पर्यंत पाळली गेली. परंतु लॉस एंजेलिस टाइम्सने ऑस्कर विजेत्यांची यादी सायंकाळीच प्रसिद्ध केली. त्यामुळे सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या सर्वांना ती सहज उपलब्ध झाली. या मुले पद्धत बदलणे भाग झाले. इ.स. १९४१ पासून बंद पाकिटात विजेत्यांची नावे देण्याची पद्धत सुरू झाली.

प्रथम पुरस्कारसंपादन करा

पहिल्या सोहळ्यात १५ ऑस्कर पुरस्कार दिले गेले होते. सवोर्त्कृष्ट अभिनेत्याचे पहिले ऑस्कर एमिल जॅनिंग्ज यांना, तर सवोर्त्कृष्ट अभिनेत्रीचे पहिले ऑस्कर जेनेट गेनर यांना मिळाले दिले गेले होते.

प्रथम विशेष पुरस्कारसंपादन करा

पहिल्या ऑस्कर सोहळ्यात दोन विशेष ऑस्कर पुरस्कार दिले गेले.

सर्वाधिक पुरस्कार मिळवणारे अभिनेतेसंपादन करा

पुरुषसंपादन करा

  • जॅक निकल्सन यांना अभिनयासाठी १२ वेळा नामांकने मिळाली आहेत. त्यातील वन फ्लू ओव्हर द कुकूज नेस्ट इ.स. १९७५ आणि ॲझ गुड ॲझ इट गेट्स इ.स. १९९७ चित्रपटांसाठी त्यांना उत्कृष्ट अभिनेत्याचे तर टर्म्स ऑफ एडियरमेंट इ.स. १९८३ साठी उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचे ऑस्कर मिळाले. अभिनयातले तीन ऑस्कर मिळवणारा हा एकमेव अभिनेता आहे.

महिलासंपादन करा

  • केथरिन हेपबर्न उत्कृष्ट अभिनेत्रीचे सर्वाधिक चार ऑस्कर मिळवण्याचा विक्रम यांच्या नावावर आहे. ५० वर्षांच्या कारकीदीर्त त्यांना १२ वेळा नामांकने मिळाली आहेत. त्यात मॉनिर्ग ग्लोरी इ.स. १९३२, गेस हू इज कमिंग टू डिनर इ.स. १९६७, द लायन इन विंटर इ.स. १९६८ आणि ऑन गोल्डन पॉंड इ.स. १९८१ या चित्रपटांसाठी ऑस्कर पुरस्कार मिळाले आहेत.

संकीर्णसंपादन करा

मराठी वेशभूषाकार भानू अथय्या यांना इ.स. १९८२ मध्ये गांधी चित्रपटातील वेशभूषा संकल्पनासाठी जॉन मोल्लो यांच्यासह ऑस्कर पुरस्कार विभागून मिळाला होता.

2020 मध्ये 93व्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारताकडून मल्याळम भाषेतील चित्रपट 'जल्लीकट्टू'ची निवड करण्यात आली आहे. एकूण 27 चित्रपटांमधून जल्लीकट्टू'ची निवड झाली आहे. भारतातर्फे 1957 सालापासून ऑस्करसाठी चित्रपट पाठवण्यात येत आहेत.

1957 ते 2020 भारताकडून ऑस्करसाठी पाठवण्यात आलेले चित्रपट :

2019 गल्ली बॉय (हिंदी) जोया अख्तर

2018 विलेज रॉकस्टार्स (आसामी) रीमा दास

2017 न्यूटन (हिंदी) अमित व्ही. मसुरकर

2016 विसरनाई (तमिळ) वेत्री मारन

2015 कोर्ट (मराठी) चैतन्य ताम्हाणे

2014 लायर्स डाइस (हिंदी) अनुराग बासु

2013 द गुड रोड (गुजराती) ज्ञान कोरीया

2012 बर्फी! (हिंदी) अनुराग बासु

2011 अबू, सन ऑफ आदाम (मल्याळम) सलीम लाजला

2010 पीपली लाइव्ह (हिंदी) अनुषा रिझवी

2009 हरिश्चंद्राची फॅक्टरी (मराठी) परेश मोकाशी

2008 तारे जमीन पर (हिंदी) आमिर खान

2007 एकलव्य - रॉयल गार्ड (हिंदी) विधू विनोद चोप्रा

2006 रंग दे बसंती (हिंदी) राकेश ओमप्रकाश मेहरा

2005 रिड्ले (हिंदी) अमोल पालेकर

2004 श्वास (मराठी) संदीप सावंत

2002 देवदास (हिंदी) संजय लीला भन्साळी

2001 लगान (हिंदी) आशुतोष गोवारीकर

2000 हे राम (तमिळ) कमल हासन

1999 पृथ्वी (हिंदी) दीपा मेहता

1998 जीन्स (तमिळ) एस. शंकर

1997 गुरू (मल्याळम) राजीव आंचल

1996 भारतीय (तमिळ) एस. शंकर

1995 कुरुतिपुनाल (तमिळ) पी.सी. श्रीराम

1994 मुहाफिज (हिंदी) इस्माईल व्यापारी

1993 रुदाली (हिंदी) कल्पना लाजमी

1992 तेवर मगन (तमिळ) भरथन

1991 मेंदी (हिंदी) रणधीर कपूर (उर्दू)

1990 अंजली (तमिळ) मणी रत्नम

1989 परिंदा (हिंदी) विधू विनोद चोप्रा

1988 सलाम बॉम्बे! (हिंदी) मीरा नायर

1987 नयागण (तमिळ) मणी रत्नम

1986 स्वाती मुथ्यम (तेलगू) कासीनाधुनी विश्वनाथ

1985 सागर (हिंदी) रमेश सिप्पी

1984 सारांश (हिंदी) महेश भट्ट

1980 पायल की झंकार (हिंदी) सत्येन बोस

1978 बुद्धीबळ खेळाडू (उर्दू) सत्यजित किरण (हिंदी)

1977 मंथन (हिंदी) श्याम बेनेगल

1974 गरम वारे (उर्दू) एम. एस. सत्यू

1973 सौदागर (हिंदी) सुधेन्दु किरण

1972 उपर (हिंदी) सुधेन्दु किरण

1971 रेश्मा और शेरा (हिंदी) सुनील दत्त

1969 देईवा मागण (तमिळ) ए सी. तिरुलोकचंदर

1968 बडी बहेन (हिंदी) हृषिकेश मुखर्जी

1967 आखरी खत (हिंदी) चेतन आनंद

1966 आम्रपाली (हिंदी) लेख टंडन

1965 मार्गदर्शक (हिंदी) विजय आनंद

1963 महानगर (बंगाली) सत्यजित किरण

1962 साहिब बीबी और गुलाम (हिंदी) अबरार अल्वी (उर्दू)

1959 द वर्ल्ड ऑफ आपू (बंगाली) सत्यजित किरण

1958 मधुमती (हिंदी) बिमल रॉय

1957 मदर इंडिया (हिंदी) मेहबूब खान

बाह्य दुवेसंपादन करा

  • "अधिकृत संकेतस्थळ" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)


कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.