इ.स. १९४१
इसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक |
दशके: | १९२० चे - १९३० चे - १९४० चे - १९५० चे - १९६० चे |
वर्षे: | १९३८ - १९३९ - १९४० - १९४१ - १९४२ - १९४३ - १९४४ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
संपादन- फेब्रुवारी २३ - डॉ.ग्लेन टी. सीबॉर्गने किरणोत्सर्गी पदार्थ प्लुटोनियमची प्रथमतः निर्मिती केली.
- मार्च १ - बल्गेरियाने जर्मनी व इटलीशी संधी केली.
- एप्रिल १३ - जपान व सोवियेत संघाने तटस्थतेचा तह केला.
- एप्रिल १७ - दुसरे महायुद्ध - युगोस्लाव्हियाने जर्मनीसमोर शरणागति पत्करली.
- एप्रिल २७ - दुसरे महायुद्ध - जर्मनीचे सैन्य ग्रीसची राजधानी अथेन्समध्ये शिरले.
- मे १ - दुसरे महायुद्ध - जर्मनीच्या सैन्याने लिब्यातील टोब्रुक शहरावर कडाडून हल्ला चढवला.
- मे ५ - इथियोपियाचा सम्राट हेल सिलासी अदिस अबाबाला परतला.
- मे ९ - दुसरे महायुद्ध - जर्मनीची यु.११० ही पाणबुडी ब्रिटिश आरमाराने पकडली. यातून एनिग्मा हे सांकेतिक भाषेत संदेश पाठविण्याचे यंत्र मिळाले.
- मे १० - दुसरे महायुद्ध - लुफ्तवाफेच्या बॉम्बफेकीत ईंग्लंडचे हाउस ऑफ कॉमन्स नष्ट.
- मे २४ - दुसरे महायुद्ध - अटलांटिक समुद्रातील लढाईत जर्मनीच्या युद्धजहाज बिस्मार्कने युनायटेड किंग्डमची मानाची युद्धनौका एच.एम.एस. हूड बुडवली. १,४१५ खलाशी, सैनिक व अधिकारी मृत्युमुखी.
- मे ३० - दुसरे महायुद्ध - जर्मनीने क्रीट जिंकले.
- जून ८ - दुसरे महायुद्ध - दोस्त राष्ट्रांनी सिरीया व लॅबेनॉन वर आक्रमण केले.
- जून २२ - जर्मनीने रशियावर चढाई केली.
- जुलै ५ - दुसरे महायुद्ध - जर्मनीच्या सैन्याने नीपर नदी पर्यंत धडक मारली.
- जुलै ७ - दुसरे महायुद्ध - अमेरिकेचे सैन्य आइसलॅंडमध्ये उतरले.
- जुलै १३ - दुसरे महायुद्ध - मॉॅंटेनिग्रोत जर्मन वा इटालियन राजवटीविरुद्ध उठाव.
- जुलै २६ - दुसरे महायुद्ध - जपानच्या नैऋत्य एशियातील शिरकावास प्रत्युत्तर म्हणून अमेरिकन राष्ट्राध्यक्ष फ्रॅंकलिन डिलानो रूझवेल्टने अमेरिकेतील जपानी मालमत्ता सरकारी ताब्यात घेण्याचा आदेश दिला.
- डिसेंबर १३ - दुसरे महायुद्ध - हंगेरी व रोमेनियाने अमेरिकेविरूद्ध युद्ध पुकारले.
जन्म
संपादन- जानेवारी ५ - मन्सूर अली खान पटौदी, भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा माजी कर्णधार, पटौदी संस्थानाचा नववा व अखेरचा नवाब.
- जानेवारी ३० - रिचर्ड चेनी, अमेरिकेचा उपाध्यक्ष.
- फेब्रुवारी ८ - जगजीतसिंह, भारतीय गझलगायक, संगीतकार.
- फेब्रुवारी १६ - किम जोॅंग-इल, उत्तर कोरियाचा राष्ट्राध्यक्ष.
- फेब्रुवारी २२ - हिपोलितो मेजिया, डोमिनिकन प्रजासत्ताकचा अध्यक्ष.
- जून १९ - वाक्लाव क्लाउस, चेकोस्लोव्हेकियाचा राष्ट्राध्यक्ष.
- जुलै १७ - बॉब टेलर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- जुलै ३१ - अमरसिंह चौधरी, गुजरातचा मुख्यमंत्री.
- सप्टेंबर २९ - डेव्हिड स्टील, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- ऑक्टोबर ५ - एदुआर्दो दुहाल्दे, आर्जेन्टीनाचा राष्ट्राध्यक्ष.
- ऑक्टोबर २९ - ब्रायन यूली, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
संपादन- फेब्रुवारी २८ - आल्फोन्सो तेरावा, स्पेनचा राजा.
- मे ३० - प्रजाधिपोक तथा राम सातवा, थायलंडचा राजा.
- ऑगस्ट ७ - रवींद्रनाथ टागोर, बंगाली कवी, लेखक, नोबेल पारितोषिक विजेते.