फेब्रुवारी २८
दिनांक
<< | फेब्रुवारी २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ |
फेब्रुवारी २८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ५९ वा किंवा लीप वर्षात ५९ वा दिवस असतो.
ठळक घटना
संपादनअठरावे शतक
संपादन- १७८४ - जॉन वेस्लीने मेथोडिस्ट चर्चची स्थापना केली.
एकोणिसावे शतक
संपादन- १८४९ - अमेरिकेच्या पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यांमध्ये नियमित जहाजसेवा सुरू. न्यू यॉर्कहून निघालेले एस. एस. कॅलिफोर्निया हे जहाज ४ महिने व २१ दिवसांनी सान फ्रांसिस्कोला पोचले.
- १८५४ - रिपन, विस्कॉन्सिन येथे अमेरिकन रिपब्लिकन पार्टीची स्थापना.
- १८६१ - कॉलोराडोला अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा प्रदेश म्हणून मान्यता.
- १८९७ - फ्रांसच्या सैन्याने मादागास्करची राणी रानाव्हलोना तिसरी हिला पदच्युत केले.
विसावे शतक
संपादन- १९०९ - 'रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले' ही कवी गोविंद यांची कविता व अन्य ब्रिटिशविरोधी साहित्य प्रकाशित केल्याबद्दल बाबाराव सावरकर यांना अटक
- १९२२ - इजिप्तला युनायटेड किंग्डम पासून स्वातंत्र्य.
- १९३१ - डॉ. सी.व्ही. रामन यांनी लावलेल्या शोधाला रामन इफेक्ट असे नाव देण्यात आले.
- १९३५ - वॉलेस केरोथर्सने नायलॉनचा शोध लावला.
- १९४० - बास्केटबॉल खेळ प्रथमच दूरचित्रवाणी वर प्रक्षेपित झाला.
- १९४७ - तैवानमध्ये आंदोलकांवर पोलिसांचा गोळीबार. शेकडो व्यक्ति ठार.
- १९४८ - ब्रिटिशांची शेवटची सैन्यतुकडी भारत सोडून मायदेशी परतली.
- १९७५ - लंडनमध्ये भुयारी रेल्वेला अपघात. ४३ ठार.
- १९८६ - स्वीडनच्या पंतप्रधान ओलोफ पाल्मेची हत्या.
- १९९३ - वेको, टेक्सास येथील ब्रांच डेव्हिडयन धर्माच्या वसाहतीवर पोलिसांची धाड. ५ ठार.
एकविसावे शतक
संपादन- २००१ - अमेरिकेच्या वॉशिंग्टन राज्यात रिश्टर मापनपद्धतिनुसार ६.८ तीव्रतेचा भूकंप.
- २००२ - गुजरातमध्ये जातीय दंगली. नरोडा पाटिया हत्याकांडात ९७ मृत. गुलबर्गा सोसायटीत ६९ मृत.
जन्म
संपादन- १८७३ - सर जॉन सायमन, सायमन कमिशन या आयोगाचे अध्यक्ष
- १८९७ - डॉ. शंकर दामोदर पेंडसे, मराठी लेखक.
- १९०१ - लिनस कार्ल पॉलिंग, रसायनशास्त्रज्ञ.
- १९१३ - पंडित नरेंद्र शर्मा, हिंदी साहित्यिक
- १९२६ - स्वेतलाना अलिलुयेवा, जोसेफ स्टालिनची मुलगी.
- १९२७ - कृष्णकांत, भारताचे १०वे उपराष्ट्रपती.
- १९२९ - रंगास्वामी श्रीनिवासन, भारतीय-अमेरिकन शास्त्रज्ञ.
- १९३५ - क्लाइव्ह हाल्से, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९४४ - रविंद्र जैन, हिंदी गीतकार आणि संगीतकार.
- १९४६ - ग्रॅहाम व्हिवियन, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
- १९४७ - दिग्विजय सिंघ, भारतातील मध्यप्रदेश राज्याचे पूर्व मुख्यमंत्री आणि भारतीय राष्ट्रीय कांग्रेसचे नेते.
- १९४७ - विजय बहुगुणा, भारतातील उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री.
- १९५१ - करसन घावरी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९६९ - यू. श्रीनिवास, मेंडोलिन वादक, सप्टेंबर १३ २००३ रोजी त्यांना राष्ट्रीय कुमार गंधर्व पुरस्कार जाहीर झाला.
- १९७१ - परमजीत सिंघ, भारतीय खेळाडू, यांनी ४०० मीटर शर्यतीचा ३८ वर्षांचा मिल्खा सिंघचा राष्ट्रीय रेकॉर्ड मोडला.
- १९७५ - अझहर महमूद, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९७८ - राणा नवेद-उल-हसन, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९७८ - यासिर हमीद, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
संपादन- १५२५ - क्वाह्टेमॉक, ऍझटेक सम्राट.
- १५७२ - राणा उदयसिंह, मेवाडचे शासक आणि महाराणा प्रताप यांचे वडील.
- १६४८ - क्रिस्चियन चौथा, डेन्मार्कचा राजा.
- १८६९ - आल्फोन्स द लामार्टीन, फ्रेंच कवी, लेखक, राजकारणी.
- १९२५ - फ्रिडरिश एबर्ट, जर्मनीचा चान्सेलर.
- १९२६ - गोविंद त्र्यंबक दरेकर उर्फ कवी गोविंद, मराठी शाहीर.
- १९३६ - कमला नेहरू, जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी.
- १९४१ - आल्फोन्सो तेरावा, स्पेनचा राजा.
- १९६३ - डॉ. राजेंद्र प्रसाद, भारताचे प्रथम राष्ट्रपती.
- १९६६ - उदयशंकर भट्ट, हिंदी साहित्यिक
- १९७९ - पाउल आल्वेर्डेस, जर्मन कवी, लेखक.
- १९८६ - ओलोफ पाल्मे, स्वीडनचा पंतप्रधान.
- १९९८ - राजा गोसावी, मराठी चित्रपट अभिनेता.
- १९९९ - भगवंतराव श्रीपतराव पंतप्रतिनिधी, औंध संस्थानचे राजे.
- २००३ - फिदेल सांचेझ हर्नान्देझ, एल साल्वादोरचा राष्ट्राध्यक्ष.
- २००६ - ओवेन चेंबरलेन, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.
प्रतिवार्षिक पालन
संपादन- शांति स्मृति दिन - तैवान.
- राष्ट्रीय विज्ञान दिवस - भारत
- राष्ट्रीय डि-एडिक्शन दिवस
- जागतिक फेसबुकरहित दिन
बाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर फेब्रुवारी २८ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
फेब्रुवारी २६ - फेब्रुवारी २७ - फेब्रुवारी २८ - फेब्रुवारी २९ - मार्च १ - (फेब्रुवारी महिना)