पाउल आल्वेर्डेस

जर्मन कादंबरीकार आणि कवी

पाउल आल्वेर्डेस (जर्मन: Paul Alverdes) (६ मे, इ.स. १८९७; स्त्रासबुर्ग - २८ फेब्रुवारी, इ.स. १९७९; म्युन्शेन) हा जर्मन भाषेतील कादंबरीकार व कवी होता.

पाउल आल्वेर्डेस
जन्म नाव पाउल आल्वेर्डेस
जन्म ६ मे, इ.स. १८९७
स्त्रासबुर्ग
मृत्यू २८ फेब्रुवारी, इ.स. १९७९
म्युन्शेन
राष्ट्रीयत्व जर्मनी
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा जर्मन

आल्वेर्डेस जर्मन युवा चळवळीचा सदस्य होता. पहिल्या महायुद्धात तो प्रत्यक्ष युद्धात लढला. युद्धादरम्यान त्याच्या गळ्यास गंभीर जखम झाली. इ.स. १९४५ सालानंतर त्याने प्रामुख्याने बालसाहित्य लिहिले.