म्युनिक अथवा म्युनशेन (मराठी लिखाण म्युनिच) हे जर्मनीतील प्रमुख शहर आहे. बायर्न राज्याची राजधानी असलेल्या ह्या शहरात १९७२ च्या ऑलिंपिक स्पर्धा पार पडल्या होत्या. या शहराची एकूण लोकसंख्या १३ लाख इतकी असून जर्मनीतील बर्लिनहॅंम्बुर्गनंतर तिसरे मोठे शहर आहे. बव्हेरियन आल्प्सच्या पायथ्याशी हे शहर वसले आहे व इसार नावाची नदी शहराच्या मध्यभागातून वाहते. निसर्ग सौदर्यांने नटलेल्या म्युनिचजवळ अनेक पर्यटन स्थळे आहेत. तसेच अनेक घटनांचा साक्षिदार असलेल्या या शहरात अनेक ऐतिहासिक स्थळे व राजवाडे आहेत. तसेच हे शहर संग्रहालयांचे शहर म्हणूनही ओळखले जाते. ड्यॉईचे वस्तूसंग्रहालय , विमानांचे संग्रहालय ही काही येथील प्रसिद्ध संग्रहालये आहेत. जगप्रसिद्ध वाहन निर्माते बी.एम.डब्ल्यू या कंपनीचे माहेरघर म्युनिकच आहे. जर्मनीने दुसऱ्या महायुद्धानंतर केलेल्या प्रगतीचे म्युनिच हे प्रतीक मानले जाते.

म्युनिक
München
जर्मनीमधील शहर


चिन्ह
म्युनिक is located in जर्मनी
म्युनिक
म्युनिक
म्युनिकचे जर्मनीमधील स्थान

गुणक: 48°8′0″N 11°34′0″E / 48.13333°N 11.56667°E / 48.13333; 11.56667

देश जर्मनी ध्वज जर्मनी
राज्य बायर्न
स्थापना वर्ष इ.स. ११५८
क्षेत्रफळ ३१० चौ. किमी (१२० चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १,७०३ फूट (५१९ मी)
लोकसंख्या  
  - शहर १३,५६,५९४
  - घनता ४,३७० /चौ. किमी (११,३०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
http://www.muenchen.de/

भौगोलिक

संपादन

म्युनिच हे शहर आल्पस पर्वताच्या पायथ्याशी वसलेले आहे व समुद्रसपाटीपासूनची उंची साधारणपणे ५५० मी इतकी आहे. परंतु शहराचा बहुतेक भाग हा सपाट आहे. शहरातील कोणत्याही उंच इमारतीवरून दक्षिणेकडच्या आल्प्सच्या उंच रांगा पहायला मिळतात.

हवामान

संपादन

म्युनिचचे हवामान हे पश्चिम युरोपीय हवामानप्रकारात मोडते. परंतु आल्प्सचे सानिध्य असल्याने उत्तरेकडून येणारे वारे या ठिकणी अडतात त्यातून येणाऱ्या बाष्पामुळे म्युनिचमध्ये जर्मनीतील इतर शहरांपेक्षा सरासरीपेक्षा २०० ते ३०० मीमी जास्त पाउस पडतो. तसेच हिवाळ्यात बर्फाचे प्रमाणही इतर शहरांपेक्षा अधिक असते. डिसेंबर ते मार्च हे महिने हिवाळ्यात गणले जातात जानेवारी हा सर्वांत कडक थंडीचा महिना असतो व सरासरी तापमान उणे ४ ते अधिक २ ते ३ अंश असते.

सार्वजनिक वाह्तुक

संपादन

अर्थव्यवस्था

संपादन

म्युनशेन हे दक्षिण जर्मनीमधील एक प्रमुख औद्योगिक केंद्र समजले जाते. बीएमडब्ल्यू या जगप्रसिद्ध वाहननिर्माण कंपनीचे म्युनिच हे माहेरघर आहे. याचे मुख्य कार्यालयाची इमारत अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे.

शैक्षणिक

संपादन

म्युनिच येथील तांत्रिक विद्यापीठ (टी.यू म्युनशेन) हे जर्मनीतील अग्रणी विद्यापीठ आहे. जागतिक स्तरावरही या विद्यापीठाची गणना पहिल्या शंभर विद्यापीठांत होते.

क्रीडा

संपादन
 
अलायंझ अरेना

जर्मनीमधील इतर शहरांप्रमाणेच फुटबॉल हा येथील सर्वांत लोकप्रिय क्रीडाप्रकार आहे. बायर्न म्युनशेन (Bayern München) हा इथला स्थानिक फुटबॉल संघ 'बुन्डेसलिगा' या जर्मनीमधील सर्वोत्तम फुटबॉल क्लब आहे . सर्वाधिक वेळा राष्ट्रीय विजेत्या तसेच अनेक वेळा युरोपीय विजेत्या ठरलेल्या या संघाने केवळ जर्मन फुटबॉल नव्हे तर जगाला महान फुटबॉलपटूंचा वारसा दिला आहे.याचे मुख्य स्टेडियम उपनगरामधील अलायंझ अरेना या स्टेडियममध्ये आहे.

फुटबॉलप्रमाणेच इतर क्रीडा स्पर्धांकरताही हे शहर प्रसिद्ध आहे. १९७२ च्या ऑलिंपिक स्पर्धा भरवण्याचा मान या शहराने मिळवला. ही स्पर्धा इस्रायली क्रीडापटूंवर झालेल्या अतिरेकी हल्यासाठी कायमची लक्षात राहील. या हल्यात सहा इस्रायली खेळांडूंचा व पोलीस अधिकाऱ्यांचा म्रुत्यू झाला.

पर्यटन स्थळे

संपादन

संग्रहालये

संपादन

इतर

  • ऑलिंपिक पार्क
  • अलायंझ अरेना
  • श्लिसहाईमचा राजवाडा
  • बव्हेरियाचा पुतळा
  • राठ हाउस (टाउनहॉल)
  • डखाउची छळछावणी
ऑलिंपिक पार्क

प्रसिद्ध व्यक्ती

संपादन

संदर्भ

संपादन