फेब्रुवारी १५
दिनांक
<< | फेब्रुवारी २०२५ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ |
फेब्रुवारी १५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ४६ वा किंवा लीप वर्षात ४६ वा दिवस असतो.
ठळक घटना
संपादनचौथे शतक
संपादन- ३९९ - सॉक्रेटिसला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली.
सतरावे शतक
संपादनअठरावे शतक
संपादन- १७६४ - अमेरिकेतील मिसुरी राज्यात सेंट लुई शहराची स्थापना.
एकोणिसावे शतक
संपादन- १८६२ - अमेरिकन यादवी युद्ध - जनरल युलिसिस एस. ग्रॅंटने टेनेसीतील फोर्ट डोनेलसन किल्ल्यावर हल्ला चढवला.
- १८७९ - अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात स्त्री वकिलांना खटले लढवण्यास परवानगी.
- १८९८ - क्युबाची राजधानी हवानाच्या बंदरात अमेरिकन युद्धनौका यु.एस.एस. मेन वर स्फोट. २६० ठार. स्पॅनिश-अमेरिकन युद्ध सुरू.
विसावे शतक
संपादन- १९३९ - भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची निवड झाल्यावर, पंडित नेहरूंसह कार्यकारिणीच्या १२ सभासदांनी राजीनामे दिले.
- १९४२ - दुसरे महायुद्ध - सिंगापुरमध्ये ब्रिटिश सैन्याची शरणागती. ८०,००० भारतीय, ब्रिटिश व ऑस्ट्रेलियन सैनिक युद्धबंदी.
- १९६१ - सबिना एर फ्लाइट ५४८ हे विमान बेल्जियममध्ये कोसळले. ७३ ठार. मृतांत अमेरिकेचा संपूर्ण फिगर स्केटिंग संघ व त्यांचे मार्गदर्शक.
- १९६५ - कॅनडाने नवीन ध्वज अंगिकारला.
- १९७० - डॉमिनिकन प्रजासत्ताकचे डी.सी. ९ प्रकारचे विमान सान्तो दॉमिंगोजवळ कोसळले. १०२ ठार.
- १९८२ - खनिजतेल काढणारे जहाज ओशन रेंजर समुद्री वादळात न्यूफाउंडलंडच्या किनाऱ्याजवळ बुडाले. ८४ ठार.
एकविसावे शतक
संपादन- २०१३ - रशियाच्या चेल्याबिन्स्क शहरावरील आकाशात मोठा उल्कापात होउन झालेल्या स्फोटात ७००पेक्षा अधिक जखमी.
- २०१९ - जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात केंद्रीय राखीव दलाच्या तुकडीवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ४० जवान ठार.
- २०२५ - नवी दिल्ली रेल्वे स्थानक क्र.१४ फलाटांवर शनिवारी रात्री प्रचंड गर्दी उसळली. रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास भुवनेश्वर राजधानी फलाट १४ऐवजी १६वर येत असल्याची उद्घोषणा झाली. ह्या अचानक झालेल्या बदलामुळे स्थानकावर चेंगराचेंगरी होऊन तीन बालकांसह १८ प्रवाशांचा मृत्यू, तर १५ पेक्षा अधिक जण जखमी.
जन्म
संपादन- १४७१ - पिएरो दि लॉरेंझो दे मेदिची, फिरेंझेचे प्रजासत्ताकचा राजा.
- १५६४ - गॅलेलियो, इटलीचा भौतिकशास्त्रज्ञ व अंतराळतज्ञ.
- १७१० - लुई पंधरावा, फ्रांसचा राजा.
- १८२० - सुझन बी. ॲंथोनी, अमेरीकेतील स्त्रीमुक्तिवादी कार्यकर्ती.
- १३ - मनोएल फेरेझ दि काम्पोस सॅलेस, ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष.
- १८७८ - जॅक शार्प, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९१९ - आंद्रिआस पापेन्द्रु, ग्रीसचा पंतप्रधान.
- १९३० - वसंत दिवाणजी, कन्नड साहित्यात मौल्यवान योगदान देणारे प्रतिभावंत लेखक.
- १९३४ - निक्लॉस वर्थ, स्वित्झर्लंडचा संगणकशास्त्रज्ञ.
- १९४७ - रणधीर कपूर, हिंदी चित्रपट अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक.
- १९४९ - नामदेव ढसाळ, मराठी कवी.
- १९५६ - डेसमंड हेन्स, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९५९ - गाय डि आल्विस, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९६५ - क्रेग मॅथ्युस, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९७९ - हामिश मार्शल, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
संपादन- ११४५ - पोप लुशियस दुसरा.
- १६३७ - फर्डिनांड दुसरा, पवित्र रोमन सम्राट.
- १८४४ - हेन्री ऍडिंग्टन, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
- १८४७ - जर्मिनल पिएर डॅंडेलिन, बेल्जियन गणितज्ञ.
- १८४९ - पिएर फ्रांस्वा वेर्हल्स्ट, बेल्जियन गणितज्ञ.
- १८६९ - मिर्झा गालिब, उर्दू कवी.
- १८२८ - एच.एच. ऍस्क्विथ, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
- १९५९ - ओवेन विल्यम्स रिचर्डसन, नोबेल पारितोषिक विजेता ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ.
- १९६५ - नॅट किंग कोल, अमेरिकन संगीतकार.
- १९८८ - रिचर्ड फाइनमन, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.
- १९९९ - हेन्री वे केन्डॉल, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.
- २०२५ - 'पर्यटक देवो भवः' या संकल्पनेतून स्थापना झालेल्या केसरी टूर्सचे संस्थापक व अध्यक्ष केसरी पाटील (९० वर्ष).
- २०२५ - प्रसिद्ध बंगाली गायक आणि गीतकार "प्रतुल मुखोपाध्याय" (८२ वर्ष). सामाजिक समस्यांवर प्रकाश टाकणारे गीतकार म्हणून ते प्रसिद्ध होते. तसेच कोणत्याही वाद्याविना गायनासाठी ते ओळखले जात.
प्रतिवार्षिक पालन
संपादन- सेवालाल महाराज जयंती - बंजारा
- ध्वज दिन - कॅनडा.
- राष्ट्र दिन - सर्बिया.
- जागतिक बालकर्करोग दिन
- जागतिक ग्राहक संरक्षण दिन
बाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर फेब्रुवारी १५ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
फेब्रुवारी १३ - फेब्रुवारी १४ - फेब्रुवारी १५ - फेब्रुवारी १६ - फेब्रुवारी १७ - (फेब्रुवारी महिना)