टेनेसी
टेनेसी (इंग्लिश: Tennessee; टॅनसी ) हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या आग्नेय भागात वसलेले टेनेसी क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील ३६वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने १७व्या क्रमांकाचे राज्य आहे.
टेनेसी Tennessee | |||||||||||
अमेरिका देशाचे राज्य | |||||||||||
| |||||||||||
अधिकृत भाषा | इंग्लिश | ||||||||||
राजधानी | नॅशव्हिल | ||||||||||
मोठे शहर | मेम्फिस | ||||||||||
क्षेत्रफळ | अमेरिकेत ३६वा क्रमांक | ||||||||||
- एकूण | १,०९,२४७ किमी² | ||||||||||
- रुंदी | ७१० किमी | ||||||||||
- लांबी | १९५ किमी | ||||||||||
- % पाणी | २.२ | ||||||||||
लोकसंख्या | अमेरिकेत १७वा क्रमांक | ||||||||||
- एकूण | ६३,४६,१०५ (२०१० सालच्या गणनेनुसार) | ||||||||||
- लोकसंख्या घनता | ५३.३/किमी² (अमेरिकेत १९वा क्रमांक) | ||||||||||
संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश | १ जून १७९६ (१६वा क्रमांक) | ||||||||||
संक्षेप | US-TN | ||||||||||
संकेतस्थळ | www.tennessee.gov |
टेनेसीच्या दक्षिणेला अलाबामा व मिसिसिपी, पश्चिमेला आर्कान्सा व मिसूरी, उत्तरेला केंटकी, ईशान्येला व्हर्जिनिया, पूर्वेला नॉर्थ कॅरोलायना व आग्नेयेला जॉर्जिया ही राज्ये आहेत. नॅशव्हिल ही टेनेसीची राजधानी तर मेम्फिस हे सर्वात मोठे शहर आहे. टेनेसीची पश्चिम सीमा मिसिसिपी नदीने आखली गेली आहे तर राज्याचा पूर्व भागात डोंगराळ आहे.
मोठी शहरे
संपादन- मेम्फिस - ६,५०,१००
- नॅशव्हिल - ५,६९,८९२
- नॉक्सव्हिल - १,७३,८९०
- चॅटानूगा - १,५५,५५४
गॅलरी
संपादन-
गॅटलिनबर्ग जवळील द ग्रेट स्मोकी माउंटन्स नॅशनल पार्क.
-
टेनेसीमधील प्रमुख रस्ते व महामार्ग.
-
टेनेसी राज्य विधान भवन.
-
टेनेसीचे प्रतिनिधित्व करणारे २५ सेंट्सचे नाणे.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |