केंटकी (इंग्लिश: Commonwealth of Kentucky) हे अमेरिकेच्या मध्य-दक्षिण भागातील एक राज्य आहे. केंटकी हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील ३७वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने २६व्या क्रमांकाचे राज्य आहे.

केंटकी
Commonwealth of Kentucky
Flag of the United States अमेरिका देशाचे राज्य
राज्याचा ध्वज राज्याचे राज्यचिन्ह
ध्वज चिन्ह
टोपणनाव: ब्लूग्रास स्टेट (Bluegrass State)
ब्रीदवाक्य: United we stand, divided we fall
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा

अमेरिकेच्या नकाशावर चे स्थान
अधिकृत भाषा इंग्लिश
राजधानी फ्रॅंकफोर्ट
मोठे शहर लुईव्हिल
क्षेत्रफळ  अमेरिकेत ३७वा क्रमांक
 - एकूण १,०४,६५९ किमी² 
  - रुंदी २२५ किमी 
  - लांबी ६१० किमी 
 - % पाणी १.७
लोकसंख्या  अमेरिकेत २६वा क्रमांक
 - एकूण ४३,३९,३६७ (२०१० सालच्या गणनेनुसार)
 - लोकसंख्या घनता ४१.५/किमी² (अमेरिकेत २४वा क्रमांक)
संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश १ जून १७९२ (१५वा क्रमांक)
संक्षेप   US-KY
संकेतस्थळ kentucky.gov

केंटकीच्या उत्तरेला ओहायोइंडियाना, वायव्येला इलिनॉय, दक्षिणेला टेनेसी, नैऋत्येला मिसूरी तर पूर्वेला व्हर्जिनियावेस्ट व्हर्जिनिया ही राज्ये आहेत. फ्रॅंकफोर्ट ही केंटकीची राजधानी असून लुईव्हिल हे सर्वात मोठे शहर आहे. लेक्सिंग्टन हे देखील येथील एक मोठे शहर आहे.

जगातील सर्वात जास्त लांबीच्या गुहांचे जाळे असलेले मॅमथ केव्ह राष्ट्रीय उद्यान केंटकी राज्यातच आहे. येथील घोड्यांच्या शर्यती तसेच ब्लूग्रास नावाचे एक विशिष्ट प्रकारचे गवत प्रसिद्ध आहेत.

गॅलरी

संपादन

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: