वेस्ट व्हर्जिनिया
वेस्ट व्हर्जिनिया (इंग्लिश: West Virginia) हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या पूर्व भागात वसलेले वेस्ट व्हर्जिनिया क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील ४१वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने ३७व्या क्रमांकाचे राज्य आहे. माउंटन स्टेट ह्या टोपणनावानुसार ह्या राज्याचा सर्व भाग ॲपलेशियन पर्वतरांगांमध्ये वसला आहे.
वेस्ट व्हर्जिनिया West Virginia | |||||||||||
अमेरिका देशाचे राज्य | |||||||||||
| |||||||||||
अधिकृत भाषा | इंग्लिश | ||||||||||
राजधानी | चार्लस्टन | ||||||||||
मोठे शहर | चार्लस्टन | ||||||||||
क्षेत्रफळ | अमेरिकेत ४१वा क्रमांक | ||||||||||
- एकूण | ६२,७५५ किमी² | ||||||||||
- रुंदी | २१० किमी | ||||||||||
- लांबी | ३८५ किमी | ||||||||||
- % पाणी | ०.६ | ||||||||||
लोकसंख्या | अमेरिकेत ३७वा क्रमांक | ||||||||||
- एकूण | १८,५९,८१५ (२०१० सालच्या गणनेनुसार) | ||||||||||
- लोकसंख्या घनता | २९/किमी² (अमेरिकेत २७वा क्रमांक) | ||||||||||
- सरासरी उत्पन्न | $३८,०२९ | ||||||||||
संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश | २० जून १८६३ (३५वा क्रमांक) | ||||||||||
संक्षेप | US-WV | ||||||||||
संकेतस्थळ | www.wv.gov |
वेस्ट व्हर्जिनियाच्या पूर्वेला मेरीलँड, आग्नेयेला व्हर्जिनिया, ईशान्येला पेनसिल्व्हेनिया, वायव्येला ओहायो व नैऋत्येला केंटकी ही राज्ये आहेत. चार्लस्टन ही वेस्ट व्हर्जिनियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
खनिज द्रव्ये हा वेस्ट व्हर्जिनियाच्या अर्थव्यवस्थेचा सर्वात मोठा स्रोत आहे. कोळसा उत्पादन व कोळसा वापरून वीजनिर्मितीमध्ये वेस्ट व्हर्जिनिया अमेरिकेमध्ये प्रथम क्रमांकावर आहे.
मोठी शहरे
संपादन- चार्लस्टन - ५३,४२१
- हंटिंग्टन - ५१,४७५
- पार्कर्सबर्ग - ३३,०९९
गॅलरी
संपादन-
न्यू रिव्हर गॉर्ज ब्रिज.
-
वेस्ट व्हर्जिनियामधील प्रमुख रस्ते व महामार्ग.
-
वेस्ट व्हर्जिनिया राज्य संसद भवन.
-
वेस्ट व्हर्जिनियाचे प्रतिनिधित्व करणारे २५ सेंट्सचे नाणे.
बाह्य दुवे
संपादन- अधिकृत सरकारी संकेतस्थळ
- वाणिज्य Archived 2020-08-17 at the Wayback Machine.
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |