इ.स. १९५६
इसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष
इ.स. १९५६ हे इसवी सनाच्या दुसऱ्या सहस्रकातील एक वर्ष आहे.
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक |
दशके: | १९३० चे - १९४० चे - १९५० चे - १९६० चे - १९७० चे |
वर्षे: | १९५३ - १९५४ - १९५५ - १९५६ - १९५७ - १९५८ - १९५९ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
संपादन- जानेवारी २६ - इटलीत कोर्टिना द'आम्पेझो येथे सातवे हिवाळी ऑलिम्पिक खेळ सुरू.
- मार्च २ - मोरोक्कोला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
- मे १ - पोलियोची लस जनतेस उपलब्ध.
- मे ९ - टी. इमानिशी व ग्याल्झेन नोर्बु यांनी नेपाळ मधील मनस्लौ शिखर सर केले.
- जून २० - व्हेनेझुएलाचे सुपर कॉन्स्टेलेशन प्रकारचे विमान अमेरिकेच्या ऍस्बरी पार्क, न्यू जर्सी शहराजवळ समुद्रात कोसळले. ७४ ठार.
- जून २९ - अमेरिकेत देशभर हमरस्ते तयार करण्यासाठी केंद्रीय मदत देण्यासाठी कायदा मंजुर.
- जून ३० - युनायटेड एरलाइन्स फ्लाइट ७१८ हे डी.सी.७ प्रकारचे व ट्रान्स वर्ल्ड एरलाइन्सचे सुपर कॉन्स्टेलेशन प्रकारचे विमान अमेरिकेतील अॅरिझोना राज्यात ग्रॅंड कॅन्यन वर एकमेकांवर आदळली. १२८ ठार.
- जुलै २५ - अमेरिकेची प्रथम सागरी अणुचाचणी बिकीनी बेटांनजीक घेण्यात आली.
- जुलै २५ - नान्टुकेट द्वीपाजवळ एस.एस. अँड्रीया डोरीया व एस.एस. स्टॉकहोमची धुक्यात टक्कर. अँड्रीया डोरीया बुडाले. ५१ मृत्युमुखी.
- जुलै २६ - जागतिक बँकेने आस्वान धरण बांधण्यासाठी अर्थसाहाय्य करण्यास नकार दिल्यावर ईजिप्तच्या राष्ट्राध्यक्ष गमाल नासरने सुएझ कालव्याचे राष्ट्रीयीकरण केले.
- जुलै २८ - मनुएल प्राडो उगार्तेशे पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- जुलै ३१ - ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर जिम लेकरने एकाच कसोटी सामन्यात १९ बळी मिळवून विश्वविक्रम स्थापला.
जन्म
संपादन- जानेवारी १५ - मायावती, भारतीय राजकारणी.
- मार्च ११ - कर्टिस ब्राउन, कनिष्ठ, अमेरिकेचा अवकाशवीर.
- एप्रिल ६ - दिलीप वेंगसरकर,भारतीय क्रिकेट खेळाडू.
- जून ६ - ब्यॉर्न बॉर्ग, स्वीडनचा टेनिस खेळाडू.
- जून ६ - अँडी पायक्रॉफ्ट, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.
- जून २९ - पेद्रो संताना लोपेस, पोर्तुगालचा पंतप्रधान.
- ऑगस्ट ३ - बलविंदरसिंग संधू, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- सप्टेंबर १४ - पॉल ऍलोट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- सप्टेंबर २९ - सेबास्टियन को, इंग्लिश धावपटू.
मृत्यू
संपादन- मे १८ - मॉरिस टेट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- सप्टेंबर २६ - लक्ष्मणराव किर्लोस्कर, भारतीय, मराठी उद्योगपती.