आस्वान धरण हे इजिप्त देशामधील आस्वान ह्या शहराजवळ नाईल नदीवरचे एक मोठे धरण आहे. इ.स. १९६० साली बांधण्यात आलेल्या ह्या धरणाचे उद्देश पूरनियंत्रण, जलसिंचन तसेच विद्युतनिर्मिती हे होते. हे जगातील सर्वात लांब असणा-या नाईल नदीवर बांधलेले आहे. या धरणामुळे नाईल नदीचे पाणी वर्षभर अडवले जाते. तसेच निर्माण होणारी वीज इजिप्त मधील उद्योग व शहरांना पुरविली जाते. प्राचीन काळापासून नाईल नदीला दरवर्षी पूर येतो. वाहून येणा-या गाळामुळे येथील जमीन सुपीक बनलेली आहे. १९०२ मध्ये आस्वान गावच्या दक्षिणेला नाईल नदीवर धरण बांधण्यात आले. १९१२ व १९३३ या साली या धरणाची उंची वाढविली गेली. १९६० मध्ये या धरणाच्या वरील भागात ६ कि. मी. अंतरावर आस्वान हाय धरण चे काम नव्याने सुरू केले गेले. हे धरण माती, ग्रानाईट,दगडसिमेंटचा वापर करुन बांधलेले आहे. या धरणाची रुंदी ३.६ कि. मी. व उंची १११ मी. इतकी आहे. [१]

आस्वान धरण
BarragemAssuão.jpg
आस्वान धरणाचे उपग्रह चित्र
अधिकृत नाव आस्वान धरण
स्थान इजिप्त ध्वज इजिप्त
लांबी ३,८३० मीटर
उंची १११ मीटर
रुंदी (तळाशी) ९८० मीटर
बांधकाम सुरू इ.स. १९६०
उद्‍घाटन दिनांक इ.स. १९७०
ओलिताखालील क्षेत्रफळ गुरुत्व
जलाशयाची माहिती
क्षमता १३२ घन किमी
जलसंधारण क्षेत्र ५.२५० चौरस किमी
विद्युत उत्पादनासंबंधित माहिती
टर्बाइनांची संख्या १२ x १७५ मेवॉ
स्थापित उत्पादनक्षमता २,१०० मेगावॅट
धरणाचे इजिप्तमधील स्थान.
धरणाचे इजिप्तमधील स्थान.
आस्वान धरण
धरणाचे इजिप्तमधील स्थान

बाह्य दुवेसंपादन करा

  1. ^ भालेराव, विवेक (२००७). जगातील आश्चर्ये. औरंगाबाद: साकेत प्रकाशन. pp. ४३. ISBN 81-7786-399-1.