सिमेंट
प्रामुख्याने चुनखडीपासून बनवलेल्या बांधकामात विटांमध्ये वापरल्या जाणाऱ्या मिश्रणाला सिमेंट असे म्हणतात. B सिमेंट हा पायाभूत सुविधा क्षेत्राचा आधारस्तंभ आहे असे मानले जाते. रस्ते, पुल, घरे, औद्योगिक व व्यावसायिक इमारती, धरण अशा सगळ्या बांधकामांसाठी त्याचा वापर होतो.
यासाठी काँक्रीट वापरले जाते त्यात सिमेंटचा प्रामुख्याने उपयोग होतो. वाळू , खडी, याचे व सिमेंटचे पाण्याबरोबर व इतर काही घटकांबरोबर मिश्रण करून त्यापासून काँक्रीट बनवले जाते. पाण्यामुळे रासायनिक क्रिया होऊन हे अतिशय मजबूत बनते.
चुनखडी, सिलिकॉन ऑक्साईड, ॲल्युमिनियम, आयर्न ऑक्साईड व इतर काही घटक यांचे मिश्रण मोठ्या भट्टीत प्रचंड उष्णतेत जाळून त्यापासून क्लिकर नावाचे मिश्रण बनते. यामध्ये जिप्सम, पोझ्झोलाना (एक प्रकारची चिकणमाती), फ्लायअश, स्लॅग असे आणखी काही घटक मिसळवून व त्याची बारीक भुकटी करून त्यापासून विविध प्रकारचे सिमेंट बनते.
इतिहाससंपादन करा
भारतात इ.स. १९१४ मध्ये पोरबंदर इथे पहिली वार्षिक १००० टन उत्पादनक्षमता असलेली सिमेंट कंपनी स्थापन करण्यात आली.
प्रकारसंपादन करा
- ऑर्डीनरी पोर्टलँड सिमेंट,
- पोर्टलँड पोझ्झोलाना सिमेंट,
- व्हाईट सिमेंट
- ओईल वेळ सिमेंट
- रँँपिड हार्डनिग पोर्टलँड सिमेंट
- पोर्टलँड पोझोलोना सिमेंट
- सलफेट रेजिस्टीग पोर्टलँड सिमेंट
- एकसपांसिव सिमेंट
- कलर्ड सिमेंट
- हाय अँँल्युमिना सिमेंट अशा १३ प्रकारच्या सिमेंटचे देशात उत्पादन होते.[१]
भारतातील सिमेंट बनवणाऱ्या कंपनीसंपादन करा
- ए.सी.सी.
- बिरला
- जे.के.
- श्री
- प्रिजम
- अंबुजा
- विक्रम
- बिनानी[२]
- श्री अल्ट्रा
- एल. अँँड टी
- सी.सी. आय.
- दिग विजय
प्रदूषणसंपादन करा
बाह्य दुवेसंपादन करा
- युरोपियन सिमेंट असोसिएशन Archived 2010-07-04 at the Wayback Machine.
- सिमेंट बनवण्याचे चलचित्र
संदर्भसंपादन करा
- ^ Chauhan, Vipin. "14 Types of Cement in hindi". Civil Engineering Hindi Me. 2019-11-05 रोजी पाहिले.
- ^ "सीमेंट की खोज किसने की". हिंदी ज्ञान बुक (इंग्रजी भाषेत). 2019-11-05 रोजी पाहिले.