सप्टेंबर १४
दिनांक
सप्टेंबर १४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २५७ वा किंवा लीप वर्षात २५८ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
संपादनआठवे शतक
संपादनअठरावे शतक
संपादन- १७५२ - ब्रिटिश साम्राज्याने ग्रेगोरियन दिनदर्शिकेचा उपयोग सुरू केला व या वर्षातून ११ दिवस गाळले.
एकोणिसावे शतक
संपादन- १८२९ - एड्रियानोपलचा तह - रशिया व ओट्टोमन साम्राज्यातील युद्ध संपुष्टात आले.
विसावे शतक
संपादन- १९०१ - आठ दिवसांपूर्वीच्या खूनी हल्ल्यामुळे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष विल्यम मॅककिन्लीचा मृत्यू. थियोडोर रूझवेल्ट राष्ट्राध्यक्षपदी.
- १९१७ - रशियाने स्वतःला प्रजासत्ताक घोषित केले.
- १९२३ - मिगेल प्रिमो दि रिव्हेरा स्पेनचा सर्वेसर्वा झाला.
- १९५९ - सोव्हिएत संघाचे लुना २ हे अंतरिक्षयान चंद्रावर कोसळले. चंद्रापर्यंत पोचणारी ही सर्वप्रथम मानवनिर्मित वस्तू होती.
- १९६० - ओपेकची स्थापना.
- १९८२ - निवडणूकांमध्ये विजयी ठरलेल्या बशीर गमायेलची राष्ट्राध्यक्षपदी बसण्यापूर्वीच हत्या.
- १९९९ - किरिबाटी, नौरू व टोंगाचा संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रवेश.
एकविसावे शतक
संपादन- २००० - मायक्रोसॉफ्टने आपल्या एम.एस.-डॉस या संगणकप्रणालीची शेवटची आवृत्ती (८.०) प्रकाशित केली. याचबरोबर विंडोज एम.ई. या प्रणालीचेही वितरण सुरू केले.
- २००३ - स्वीडनच्या जनतेने आपले चलन स्वीडीश क्रोना हेच प्रमाण ठेवले व युरोचा अस्वीकार केला.
- २००३ - एस्टोनियाच्या जनतेने युरोपीय संघात सामील होण्यासाठीचा कौल दिला.
जन्म
संपादन- १८६८ - आर्थर सेकल, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १८८४ - डेव्हिड स्मिथ, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १८९५ - चार्ल्स मॅरियट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९०५ - हर्बी वेड, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९११ - रॉबर्ट हार्वे, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९१३ - जॅकोबो आर्बेंझ, ग्वातेमालाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९१६ - जेफ नोब्लेट, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९१९ - न्यालचंद शाह, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९१९ - गिल लँग्ली, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९५६ - पॉल ऍलोट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९५७ - केप्लर वेसल्स, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९५८ - जेफ क्रोव, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
- १९५९ - सलिया अहंगामा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९६३ - रॉबिन सिंग, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९६६ - आमिर सोहेल, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- (इ.स.१९९९)-विनायक नवघरे.
मृत्यू
संपादन- ५८५ - बिदात्सु, जपानी सम्राट.
- ७७५ - कॉन्स्टन्टाईन पाचवा, बायझेन्टाईन सम्राट.
- ७८६ - अल-हदी, खलिफा.
- ८९१ - पोप स्टीवन पाचवा.
- ११४६ - झेंगी, सिरियाचा राजा.
- ११६४ - सुटोकु, जपानी सम्राट.
- १५२३ - पोप एड्रियान सहावा.
- १७१२ - जियोव्हानी कॅसिनी, इटालियन खगोलतज्ञ.
- १८३६ - एरन बर, अमेरिकेचा उपराष्ट्राध्यक्ष.
- १९०१ - विल्यम मॅककिन्ली, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष.
- १९३७ - टोमास मासारिक, चेकोस्लोव्हेकियाचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
- १९६५ - जे.डब्ल्यु. हर्न, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- २०११ - हरिश्चंद्र माधव बिराजदार, मराठी पहिलवानी कुस्तीगीर.
प्रतिवार्षिक पालन
संपादनबाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर सप्टेंबर १४ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
सप्टेंबर १२ - सप्टेंबर १३ - सप्टेंबर १४ - सप्टेंबर १५ - सप्टेंबर १६ - सप्टेंबर महिना