इ.स. २०००
वर्ष
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | २० वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक |
दशके: | १९८० चे - १९९० चे - २००० चे - २०१० चे - २०२० चे |
वर्षे: | १९९७ - १९९८ - १९९९ - २००० - २००१ - २००२ - २००३ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
संपादन- जानेवारी १ - ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार तिसऱ्या सहस्रकाची सुरुवात
- जानेवारी ३ - काश्मीरमध्ये सुरूंगस्फोटात १५ ठार.
- जानेवारी ३० - केन्या एअरवेज फ्लाइट ४३१ हे एअरबस ए-३१० जातीचे विमान कोटे द'आयव्हार जवळ अटलांटिक महासागरात कोसळले. १६९ ठार.
- मार्च ८ - टोक्योत दोन लोकल गाड्यांची टक्कर. ५ ठार.
- एप्रिल १९ - आर फिलिपाईन्सचे बोईंग ७३७ जातीचे विमान दाव्हाओ आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोसळले. १३१ ठार.
- मे २४ - इस्रायलने २२ वर्षांनी लेबेनॉनमधून आपले सैनिक काढून घेतले.
- जुलै १० - नायजेरियात फुटलेल्या तेलवाहिकेत स्फोट. त्यातून गळणारे पेट्रोल भरण्यासाठी जमलेल्यांपैकी २५० व्यक्ती ठार.
- जुलै १४ - फिजीतील उठावाचा सूत्रधार जॉर्ज स्पेटला अटक व देशद्रोहाचा आरोप.
- जुलै २५ - एर फ्रांस फ्लाइट ४५९० हे कॉॅंकोर्ड विमान पॅरिस विमानतळावरून उडताच कोसळले. जमिनीवरील चौघांसह ११३ ठार.
- जुलै २८ - आल्बेर्तो फुजिमोरी तिसऱ्यांदा पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- ऑगस्ट ९ - अमेरिकेच्या बर्लिंग्टन, न्यू जर्सी शहराजवळ पायपर नवाहो व पायपर सेमिनोल प्रकारच्या विमानांची हवेत टक्कर. ११ ठार.
- डिसेंबर १२ - अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने बुश वि. गोर खटल्यात निकाल दिला. ज्यॉर्ज डब्ल्यू. बुश अध्यक्षपदी.
- डिसेंबर १३ - आदल्या दिवशी अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या बुश वि. गोर खटल्याच्या निकालानंतर अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणूकीत ॲल गोरने हार मान्य केली.
- डिसेंबर २८ - एड्रियन नास्तासे रोमेनियाच्या पंतप्रधानपदी.
- डिसेंबर ३० - मनिलात काही तासात अनेक बॉम्बस्फोट. २२ ठार, १०० जखमी.
जन्म
संपादन- ६ एप्रिल - शहीन अफ्रिदी, पाकिस्तानचा क्रिकेट पटु.
मृत्यू
संपादन- फेब्रुवारी ५ - वैद्य माधवशास्त्री जोशी, महाराष्ट्र आयुर्वेद महासंमेलनाचे माजी अध्यक्ष.
- फेब्रुवारी ९ - शोभना समर्थ, मराठी अभिनेत्री.
- मार्च ३ - रंजना देशमुख, मराठी चित्रपट अभिनेत्री.
- मे ३ - शकुंतलाबाई परांजपे, कुटुंब-नियोजनासाठी कार्य केलेल्या समाजसेविका
- मे १६ - माधव गोविंद काटकर, मराठी कवी.
- मे २४ - मजरुह सुलतानपुरी, गीतकार व उर्दू शायर.
- जून २९ - कॅप्टन वासुदेव श्रीपाद बेलवलकर, मराठी ऐतिहासिक कादंबरीकार.
- ऑगस्ट १० - गिल्बर्ट पार्कहाउस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- सप्टेंबर २८ - पिएर इलियट त्रुदू, कॅनडाचा पंधरावा पंतप्रधान.
- नोव्हेंबर १० - जाक शबान-देल्मास, फ्रांसचा पंतप्रधान (जन्म-इ.स. १९१५).
- डिसेंबर २८ - मेघश्याम पुंडलिक रेगे, भारतीय विचारवंत.
- डिसेंबर २८ - उस्ताद नसीर अमीनुद्दीन डागर, ध्रुपदगायक, डागरबंधूंपैकी एक.