ॲल गोर
आल्बर्ट आरनॉल्ड गोर, जुनियर (Albert Arnold Gore, Jr.; ३१ मार्च, १९४८ , वॉशिंग्टन, डी.सी.) हा एक अमेरिकन राजकारणी व अमेरिकेचा ४५वा उपराष्ट्राध्यक्ष आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचा सदस्य असलेला गोर १९९३ ते २००१ दरम्यान राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन ह्याच्या प्रशासनामध्ये उपराष्ट्राध्यक्षपदावर होता. त्यापूर्वी तो १९८५ ते १९९३ दरम्यान टेनेसी राज्यामधून अमेरिकेचा सेनेटर होता.
२००१ च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूकीसाठी गोरची डेमोक्रॅटिक पक्षातर्फे निवड झाली. अत्यंत चुरशीच्या निवडणूकीत जॉर्ज डब्ल्यू. बुश ह्याच्याकडून थोडक्यात पराभव झाला. निवडणूक इतकी चुरशीची झाली की काही वाहिन्यांनी ॲल गोर जिंकल्याचे वृत्त दिले होते.
ॲल गोर यांनी १९७० च्या दशकापासून जागतिक तापमानवाढीवर लोकांचे लक्ष वेधण्याचे काम केले आहे. त्यांनी आजवर जगभरात जागतिक तापमानवाढीवर अनेक देशांमध्ये व्याख्याने दिली आहेत व अजूनही देत आहेत. सर्व सामान्य व जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विषय पोहोचावा यासाठी २००७ मध्ये त्यांनी 'ॲन इनकव्हिनियंट ट्र्थ' हा माहितीपट काढला. या चित्रपटाला सर्वोतकृष्ट माहितीपटाचा ऑस्कर पुरस्कार मिळाला. तसेच नोबेल प्रतिष्ठानने त्यांच्या कार्याची दखल घेउन २००८चा शांततेचे नोबेल पारितोषिक बहाल केले.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
मागील: डॅन क्वेल |
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष २० जानेवारी १९९३ – २० जानेवारी २००१ |
पुढील: रिचर्ड चेनी |