डिसेंबर २८
दिनांक
<< | डिसेंबर २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ | २९ | ३० | ३१ |
डिसेंबर २८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३६२ वा किंवा लीप वर्षात ३६३ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
संपादनपाचवे शतक
संपादन- ४१८ - संत बॉनिफेस पहिला पोपपदी.
अकरावे शतक
संपादन- १०६५ - लंडनमध्ये वेस्टमिन्स्टर ऍबी खुली.
सतरावे शतक
संपादन- १६१२ - गॅलेलियोने नेपच्यून ग्रहाची नोंद केली परंतु त्याचे वर्गीकरण स्थिर तारा असे केले.
- १६५९ - कोल्हापूरची लढाई.
एकोणिसावे शतक
संपादन- १८३२ - जॉन सी. कॅल्हूनने अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.
- १८३५ - दुसऱ्या सेमिनोल युद्धात ओसिओलाने सेमिनोल योद्ध्यांसह अमेरिकन सैन्यावर हल्ला चढविला.
- १८३६ - दक्षिण ऑस्ट्रेलिया राज्य व एडिलेड शहराची स्थापना.
- १८३६ - स्पेनने मेक्सिकोचे स्वातंत्र्य मान्य केले.
- १८४६ - आयोवा अमेरिकेचे २९वे राज्य झाले.
- १८७९ - डंडी, स्कॉटलंड येथे टे रेल्वे पूलावरून गाडी जात असताना गाडीसह कोसळला. ७५ ठार.
- १८८२ - मुंबई येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना
विसावे शतक
संपादन- १९०८ - मेसिना, सिसिली येथे भूकंप. ७५,००० ठार.
- १९७३ - अलेक्सांद्र सोल्झेनित्सिनने गुलाग आर्किपेलागो प्रकाशित केले.
- १९९५ - कझाखस्तानमधील बैकानूर अंतराळतळावरून भारताच्या आय.आर.एस.-१सी या दूरसंवेदन उपग्रहाचे प्रक्षेपण.
- १९९९ - तुर्कमेनिस्तानने सपार्मुरात नियाझोवला आजन्म राष्ट्राध्यक्ष घोषित केले.
एकविसावे शतक
संपादनजन्म
संपादन- ११६४ - रोकुजो, जपानी सम्राट.
- १८९९ - गजानन त्र्यंबक माडखोलकर, मराठी साहित्यिक व पत्रकार.
- १८५६ - वुड्रो विल्सन, अमेरिकेचा २८वा राष्ट्राध्यक्ष.
- १९०३ - जॉन फोन न्यूमन, हंगेरीत जन्मलेला गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, गणकशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ व तर्कशास्त्रज्ञ.
- १९११ - फणी मुजुमदार, हिंदी चित्रपट निर्माते.
- १९२२ - स्टॅन ली, कॉमिक्स लेखक, स्पायडर मॅन, हल्क, एक्स मेन, कॅप्टन अमेरिका, इ. काल्पनिक व्यक्तिमत्त्वांचा जनक.
- १९२४ - मिल्टन ओबोटे, युगांडाचे राष्ट्राध्यक्ष.
- १९३२ - धीरूभाई अंबाणी, भारतीय उद्योगपती.
- १९३७ - रतन टाटा, भारतीय उद्योगपती.
- १९४० - ए.के. ॲंटनी भारतीय परराष्ट्रमंत्री.
- १९४५ - बीरेंद्र बीर बिक्रम शाह , नेपाळचे राजे
- १९५२ - अरुण जेटली, भारतीय वकील व केंद्रीय मंत्री.
- १९६९ - लिनस तोरवाल्ड्स, फिनलंडचा प्रोग्रॅमर, लिनक्स या गणकयंत्रप्रणालीचा जनक.
- १९७२ - पॅट्रिक राफ्टर, ऑस्ट्रेलियाचा टेनिस खेळाडू.
मृत्यू
संपादन- १३६७ - आशिकागा योशियाकिरा, जपानी शोगन.
- १४४६ - प्रतिपोप क्लेमेंट आठवा.
- १५०३ - पियेरो लोरेंझो दी मेदिची, फ्लोरेंसचा राज्यकर्ता.
- १६९४ - मेरी दुसरी, इंग्लंडची राणी.
- १७०३ - मुस्तफा दुसरा, ऑट्टोमन सुलतान.
- १८५९ - थॉमस मॅकॉले, ब्रिटिश कवी, राजकारणी व इतिहासकार.
- १९१६ - एदुआर्द स्ट्रॉस, ऑस्ट्रियाचा संगीतकार.
- १९६७ - द.गो.कर्वे, अर्थशास्त्रज्ञ; कुलगुरू, पुणे विद्यापीठ; प्राचार्य, बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय.
- १९७१ - नानकसिंग, पंजाबी साहित्यिक.
- १९७७ - सुमित्रानंदन पंत, हिंदी कवी.
- १९८१ - डेव्हिड अब्राहम चेऊलकर तथा डेव्हिड, हिंदी चित्रपटांतील चरित्र अभिनेता.
- २००० - मेघश्याम पुंडलिक रेगे, भारतीय विचारवंत.तत्त्वचिंतक, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष
- २००० - उस्ताद नसीर अमीनुद्दीन डागर, ध्रुपदगायक, डागरबंधूंपैकी एक.
- २००३ - चिंतामणी गणेश काशीकर, कुलगुरू, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ.
- २००३ - कृष्णाजी सुंदरराव तथा कुशाभाउ ठाकरे.
- २००४ - जेरी ऑर्बाख, अमेरिकन अभिनेता.
- २००६ - प्रभाकर पंडित, मराठी संगीतकार.व व्हायोलिनवादक
प्रतिवार्षिक पालन
संपादन- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापना दिन
बाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर डिसेंबर २८ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
डिसेंबर २६ - डिसेंबर २७ - डिसेंबर २८ - डिसेंबर २९ - डिसेंबर ३० - (डिसेंबर महिना)