डिसेंबर २३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३५७ वा किंवा लीप वर्षात ३५८ वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा

 • १९२१ - शांतिनिकेतन येथे ’विश्व भारती’ विश्वविद्यालयाची स्थापना.
 • १९४० - हिंदुस्तान एअरक्राफ्ट लिमिटेड हा भारतातील पहिला विमान कारखाना वालचंद हिराचंद यांनी म्हैसूर राज्यात सुरू केला.
 • १९७० - धी गोवा हिन्दू असोसिएशन निर्मित, वि. वा. शिरवाडकर लिखित व पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित ’नटसम्राट’ या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथील बिर्ला मातोश्री सभागृहात झाला.
 • २००० - कलकत्ता शहराचे नाव ’कोलकता’ असे बदलण्यास केंद्र सरकारची मंजुरी
 • २००१ - बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यातील केसरिया गाव येथे जगातील सर्वात मोठा बौद्ध स्तूप सापडला. त्याची उंची १०४ फूट आहे.

सातवे शतकसंपादन करा

अठरावे शतकसंपादन करा

एकोणिसावे शतकसंपादन करा

विसावे शतकसंपादन करा

एकविसावे शतकसंपादन करा

जन्मसंपादन करा

मृत्यूसंपादन करा

 • १९२६ - स्वामी दयानंदांचे शिष्य, गुरुकुल विश्वविद्यालयाचे संस्थापक, शिक्षणमहर्षी आणि आर्य समाजाचे प्रसारक स्वामी श्रद्धानंद यांची हत्या
 • १९६५ - गणपतराव बोडस, मराठी संगीत नाटकांतील गायक-अभिनेता.’गंधर्व नाटक मंडळी’चे एक संस्थापक
 • १९७९ - दत्ता कोरगावकर – हिन्दी व मराठी चित्रपट संगीतकार (याद, बडी मॉं, दामन, नादान, रिश्ता, चंद्रराव मोरे, सुखाचा शोध, गीता, गोरखनाथ, गोरा कुंभार, सूनबाई, महात्मा विदूर, हरिहर भक्ती, रायगडचा बंदी)
 • १९९८ - रत्‍नाप्पा कुंभार – स्वातंत्र्यसैनिक, सहकारी चळवळीतील अग्रणी नेते, इचलकरंजीच्या पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, पद्मश्री (१९८५), खासदार (१९५२), आमदार (शिरोळ), महाराष्ट्र सरकारचे गहराज्य मंत्री, भारतीय राज्यघटना समितीचे सदस्य
 • २००० - ’मलिका-ए-तरन्नुम’ म्हणून ख्यातनाम असलेल्या गायिका नूरजहॉं ऊर्फ अल्लाह वसई यांचे पाकिस्तानमधील कराची येथे निधन
 • २००४ - पी. व्ही. नरसिंहराव, भारतीय पंतप्रधान.
 • २००८ - गंगाधर महांबरे – गीतकार कवी व लेखक
 • २०१० - ज्ञानेश्वर नाडकर्णी – कला समीक्षक व लेखक. त्यांचे ’पाऊस’, ’भरती’, ’चिद्‌घोष’,हे कथासंग्रह, ’दोन बहिणी’, ’ ’कोंडी’ या कादंबर्‍या व ’पिकासो’ हे चरित्र प्रसिद्ध आहे.
 • २०१० - के. करुणाकरन – केंद्रीय उद्योगमंत्री व केरळचे मुख्यमंत्री व गृहमंत्री आणि केरळमधील ’युनायटेड डेव्हलपमेंट फ्रंट’ चे संस्थापक

प्रतिवार्षिक पालनसंपादन करा

 • किसान दिन - भारत
 • वर्धापनदिन : विश्वभारती विद्यापीठ (शांतिनिकेतन)

बाह्य दुवेसंपादन कराडिसेंबर २१ - डिसेंबर २२ - डिसेंबर २३ - डिसेंबर २४ - डिसेंबर २५ - (डिसेंबर महिना)