पुरुषोत्तम दारव्हेकर

पुरुषोत्तम दारव्हेकर (१९२७ - सप्टेंबर २१, १९९९) हे मराठी नाटककार होते.

कट्यार काळजात घुसली’ हे नाटक मराठी रंगभूमीवर आणणारे नाटककार दिग्दर्शक आणि गीतकार पुरुषोत्तम दारव्हेकर

त्यांचा जन्म शिक्षण नागपुरातील B. Sc. B. T.,  M. A. LL.B. with Gold Medal एवढे उच्च शिक्षण घेऊनही त्यांनी नाट्यक्षेत्रात पाय रोवला

१९५१ मध्ये  रंजन कला मंदिर या नावाने नाट्यसंस्था काढली ,

लहान मुलांचे साठीही त्यांनी नाटकांची निर्मिती केली

१९६१ साली त्यांनी दिल्ली येथे दूरदर्शनचे सहाय्यक संचालकपद सांभाळले,

ज्येष्ठ नाटककार पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्या लेखणीतून उतरलेलं आणि पं. जितेंद्र अभिषेकींच्या बहारदार संगीताने सजलेलं हे नाटक रंगभूमीवर आलं आणि त्याने एक नवा इतिहास रचला.

पुरुषोत्तम दारव्हेकर यांनी मधुसुदन कोल्हटकर व लता अरुण यांना घेऊन नटसम्राट दिग्दर्शित केले. या प्रयोगाचे श्रेयस इतकेच की आजपर्यंत महाराष्ट्रातल्या ज्या गावांमधे नटसम्राट पोचला नव्हता तिथपर्यंत तो पोचला.

मास्तरांनी नाटकाला आपल्या अपत्यासारखे जपले. त्यांच्या नाटकांवर विदर्भासह, इंदोर, दिल्ली, जबलपूरच्या रसिकांनीही भरभरून प्रेम केले.

चंद्र नभीचा ढळला नाटकाचे १६ प्रयोग, काळी माती : खारे पाणीचे सहा प्रयोग, वऱ्हाडी मानसंचे २६प्रयोग, नयन तुझे जादुगारचे २९ प्रयोग, वाजे पाऊल आपलेचे 21 प्रयोग त्यांनी केले. व्यावसायिक रंगभूमीवर अश्रूंची झाली फुले, इथे ओशाळला मृत्यू, नटसम्राट, कट्यार काळजात घुसली आदी नाटकांचे यशस्वी प्रयोग त्यांनी केले. तात्यासाहेबांनी तर नटसम्राट हे नाटक मास्तर दिग्दर्शित करणार असतील तरच मी देईन, असे म्हणले होते.

त्यांनी लेखन आणि दिग्दर्शन केलेले ’कट्यार काळजात घुसली’ हे नाटक मराठी रंगभूमीवरील मैलाचा दगड आहे.

त्यांची गीत संपदा

घेई छंद मकरंद ------- छळतसे काजळ काळी रात-------  जा उडुनी जा पाखरा ------तेजोनिधी लोहगोल ----- दिन गेले भजनाविण सारे ----- मुरलीधर श्याम हे नंदलाल ------  या भवनातिल गीत पुराणे

त्यांची बालनाटिका

उपाशी राक्षस --कबुलीवाला ---मोरूचा मामा ---पत्र्यांचा महाल ------नारदाची शेंडी -----अब्रा -कि-डब्रा