इ.स. १९२७
इसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष
ठळक घटना आणि घडामोडी
संपादन- मे ९ - ऑस्ट्रेलियाच्या संसदेचे नवीन राजधानी कॅनबेरा येथील पहिले अधिवेशन सुरू.
- मे ११ - चलत चित्र कला व विज्ञान अकादमीची स्थापना. ही संस्था दरवर्षी ऑस्कर पुरस्कार बहाल करते.
- मे १८ - मिशिगनच्या बाथ शहरात शाळेच्या अधिकाऱ्याने शाळेत ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट. ४५ ठार.
- मे ३१ - फोर्ड मोटर कंपनीची मॉडेल टी प्रकारची शेवटची कार तयार झाली. या प्रकारच्या एकूण १,५०,०७,००३ कार तयार केल्या गेल्या.
- जुलै २० - मायकेल पहिला रोमेनियाच्या राजेपदी.
- ऑगस्ट १ - चीनी गृहयुद्ध - नान्चांगचा उठाव.
- डिसेंबर २५ - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे समारंभपूर्वक जाहीरपणे दहन केले .
जन्म
संपादन- जानेवारी १० - शिवाजी गणेशन, तमिळ चित्रपट अभिनेता.
- जानेवारी ३० - ओलोफ पाल्मे, स्वीडनचा पंतप्रधान.
- फेब्रुवारी २० - सिडनी पोईटिये, अमेरिकन अभिनेता.
- मार्च ११ - रॉन टॉड, ब्रिटिश कामगारनेता.
- मार्च ११ - रॉबर्ट मोसबाकर, अमेरिकन राजकारणी.
- मार्च ११ - रेमंड जॅकसन, ब्रिटिश व्यंगचित्रकार.
- मार्च ११ - ऍलन बेट्स, रॉयल व्हेटरनरी कॉलेजचा मानद ज्येष्ठ प्राध्यापक.
- एप्रिल २७ - कोरेटा स्कॉट किंग, मार्टिन ल्युथर किंगची पत्नी.
- मे ९ - मॅन्फ्रेड आयगेन, जर्मन जैवभौतिकशास्त्रज्ञ.
- मे १० - नयनतारा सहगल भारतीय लेखिका.
- जुलै १५ - कार्मेन झपाटा, अभिनेत्री.
- जुलै २६ - जी.एस. रामचंद भारतीय क्रिकेट खेळाडू.
- ऑगस्ट १५ - एडी लेडबीटर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- डिसेंबर २५ - राम नारायण
मृत्यू
संपादन- जुलै २० - फर्डिनांड, रोमेनियाचा राजा.