फोर्ड मोटर कंपनी ही एक प्रवासी मोटार गाड्यांचे उत्पादन करणारी अमेरिकन कंपनी आहे. फोर्डचे मुख्यालय मिशिगन राज्यातील डेट्रॉईट शहराच्या डियरबॉर्न ह्या उपनगरामध्ये आहे. हेन्री फोर्ड ह्या अमेरिकन उद्योगपतीने जून १९०३ मध्ये फोर्डची स्थापना केली. एकूण कार विक्रीच्या बाबतीत फोर्ड ही जगातील चौथी मोठी कंपनी (टोयोटा, जनरल मोटर्सफोक्सवॅगन ह्या पहिल्या तीन कंपन्या) आहे.

फोर्ड मोटर कंपनी
प्रकार सार्वजनिक
उद्योग क्षेत्र प्रवासी मोटार कार
स्थापना जून १६, १९०३
संस्थापक हेन्री फोर्ड
मुख्यालय डियरबॉर्न, मिशिगन, Flag of the United States अमेरिका
महत्त्वाच्या व्यक्ती ऍलन मुलाली
महसूली उत्पन्न १४६ अब्ज डॉलर्स
एकूण उत्पन्न
(कर/व्याज वजावटीपूर्वी)
३० अब्ज डॉलर्स
कर्मचारी अंदाजे २.१३ लाख
संकेतस्थळ फोर्ड.कॉम