कार्मेन मार्गारिटा झपाटा (१५ जुलै, १९२७:न्यू यॉर्क शहर, अमेरिका - ५ जानेवारी, २०१४:लॉस एंजेल्स, कॅलिफोर्निया, अमेरिका) ही अमेरिकन नाट्य, दूरचित्रवाणी आणि चित्रपट अभिनेत्री होती.

झपाटाने १९४६मध्ये ब्रॉडवेवरील ओक्लाहोमा! या संगीतनाटकात पहिल्यांदा काम केले. तिने १००पेक्षा अधिक चित्रपटांतून आणि डझनावारी दूरचित्रवाणी मालिकांमधून अभिनय केला.

झपाटा स्क्रीन ॲक्टर्स गिल्ड या अभिनेत्यांच्या हक्कांचे रक्षण करणाऱ्या संस्थेत कार्यरत होती.

कार्मेन झपाटाचे वडील हुलियो झपाटा हे मेक्सिकोतून तर आई रमोना रोका ही आर्जेन्टिनातून स्थलांतरित झालेले अमेरिकन नागरिक होते.