इ.स. २०१४
इ.स. २०१४ हे इसवी सनामधील २०१४वे, २१व्या शतकामधील १४वे तर २०१० च्या दशकामधील पाचवे वर्ष आहे.
सहस्रके: | इ.स.चे ३ रे सहस्रक |
शतके: | २० वे शतक - २१ वे शतक - २२ वे शतक |
दशके: | १९९० चे - २००० चे - २०१० चे - २०२० चे - २०३० चे |
वर्षे: | २०११ - २०१२ - २०१३ - २०१४ - २०१५ - २०१६ - २०१७ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
संपादन- जानेवारी १ - लात्व्हिया देश युरो चलनाचा स्वीकार करेल.
- फेब्रुवारी ७-१४ - २०१४ हिवाळी ऑलिंपिक स्पर्धा रशियाच्या सोत्शी शहरामध्ये खेळवली गेली.
- मार्च ७ - मलेशिया एरलाइन्स फ्लाइट ३७० हे बोईंग ७७७ प्रकारचे विमान कुआलालंपुरपासून बीजिंगला चाललेले असताना २३९ प्रवासी व कर्मचाऱ्यांसह नाहीसे झाले.
- मे २ - अफगाणिस्तानच्या बदख्शान प्रांतात दोन दरडी कोसळून २,१०० व्यक्ती ठार. इतर शेकडो बेपत्ता.
- मे २० - लोकसभा निवडणुकांत बहुमत मिळवून भारतीय जनता पक्ष भारतात सत्तेवर. नरेन्द्र मोदीची पंतप्रधानपदी नेमणूक.
- जून १२-जुलै १३ - २०१४ फिफा विश्वचषक ब्राझील देशामध्ये खेळवला जाईल.
- जुलै १७ - युक्रेनपासून स्वातंत्र्य मागणाऱ्या रशियाधार्जिण्या दहशतवाद्यांनी मलेशियन एरलाइन्सचे विमान पाडले. २९८ ठार.
- जुलै २३ - ट्रान्सएशिया एरवेझ फ्लाइट २२ हे एटीआर ७२-५०० प्रकारचे विमान मगॉंग पेंघू विमानतळावर उतरताना पडले. ४८ ठार.
- जुलै २४ - एर अल्जेरी फ्लाइट ५०१७ हे मॅकडोनेल डग्लस एमडी-८३ प्रकारचे विमान मालीमध्ये कोसळले. ११६ ठार.
- जुलै ३० - पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर दरड कोसळून ५० पेक्षा अधिक ठार.
- ऑगस्ट ३ - चीनच्या युनान प्रांतात झालेल्या भूकंपामुळे ३९८ ठार.
- ऑक्टोबर १५ - भारतातील महाराष्ट्र व हरियाणा राज्यात विधानसभा निवडणूका पार पडल्या.
- ऑक्टोबर १९ - महाराष्ट्र व हरियाणा राज्यातील विधानसभा निवडणूकांचे निकाल जाहीर. हरीयाणात भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत तर महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला बहुमताला २० जागा कमी.
- ऑक्टोबर ३१ - भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे १८ वे मुख्यमंत्री झाले.
- नोव्हेंबर २ - भारत आणि पाकिस्तानमधील सरहद्दीवर असलेल्या वाघा चेकपोस्टवर पाकिस्तानच्या बाजूला आत्मघातकी दहशतवाद्याने घडवलेल्या स्फोटात ५२ ठार, २०० जखमी.
- डिसेंबर १६ - पाकिस्तानी तालिबानने पेशावरमधील एक लष्करी शाळेवर हल्ला चढवून १३२ विद्यार्थ्यांना ठार मारले.
जन्म
संपादनमृत्यू
संपादन- ११ जानेवारी - एरियेल शॅरन, इस्रायलचा ११वा पंतप्रधान
- २० ऑगस्ट - बी.के.एस.अय्यंगार,योगविद्येची कीर्ती जगभर पसरवणारे योगाचार्य
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |