डिसेंबर २० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३५४ वा किंवा लीप वर्षात ३५५ वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडी संपादन

सोळावे शतक संपादन

एकोणिसावे शतक संपादन

विसावे शतक संपादन

 • १९४५ - मुंबई - बंगलोर प्रवासी विमानसेवा सुरू
 • १९७१ - झुल्फिकार अली भूट्टो हे पाकिस्तानचे चौथे राष्ट्राध्यक्ष बनले.
 • १९८८ - मतदानाचे किमान वय २१वरून १८वर आणणारी ६१वी घटनादुरुस्ती संसदेत मंजूर.
 • १९९४ - राष्ट्रपती डॉ. शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते मलेशियाचे पंतप्रधान डॉ. महाथीर मोहम्मद यांना आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठीचा ’जवाहरलाल नेहरू पुरस्कार’ प्रदान

एकविसावे शतक संपादन

जन्म संपादन

 • १५३७ - जॉन तिसरा, स्वीडनचा राजा.
 • १९४० - यामिनी कृष्णमूर्ती – भरतनाट्यम व कथ्थक नर्तिका, पद्मश्री
 • १९४२ - राणा भगवानदास – पाकिस्तानातील पहिले ’हिन्दू’ मुख्य न्यायाधीश (Chief Justice)

मृत्यू संपादन

 • २१७ - पोप झेफिरिनस.
 • १७३१ - छत्रसाल बुंदेला – बुंदेलखंडचा महाराजा
 • १९१५ - लेखक, समाजसुधारक व भारतीय छपाईतंत्रात महत्त्वाचे बदल आणणारे उपेंद्रकिशोर रॉयचौधरी
 • १९३३ - विष्णू वामन बापट – संस्कृत विद्वान, भाषांतरकार व शास्त्रसुधारक, शंकराचार्यांच्या ग्रंथांचे व इतर संस्कृत ग्रंथांचे मराठीत अनुवाद केले.
 • १९५६ ‌ - देबुजी झिंगराजी जानोरकर ऊर्फ ’संत गाडगे महाराज’ – कमालीचे अज्ञान, अनिष्ट चालीरीती व अंधश्रद्धा पाहून त्यांनी निरपेक्ष सेवेचे व्रत घेतले आणि त्यासाठी कीर्तनाचे माध्यम प्रभावीपणे वापरले.
 • १९८१ - संगीत दिग्दर्शक कनु रॉय
 • १९९३ - वामन नारायण तथा डब्ल्यू. एन. भट – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे छायाचित्रकार
 • १९९६ - दगडू मारुती तथा ’दया’ पवार – ’बलुतं’कार दलित लेखक
 • १९९८ - बंगळुरू वेंकट तथा बी. व्ही. रमण – जागतिक कीर्तीचे फलज्योतिषी
 • २००४ - पोलीसकथालेखक व. कृ. जोशी
 • २००९ - कवी अरुण कांबळे
 • २०१० - सुभाष भेंडे – लेखक
 • २०१० - नलिनी जयवंत – अभिनेत्री

प्रतिवार्षिक पालन संपादन

 • मानवी ऐक्यभाव दिन.

बाह्य दुवे संपादनडिसेंबर १८ - डिसेंबर १९ - डिसेंबर २० - डिसेंबर २१ - डिसेंबर २२ - (डिसेंबर महिना)