डिसेंबर २२
दिनांक
<< | डिसेंबर २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ | २९ | ३० | ३१ |
डिसेंबर २२ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३५६ वा किंवा लीप वर्षात ३५७ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
संपादनसतरावे शतक
संपादन- १६०३ - ऑट्टोमन साम्राज्याचा सुलतान महमद तिसरा याचा मृत्यू. अहमद पहिला सुलतानपदी.
एकोणिसावे शतक
संपादन- १८०७ - अमेरिकन काँग्रेसने एम्बार्गो ऍक्ट केला. अमेरिकेचे बाहेरच्या जगाशी व्यापारी संबंध संपुष्टात.
- १८०९ - अमेरिकन काँग्रेसने नॉन इंटरकोर्स ऍक्ट केला. एम्बार्गो ऍक्ट रद्द. युनायटेड किंग्डम व फ्रांस शिवाय अमेरिकेचे बाहेरच्या जगाशी व्यापारी संबंध परत सुरू.
- १८५१ - जगातील पहिली मालगाडी भारतात रूडकी येथे चालविली गेली.
- १८६४ - विल्यम टेकुमेश शेर्मनची समुद्रास कूच समाप्त. सवाना, जॉर्जिया युनियन सैन्याने काबीज केले.
- १८८५ - इटो हिरोबुमी जपानचा पहिला सामुराई पंतप्रधान झाला.
विसावे शतक
संपादन- १९०९ - भारतीय क्रांतिकारी अनंत कान्हेरेनी नासिकचा जिल्हाधिकारी जॅक्सनची गोळ्या घालून हत्या केली.
- १९३७ - न्यू यॉर्कमध्ये लिंकन टनेल वाहतुकीसाठी खुली.
- १९६३ - क्रुझ शिप लाकोनिया मडेरापासून २९० कि.मी. उत्तरेस जळाली. १२८ ठार.
- १९५३ - राज्य पुनर्रचनेसाठी भारतात उच्चाधिकार समिती स्थापन. यातून पुढे भाषावार प्रांतरचना झाली.
- १९७२ - अँडीज पर्वतराजीत विमान कोसळल्यानंतर दहा आठवड्यांनी १४ प्रवासी जिवंत सापडले. त्यांनी काही काळ मानवी मांसावर गुजराण केली होती.
- १९८९ - आठवडाभर चाललेल्या दंगल व जाळपोळीनंतर हुकूमशहा निकोलाइ चाउसेस्क्युने रोमेनियाचे राष्ट्राध्यक्षपद सोडले. शीतयुद्धाच्या अखेरीला कम्युनिस्ट राष्ट्रे कोसळण्यामध्ये एक महत्त्वाचा टप्पा.
- १९८९ - बर्लिनचे ब्रॅन्डेनबर्ग गेट ३० वर्षांनी खुले. पूर्व आणि पश्चिम जर्मनीची फाळणी संपुष्टात.
- १९९५ - प्रसिद्ध रंगकर्मी के. एन. पणीक्कर यांना मध्य प्रदेश सरकारचा ’कालिदास सन्मान’ जाहीर
- १९८४ - न्यू यॉर्कच्या भुयारी रेल्वेत बर्नार्ड ह्युगो गोत्झने चार गुंडांना गोळ्या घातल्या.
- १९८९ - आठवडाभर चाललेल्या दंगल व जाळपोळीनंतर निकोलाइ चाउसेस्क्युने रोमेनियाचे अध्यक्षपद सोडले. इयोन इलेस्क्यु अध्यक्षपदी.
- १९८९ - बर्लिनचे ब्रांडेनबर्ग गेट ३० वर्षांनी खुले. पूर्व आणि पश्चिम जर्मनीची फाळणी संपुष्टात.
- १९९० - लेक वालेंसा पोलंडच्या अध्यक्षपदी.
- १९९९ - स्पेनच्या नागरी रक्षकांनी ७५० कि.ग्रॅ. वजनाची विस्फोटके असलेली अजुन एक गाडी पकडली. (पहा डिसेंबर २१)
- १९९९ - तांद्जा ममदु नायजरच्या राष्ट्राध्यक्षपदी.
एकविसावे शतक
संपादन- २००१ - काबुल, अफगाणिस्तानमध्ये बुरहानुद्दीन रब्बानीने सत्तेची सूत्रे हमीद करझाईला दिली.
- २००१ - रिचार्ड रीड या दहशतवाद्याने अमेरिकन एरलाइन्स फ्लाइट ६३मध्ये आपल्या बुटात लपविलेली स्फोटके उडविण्याचा प्रयत्न केला.
जन्म
संपादन- ११७८ - अंतोकु, जपानी सम्राट.
- १६६६ - गुरू गोबिंद सिंघ, शिख धर्मगुरू.शिखांचे १० वे गुरू
- १८८७ - श्रीनिवास रामानुजन, भारतीय गणितज्ञ.’पार्टिशन फंक्शन’च्या रचनेवर त्यांनी मूलभूत संशोधन केले.
- १९०३ - आबासाहेब तथा भालचंद्र दिगंबर गरवारे, भारतीय उद्योगपती.
- १९१२ - लेडी बर्ड जॉन्सन, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष लिंडन बी. जॉन्सनची पत्नी.
- १९७२ - व्हेनेसा पॅरेडिस, फ्रेंच गायिका.
मृत्यू
संपादन- १६०३ - महमद तिसरा, ऑट्टोमन सुलतान.
- १८८० - जॉर्ज इलियट, ब्रिटिश लेखिका(टोपण नाव).
- १९४५ - श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी तथा ’’पठ्ठे बापूराव’’, मराठी लावणीलेखख.
- १९७५ - वसंत देसाई, भारतीय संगीतकार.
- १९७९ - नरहर रघुनाथ फाटक, भारतीय ईतिहास संशोधक, संत साहित्याचे अभ्यासक.
- १९९५ - जेम्स मीड, अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिकविजेता
- १९९७ - पी. सावळाराम, भावगीतकार, ठाण्याचे नगराध्यक्ष.
- १९९७ - पंडित प्रभाशंकर गायकवाड, सनईवादक.
प्रतिवार्षिक पालन
संपादन- तोजी - जपान.
- मातृदिन - इंडोनेशिया.
- गणित दिन (भारत).
- सूर्याच्या उत्तरायणास प्रारंभ
- उत्तर गोलार्धात वर्षातील सर्वात छोटा दिवस
बाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर डिसेंबर २२ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
डिसेंबर २० - डिसेंबर २१ - डिसेंबर २२ - डिसेंबर २३ - डिसेंबर २४ - (डिसेंबर महिना)