संत साहित्य
पद्यप्रकारानुसार सूची
संपादनकाव्यरचना करणारे संत
संपादनसंतांचे लेखनिक
संपादनजेव्हा व्यासांनी महाभारत सांगायला सुरुवात केली, तेव्हा प्रत्यक्ष गणेशाने ते लिहून घेतले असे सांगितले जाते. संत कितीही अलौकिक प्रतिभेचे असले तरी त्यांना स्वतः रचलेले काव्य स्वतःच लिहून घेता आले असेलच असे नाही. त्यांना लेखनिकाची गरज भासली असणार. काही अशा संतांची नावे आणि त्यांचे ज्ञात लेखनिक :-
- कर्ममेळा (वसुदेव काईत)
- चांगदेव (शामा कासार)
- चोखामेळा (अनंतभट्ट अभ्यंग)
- तुकाराम (संताजी जगनाडे)
- दासगणू (संत छगनकाका आणि दामोदर आठवले)
- जनाबाई (प्रत्यक्ष पांडुरंग)
- निवृत्तिनाथ (सोपानदेव)
- जोगा परमानंद (विसोबा खेचर)
- मुक्ताबाई (ज्ञानेश्वर)
- सावता माळी (काशिबा गुरव)
- ज्ञानेश्वरी (सच्चिदानंद बाबा)
- रामदास (कल्याणस्वामी)
संतसाहित्यावर अनेक मराठी लेखकांनी असंख्य ग्रंथ लिहिले आहेत, त्यांपैकी काही हे :
- अभंगसागरातील दीपस्तंभ (संतसाहित्याचा तौलनिक अभ्यास, लेखिका - डाॅ. सुहासिनी इर्लेकर)
- जनाबाईचे निवडक अभंग (संतसाहित्यपर, लेखिका - डाॅ. सुहासिनी इर्लेकर)
- आद्य मराठी आत्मचरित्रकार संत नामदेव (डाॅ. सुहासिनी इर्लेकर)
- नामदेवकृत ज्ञानेश्वरचरित्र (ग्रंथपरिचय, लेखिका - डाॅ. सुहासिनी इर्लेकर)
- मुक्तीकडून मुक्तीकडे (संत मुक्ताबाईचे व्यक्तिचित्रण, लेखिका - डाॅ. सुहासिनी इर्लेकर)
- संत कवि आणि कवयित्री : एक अनुबंध (साहित्य आणि समीक्षा, लेखिका - डाॅ. सुहासिनी इर्लेकर)
- संत साहित्य - एक रूपवेध (लेखिका - डाॅ. सुहासिनी इर्लेकर)
- समर्थ रामदासांची करुणाष्टके (ग्रंथपरिचय आणि रसग्रहण, लेखिका डाॅ. सुहासिनी इर्लेकर)
- ज्ञानियांचा राजा (संत साहित्याचे सखोल विवेचन, लेखिका डाॅ. सुहासिनी इर्लेकर)