चांगदेव हे महाराष्ट्रातील नाथपंथी कवी आणि संत होते. 

चांगदेव
ख्याती संत, योगी
धर्म हिंदु

चांगदेव हे योगमार्गातील अधिकारी पुरुष होते. योगसामर्थ्याने ते चौदाशे वर्षे जगले अशी मान्यता आहे. यांच्या गुरूचे नाव वटेश्वर म्हणून यांना चांगावटेश्वर असेही म्हणतात. काहींच्या मते वटेश्वर म्हणजे चांगदेवांच्या अंतरंगात प्रकाशणारे ईश्वराचे रूप). तापी-पूर्णा नदीच्या तीरावर चांगदेव या गावाजवळच्या वनात डोळे बंद करून तपश्चर्या करीतच हे योगी झाले होते. त्यांच्या चांगल्या रूपावरून लोक त्यांना चांगदेव म्हणू लागले.

एकदा त्‍यांच्या कानावर संत ज्ञानेश्वराची कीर्ती पडली तेव्हा त्यांना ज्ञानेश्वरांच्या भेटीची उत्कंठा लागली, भेटण्यापूर्वी पत्र पाठवावे असा विचार करून त्यांनी पत्र लिहिण्यास घेतले पण मायना काय लिहावा या संभ्रमातून त्यांनी कोरेच पत्र पाठविले. योगी असूनही चांगदेवांमध्ये आत्मज्ञानाची आणि गुरुकृपेची कमतरता आहे असे निवृत्तीनाथांच्या लक्षात आले. त्यांनी ज्ञानेश्वरांना पत्राचे उत्तर लिहिण्यास सांगितले. त्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी जे उत्तर लिहिले ते चांगदेव पासष्टी या नावाने प्रसिद्ध झाले. त्यानंतर चांगदेव, निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, मुक्ताबाईसोपान यांची भेट झाली. पुढे चांगदेवांनी मुक्ताबाईंना गुरू मानले. सन १३०५ (शके १२२७)मध्ये चांगदेवांनी समाधी घेतली. (या तारखेबद्दल अनेक मतभेद आहेत.)


जेव्हा योगी चांगदेव ज्ञानेश्वरांना भेटण्यासाठी येत होते तेव्हा ते आपल्या योग सिद्धीचा बळावर वाघावर सवार झाले सोबतच हातात नाग घेऊन आपल्या शिष्यांसोबत ज्ञानेश्वरांकडे आले.भेटीगाठीचा वेळी ज्ञानेश्वर आपल्या भावंडांसोबत एका भिंतीवर बसलेले होते चांगदेवांना बघून त्यांना त्याचा अहंकाराची जाणीव झाली याच्यातून चांगदेव मुक्त व्हाव  त्यासाठी ज्ञानेश्वरांनी आपल्या दिव्य साधनेचा बळावर भिंतीला पुढे चालण्याचे आदेश दिले आणि काय आश्चर्य ? भिंत आपल्या जागेवरून पुढे सरकू लागली,हा चमत्कार पाहून चांगदेव महाराज अचंभित झाले व ज्ञानेश्वरांना शरण गेले.

पुढे निवृत्ती नाथांनी चांगदेवांना आपल्या धाकट्या बहिणीचं शिष्य व्हावं अशी आज्ञा दिली.

चांगदेवांसंबंधी पुस्तके

संपादन
  • चांगदेव (चरित्र, लेखक ज.र. आजगावकर)
  • योगी चांगदेवाचा तत्त्वसार (लेख - विनायकराव कळमळकर)
  • चांगदेव वटेश्वरकृत तत्त्वसाराची समाप्ति-तिथी (लेख - स.ल. कात्रे)
  • शामजी गोसावी मरुद्गणकृत चांगदेव चरित्र (संपादक वि.ल. भावे
  • यांशिवाय रा.चिं. ढेरे, बा.ना. मुंडी, पांडुरंगशर्मा, द.ग. काळे, गो.का. चांदोरकर आदींचे संशोधनलेख

चांगदेवांनी केलेले लेखन

संपादन
  • ज्ञानदेव गाथेतील ७७ अभंग
  • तत्त्वसार हा ग्रंथ (४०४ ओव्या)
  • मुद्रित स्वरूपात न आलेली काही स्फुट पदे, अभंग आणि ओव्या, वगैरे.

मंदिर

संपादन

चांगदेव महाराजांचे मंदिर : गाव - चांगदेव, [[मुक्ताईनगर‌ तालुका|], जळगाव जिल्हा

चांगदेव महाराज समाधी मंदिर - गोदावरी नदी किनारी: गाव-पुणतांबा, तालुका : राहता, जिल्हा: अहमदनगर.

चांगदेव राऊळ

संपादन

चक्रधरस्वामींच्या काळात होऊन गेलेले (पंचावतारातला चौथा अवतार समजले गेलेले) चांगदेव राऊळ उपाख्य चक्रपाणी हे वेगळे चांगदेव आहेत.