जळगाव जिल्हा

भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा.

जळगाव जिल्हा महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे. जळगाव शहर हे जळगाव जिल्हा येथील प्रशासकीय केन्द्र आहे[२]

जळगाव जिल्हा
महाराष्ट्र राज्याचा जिल्हा

१८° ३९′ ००″ N, ७५° ०६′ ००″ E

देश भारत ध्वज भारत
राज्य महाराष्ट्र
विभागाचे नाव नाशिक विभाग
मुख्यालय जळगाव
तालुके जळगाव, मुक्ताईनगर ऐरंडोल,जामनेर, भुसावळ, यावल, जामनेर, पाचोरा, अमळनेर, चोपडा, भडगाव, पारोळा, धरणगाव चाळीसगाव,बोदवड.
क्षेत्रफळ ११,७६५ चौरस किमी (४,५४२ चौ. मैल)
लोकसंख्या ४२,२४,४४२ (२०११)
लोकसंख्या घनता ३१३ प्रति चौरस किमी (८१० /चौ. मैल)
साक्षरता दर ७९.७३%
लिंग गुणोत्तर ९२२ /
प्रमुख शहरे भुसावळ, जळगाव, मुक्ताईनगर, वरणगाव, चाळीसगाव, पारोळा
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत
लोकसभा मतदारसंघ जळगाव (लोकसभा मतदारसंघ), रावेर (लोकसभा मतदारसंघ)
विधानसभा मतदारसंघ मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ
किमान पर्जन्यमान रुपांतरण त्रूटी: मूल्य "६९० ° से. [१]" अंकातच आवश्यक आहे
संकेतस्थळ


हा लेख जळगाव जिल्ह्याविषयी आहे. जळगाव शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या
जळगाव जिल्हा

परिचयसंपादन करा

[ संदर्भ हवा ]

जळगाव जिल्ह्यास पूर्वी पूर्व खानदेश हे नाव होते. जिल्ह्याच्या उत्तरेस मध्य प्रदेश, पूर्वेस बुलढाणा जिल्हा, आग्नेयेस जालना जिल्हा, दक्षिणेस औरंगाबाद जिल्हा , नैर्ऋत्येस नाशिक जिल्हा तर पश्चिमेस धुळे जिल्हा आहे. जिल्ह्यात ठिबक सिंचनाद्वारे केळी व कापसाची शेती केली जाते. ही शेती भारतातील इतर शेतकर्‍यांसाठी एक आदर्श उदाहरण आहे. जळगाव जिल्हा हा भारतातील सर्वाधिक केळी-उत्पादक जिल्हा आहे.

जळगाव जिल्ह्याचे क्षेत्रफळ ११,७०० चौरस किमी आहे तर लोकसंख्या ३,६७९,९३६ आहे. जिल्ह्याच्या उत्तरेस सातपुडा तर दक्षिणेस अजंठा पर्वतरांगा आहेर. जळगाव जिल्ह्यातील ज्वालामुखी (volcanic) मृदा ही कापूस लागवडीसाठी उपयुक्त आहे. जळगाव जिल्हा हा चहा, सोने, कडधान्ये, कापूस व केळी या पदार्थांसाठीचे महत्त्वाचे व्यापारी केंद्र आहे. मराठी भाषेबरोबरच येथे मराठीची बोलीभाषा असलेली अहिराणीदेखील बोलली जाते. जिल्ह्यात सरासरी ६९० मिलिमीटर इतका पाऊस पडतो.

जिल्ह्यातील प्रमुख नद्या- तापी, पूर्णा, गिरणा, वाघूर,अंजनी

प्रसिद्ध कवी बालकवी व कवयित्री बहिणाबाई चौधरी ह्या जळगाव जिल्ह्यातील होत्या तर साने गुरुजी ह्यांची हा जिल्हा ही कर्मभूमी होती.

 
जळगाव जिल्ह्याचा नकाशा

इतिहाससंपादन करा

१९०६ पूर्वी इंग्रजाच्या राज्यात जळगाव जिल्ह्याचे नाव खान्देश जिल्हा होते[३] खान्देश जिल्हा वर्तमान जळगाव जिल्हा,धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा आणि नाशिक जिल्ह्याचा काही भाग मिळून बनलेला होता आणि धुळे शहर हे खान्देश जिल्हाचे जिल्ह्याचे ठिकाण होते.

१९०६ ला खानदेश जिल्ह्याच विभाजन करण्यात आल आणि दोन नवीन जिल्हे बनवले गेले ; पूर्व खान्देश आणि पश्चिम खान्देश[४] पूर्व खान्देश मध्ये अताचा जळगाव जिल्हा होता तर पश्चिम खान्देश मध्ये अता अस्तित्वात असलेले धुळे आणि नंदुरबार जिल्हे होते. पुढे १९५० च्या काळात पूर्व खान्देश बॉम्बे राज्याचा भाग बनलापूर्व खान्देश हा १० तालुके आणि ३ पेठे मिळून बनलेला होता. त्यावेळेस पेठा हा तालुक्यामधील उपभाग होता.१०/१०/१९६० ला महाराष्ट्रच्या निर्मिती नंतर महाराष्ट्र शासनाने पूर्व खान्देश ला जळगाव जिल्ह्य महणून नाव बदलले.१९६० नंतर पूर्व खान्देश जिल्ह्याचे नाव जळगाव जिल्हा ठेवण्यात आले[५].

तालुकेसंपादन करा

जळगाव जिल्ह्यात पुढील १५ तालुक्यांचा समावेश होतो.
अमळनेर, एरंडोल, चाळीसगाव, चोपडा, जळगाव तालुका, [जामनेर]], धरणगाव, पाचोरा, [[[पारोळा]], [[बोदवड], भडगांव, भुसावळ, मुक्ताईनगर, यावलरावेर.

भूगोलसंपादन करा

जळगाव जिल्ह्यात पूर्णा नदी आहे. जिल्ह्याच्या उत्तरेस सातपुडा पर्वत आहे जिल्ह्याची समुद्रसपाटीपासून उंची २२६ मी.

जळगाव जिल्ह्यात  बांधकामासाठी लागणारा दगड, मुरूम आणि वाळू अशी खनीजे आहेत[६]

जळगाव जिल्ह्याच्या पूर्व सीमेला बुलढाणा जिल्हा लागून आहे तर उत्तरेस मध्य प्रदेश राज्य आहे. जिल्ह्याच्या पश्चिम सीमेला धुळे जिल्हा आहे आणि दक्षिणेस औरंगाबाद जिल्हा आहे[७]जिल्ह्याच्या उत्तर सीमेवर सातपुडा पर्वत असून या भागात जंगलांचे प्रमाण जास्त आहे[८]

धुळे नागपूर राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्याला धुळे नागपूरला जोडतो.

जिल्ह्यात हवाई मार्गाने दळण-वळणा साठी जळगाव विमानतळ आहे.ते जळगाव मध्ये आहे.

साहित्यसंपादन करा

प्रसिद्ध मराठी कवित्री बहिणाबाई चौधरी या जळगाव जिल्ह्यातील होत्या. त्यांच्या ग्रामीण जीवनावरील कविता महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत. बहिणाबाईंच्या सन्मानार्थ जळगाव येथील विद्यापीठाचे नाव कावित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ ठेवण्यात आले[९]बालकवी त्र्यंबक बापुजी ठोंबरे हे जळगाव जिल्ह्यातील होते.

प्रशासनसंपादन करा

जळगाव शहर येथ जळगाव जिल्ह्याचे मुख्यालय आहे. सध्या अविनाश ढाकणे हे येथे जिल्हाअधिकारी आहेत[१०]जळगाव जिल्हा हा अनेक तालुक्यांमध्ये विभागलेला आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये तहसीलदार हा मुख्य प्रशासकीय अधिकारी आहे.

जळगाव जिल्ह्यात एक महानगर पालिका आहे ती म्हणजे जळगाव महानगर पालिका.जळगाव जिल्ह्यात एक जिल्हा परिषद आहे ती आहे जळगाव जिल्हा परिषद. जिल्ह्यात १३ नगरपालिका आहेत त्या आहेत जामनेर, पाचोरा, भुसावळ, यावल, रावेर, पारोळा, एरंडोल, चाळीसगाव आणि चोपडा इत्यादी. जिल्ह्यात १५ पंचायत समित्या आहेत त्या आहेत चाळीसगाव, भडगाव, धरणगाव, पारोळा, अमळनेर, एरंडोल, चोपळा, जळगाव, पाचोरा, जामनेर, यावल, रावेर,भुसावळ, मुक्ताईनगर आणि बोदवड[११]

महत्त्वाची पिकेसंपादन करा

जळगाव जिल्हा केळीच्या पिकासाठी आणि ऊत्पादनासाठी संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. ज्वारी, कापुस, ऊस, मका, तुळ हे जिल्ह्यातील महत्त्वाचे अन्नधान्याचे पीक असून त्यासोबत गहू व बाजरीचेही पीक घेतले जाते. कापूस हे जिल्ह्यातील प्रमुख नगदी पीक आहे. तेलबियांमध्ये प्रामुख्याने भुईमुग व तीळ ही पिके असून केळी उत्पादनासाठी जळगाव जिल्हा प्रसिद्ध आहे. या जिल्ह्यात ईडलिंबू, कागदी लिंबू, चिकू, टरबूज, द्राक्षे, पपया, बोरे, मेहरूणची बोरे, मोसंबी, सिताफळ, इत्यादी फळांचेही उत्पादन घेतले जाते. कडधान्यांपैकी उडीद, चवळी, तूर, मटकी, मूग, हरभरा इत्यादींचे उत्पादन जळगाव जिल्ह्यात होते.

बाजारपेठसंपादन करा

जळगाव जिल्हा ही सोने व डाळीची प्रमुख बाजारपेठ आहे.

जिल्ह्यातील पर्यटनस्थळेसंपादन करा

 • शिरसाळा मारोती मंदिर (मुक्ताईनगर जवळ,तालुका - बोदवड)
 • उनपदेव-सुनपदेव (चोपडा) गरम पाण्याचे झरे
 • ओंकारेश्वर मंदिर (जळगाव शहर)
 • श्री राम मंदिर (जुने जळगाव)
 • चाळीसगाव तालुक्यातील काली मठ व गंगाश्रम
 • संत चांगदेव मंदिर
 • अमळनेर येथील साने गुरुजींचे तत्त्वज्ञान मंदिर
 • श्री पद्मालय, एरंडोल (अडीच गणेश पीठांपैकी अर्धे पीठ)
 • चाळीसगाव तालुक्यातील पाटणादेवी (थोर गणिती भास्कराचार्य यांचे जन्मस्थळ व पाटणादेवी देवस्थान)
 • पारोळा येथील भुईकोट किल्ला (झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या वडिलांचा किल्ला)
 • पाल (रावेर तालुका)-थंड हवेचे ठिकाण
 • फारकंडे मनोरा
 • अमळनेर येथील भुईकोट किल्ला
 • यावल येथील भुईकोट किल्ला
 • वढोदा येथील प्राचीन मच्छिंद्रनाथ मंदिर
 • मनुदेवी मंदिर
 • संत मुक्ताबाई मंदिर (मुक्ताईनगर)
 • संत सखाराम महाराज मंदिर (अमळनेर)
 • गांधीतीर्थ (जळगांव शहर)
 • मेहरुण तलाव
 • वाघूर डॅंम
 • कांताई बंधारा(जळगाव)
 • आर्यन पार्क (जळगाव)
 • गांधी उद्यान (जळगांव शहर)
 • गणपती मंदिर (तरसोद)
 • गोशाळा (कुसूंबा)
 • साई बाबा मंदिर (पाळधी)
 • श्री कृष्णा मंदिर(वाघळी)
 • अप्पा महाराज समाधी मंदिर (जळगाव शहर)

हवामानसंपादन करा

जळगाव जिल्ह्यातील हवामान विषम व कोरड्या स्वरूपाचे आहे. त्या त्या काळात कडक थंडी आणि अतिउष्ण उन्हाळा असे हवामान या जिल्ह्यात असते. उन्हाळ्यात तापमान कमाल ४६° से पर्यंत वाढते[१२]

प्रमुख उद्योगधंदे व औद्योगिक क्षेत्रेसंपादन करा

जिनिंग व प्रेसिंग, साखर कारखाने, रेशीम कापड निर्मिती, वनस्पती तूप व तेल गिरण्या, वरणगाव व भुसावळ येथील युद्धसाहित्य निर्मिती, अन्नप्रक्रिया उद्योग इ.
औद्योगिक क्षेत्रे : जळगाव, चाळीसगाव, भुसावळ, पाचोरा, वरणगाव, अमळनेर, एरंडोल.

संदर्भसंपादन करा

 1. ंदर्भ
 1. ^ https://jalgaon.gov.in/mr/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A5%80/
 2. ^ https://jalgaon.gov.in/mr/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A5%80/
 3. ^ http://zpjalgaon.gov.in/AspxFiles/AboutDistrict.aspx
 4. ^ http://zpjalgaon.gov.in/AspxFiles/AboutDistrict.aspx
 5. ^ कॅम्पबेल, जेम्स म. (डिसेंबर १८८०). "खान्देश जिल्हा". बॉम्बे प्रेसिडेन्सी गझेटिर अंक १२ खान्देश. १२: १.
 6. ^ http://mahades.maharashtra.gov.in/files/publication/Jalgaondsa_2005_06.pdf&ved=2ahUKEwjP1NKi8r_pAhVKbysKHYENDiYQFjAHegQIAxAB&usg=AOvVaw3wtNPUN09sNoBMOs2MI3Kc&cshid=1589890182054
 7. ^ http://zpjalgaon.gov.in/AspxFiles/AboutDistrict.aspx
 8. ^ http://zpjalgaon.gov.in/AspxFiles/AboutDistrict.aspx
 9. ^ https://m.lokmat.com/jalgaon/bahinabai-chaudharys-philosophy-life/
 10. ^ http://epaperlokmat.in/articlepage.php?articleid=LOK_JLLK_20200515_1_7&width=105px
 11. ^ http://zpjalgaon.gov.in/AspxFiles/AboutDistrict.aspx
 12. ^ http://zpjalgaon.gov.in/AspxFiles/AboutDistrict.aspx