धुळे जिल्हा
या लेखात सत्यापनासाठी अतिरिक्त संदर्भ किंवा स्त्रोतांची आवश्यकता आहे. कृपया विश्वसनीय संदर्भ जोडून हा लेख सुधारण्यात मदत करा. स्रोतहीन सामग्रीला आव्हान दिले जाऊ शकते आणि काढले सुद्धा जाऊ शकते. |
धुळे जिल्हा हा उत्तर महाराष्ट्रातील एक प्रमुख जिल्हा मानला जातो. तापी नदी ही या जिल्ह्याची प्रमुख नदी आहे.
भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा. | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | भारतीय जिल्हे | ||
---|---|---|---|
स्थान | नाशिक विभाग, महाराष्ट्र, भारत | ||
राजधानी | |||
स्थापना |
| ||
लोकसंख्या |
| ||
क्षेत्र |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
धुळे जिल्ह्यात चार तालुके आहेत- धुळे, शिरपूर, साक्री व शिंदखेडा. धुळे जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ८०६१ चौ.किमी आहे. जिल्ह्याची सिमा पुर्वेकडे जळगाव जिल्हा, दक्षिणेकडे नाशिक जिल्हा, पश्चिमेकडे नंदुरबार जिल्हा व गुजरात राज्य आणि उत्तरेला मध्य प्रदेश राज्याला लागून आहे.
लोकसंख्या
संपादनया जिल्ह्याची लोकसंख्या २०,४८,७८१ इतकी असून त्यात पुरुष १०,५५,६६९ महिला ९,९२,११२ असे प्रमाण आहे. जिल्ह्याची साक्षरता ७४.६१% आहे. धुळे जिल्ह्यात मराठी व अहिराणी या भाषा बोलल्या जातात. धुळे जिल्ह्यात सोनगीर, नरडाणा,बोराडी , सांगवी, थाळनेर, पिंपळनेर, कुसुंबा, अर्थे, निजामपूर, दुसाणे, म्हसदी, मालपुर, कासारे, दहिवेल व कापडने ही महत्त्वाची गावे व उपनगर आहेत
पर्जन्यमान
संपादनजिल्ह्याचे तापमान कमाल ४३° सेल्सियस तर किमान ४° सेल्सियस इतके असून सरासरी पाऊस ६०० मिमी. इतका पडतो.
संस्कृती
संपादनजिल्ह्यात कीर्तन, टिपरी नृत्य, लोकनाट्य (तमाशा) या लोककला प्रसिद्ध आहेत.धुळे जिल्ह्यात मराठी व अहिराणी(खान्देशी) बोली बोलल्या जातात.
शेती व उद्योग
संपादनपाण्याच्या अभावामुळे धुळे जिल्ह्यात मोठया प्रमाणावर कोरडवाहू शेती केली जाते. बागायती शेतीचे प्रमाण फक्त १८१३ हेक्टरपुरतं मर्यादित आहे. शासनाच्या ११ मध्यमवर्गीय जलसिंचन प्रकल्पामुळे ५१,५९७ हेक्टर जमीन जलसिंचनाखाली आली आहे. अनेक गावात जिल्ह्यातील प्रमुख नद्यांमधून तसेच पांझरा कान नदीवरील अक्कलपाडा धरणामधून शेतीला पाणी पुरवठा केला जातो. प्रमुख पिके - ज्वारी, बाजरी, हरभरा, तूर, मूग, उडीद, कापूस, मिरची, गहू, ऊस ई . आहेत.धुळे जिल्हा हा येथील शुद्ध दुधाकरीता सर्वत्र प्रसिद्ध आहे. असे म्हणतात की, कधी काळी, दिल्लीमधील ग्राहक धुळ्याच्या दुधाकरीता वाट पाहत असत. धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा हे महाराष्ट्रातील एकमेव शहर आहे की जिथे, मक्यापासून ग्लुकोज, साखर आणि खाद्यतेल तसेच अन्य पदार्थ बनवले जातात. धुळे जिल्हा कापूस, मिरची, ज्वारी, बाजरी, भात, मिरची, ऊस, केळी, द्राक्ष ह्यांच्या उत्पादनाकरीता सर्वत्र प्रसिद्ध आहे. जिल्ह्यात २ मोठे उद्योग आहेत तर ९ मध्यम उद्योग व १३२ लघुद्योग संस्था आहेत.
वाहतूक
संपादनदळणवळणाची साधने-रेल्वे स्थानकांची संख्या: १२ (मध्य रेल्वे.-५, पश्चिम रेल्वे-७),रस्ते: राष्ट्रीय महामार्ग: धुळे जिल्ह्यातून राष्ट्रीय महामार्ग क्र.३ आणि क्र. ६ जातात.
पर्यटन स्थळे
संपादनलळिंग किल्ला, पूर्व पश्चिम गेलेल्या गाळणा टेकड्यावर लळिंग किल्ला आहे लळिंग कुरण, शिरपूरचे बालाजी आणि महादेव मंदिर, देवपूरचे स्वामीनारायण मंदिर, धरणे, शिरपूरचे बिजासन (विंध्यावासिनी) देवी मंदिर, नकाणे तलाव, एकवीरा देवी मंदिर, राजवाडे संशोधन मंडळ, नगांवचे दत्त मंदिर, तसेच पेढकाई देवी हे प्रसिद्ध देवस्थान आणि क्रांतीस्मारक हे धुळे जिल्यातील साळवे या गावी वसलेलं ऐतिहासिक ठिकाण.
धुळे जिल्यात साक्री येथे जगातील सर्वात मोठा सौर उर्जा प्रकल्प अस्तित्वात असून निजामपूर याठिकाणी पवनऊर्जा प्रकल्प आहे. या दोन्ही प्रकल्पांमुळे धुळे जिल्ह्याचे नाव जागतिक नकाशावर उमटले आहे. तसेच अनेक उद्योगधंदे धुळे जिल्ह्याकडे आकर्षित होत आहे. त्यामुळे धुळे जिल्यात उद्योगधंदे वाढण्यास मदत झाली आहे.काही प्रमाणात का होईना महाराष्ट्र राज्याचे वीज संकट कमी होण्यास मदत होत आहे. सदर प्रकल्प हा अपारंपरिक उर्जेचा असल्याने कुठल्याही प्रकारची नैसर्गिक हानी होत नसून, उर्जेचा जास्तीत जास्त वापर होईल व पर्यावरण संवर्धनास मोठी मदत होईल.
उल्लेखनीय लोक
संपादन- मनोज बदाले - राजस्थान रॉयल्सचे सह-मालक, इंडियन प्रीमियर लीग संघ [१]
- तुषार रायते - सुप्रसिद्ध उद्योजक तसेच नेक्स्टजेनडिजिहब ग्रुपचे संस्थापक आणि संचालक [२]
- सायली संजीव चांदसरकर - मराठी टीव्ही आणि चित्रपट अभिनेत्री [३]
- सुभाष रामराव भामरे - माजी. केंद्रीय रक्षा राज्यमंत्री [४] भाजप उपाध्यक्ष, धुळे लोकसभा खासदार
- अनिल अण्णा गोटे - एक भारतीय राजकारणी आणि माजी विधानसभेचे आमदार , धुळे शहरातून भाजपकडून दोनदा निवडून आले होते. [५]
- यशवंतराव सखाराम देसले - स्वातंत्र्यसैनिक आणि राजकारणी
- पल्लवी पाटील - मराठी चित्रपट अभिनेत्री
- ललित प्रभाकर - मराठी चित्रपट अभिनेत्री
- स्मिता पाटील - बॉलिवूड अभिनेत्री
- विश्वनाथ काशीनाथ राजवाडे - इतिहासकार, अभ्यासक, लेखक, भाष्यकार आणि वक्ते
- जयकुमार जितेंद्रसिंह रावल - माजी पर्यटन आणि रोजगार हमी योजना मंत्री, महाराष्ट्र, आमदार, शिंदखेडा- दोंडाईचा
- हरीश साळवे - भारताचे माजी सॉलिसिटर जनरल
- राम व्ही. सुतार - स्टॅच्यू ऑफ युनिटीचे शिल्पकार आणि विकासक
- अमरीश पटेल- विधानपरिषद आमदार, माजी शिक्षण मंत्री
- मुकेश पटेल- माजी खासदार, धुळे
बाह्य दुवे
संपादनसंदर्भ
संपादन- ^ "We wanted strong Indian core and we got it: Royals owner Badale". indianexpress.com.
- ^ "Tushar Rayate transforming the rural atmosphere with 'NextgenDigiHub'". www.mid-day.com.
- ^ "Sayali Sanjeev pens an emotional note post her father's demise last month". timesofindia.indiatimes.com.
- ^ "Lok Sabha Election 2019: Union Minister Subhash Bhamre in triangular fight in Dhule". dnaindia.com.
- ^ "BJP rebel Anil Gote joins NCP". asianage.com.