ज्वारी (इंग्रजी Sorghum bicolour) ह एक धान्यप्रकार आहे. हे एक भरड धान्य आहे. यास जोंधळा असेही म्हणतात. या वनस्पतीला इंग्रजीत Great millet असे म्हणतात.

इतिहास

संपादन

याचा उगम आफ्रिका खंडाच्या पूर्व भागात झाला असे मानतात. एका मतानुसार ज्वारी इस पूर्व ११ व्या शतकात आफ्रिकेतून भारतात आली असे मानले जाते. परंतु द्वारका येथे झालेल्या उत्खननात, सुमारे पाच हजार वर्षांपुर्वीच्या एका जात्याच्या भागात सापडलेल्या पुराव्यावरून ज्वारीची शेती भारतात किमान पाच हजार वर्षांपासून अस्त्तित्वात आहे असे सिद्ध झाले आहे. भारतात मोठ्या प्रमाणावरती हे पिक घेतले जाते .

लागवड

संपादन
 
ज्वारी

विषुववृत्तापासून ४५ अक्षांशांपर्यंत ज्वारी या पिकाची लागवड होते. यास उष्ण हवामान मानवते. ज्वारीची लागवड आफ्रिका खंडात सर्वत्र आढळते. तसेच भारत, चीन, अमेरिका येथे मोठ्या प्रमाणावर होते. जगातील मोठ्या लोकसंख्येचे हे एक महत्त्वाचे अन्न उत्पादन आहे. भारतात मोठ्या भागात लोकांच्या आहाराचा प्रमुख भाग आहे.

उपयोग

संपादन

कोवळ्या ज्वारीचा भाजून हुरडा केला जातो. ज्वारी पूर्ण पिकल्यावर ज्वारीचे धान्य म्हणून वापरतात. तसेच भाजून लाह्या, कण्या व पिठाच्या भाकरी करून खाण्यासाठी वापरले जाते. याचे बी लघवीच्या आजारांवर उपयुक्त असते. तसेच हे एक कामोत्तेजक म्हणूनही कार्य करते. हे पिक जनावरांचे खाद्य म्हणूनही वापरले जाते. सोलापूर जिल्ह्याला ज्वारीचे कोठार म्हणतात. सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ज्वारीचे उत्पादन घेतले जाते.
ज्वारीपासून पापड्या ही बनवल्या जातात.

प्रकार

संपादन

ज्वारीचे अनेक प्रकार आहेत. त्यातील महाराष्ट्र राज्यात मोतीचूर, काळबोंडी, लालबोंडी, पिवळी हे उपप्ररकार लागवडीत आढळतात. यात 'हायब्रीड ज्वारी' हाही एक प्रकार आहे.
एका ठराविक प्रकारच्या ज्वारीच्या बुंध्यातून रस काढून काकवी केली जाते.

 
दगडी ज्वारी
 
दगडी ज्वारी
 
श्रीखंडी ज्वारी
 
टाळकी_ज्वारी
 
ज्वारीचे पीक

सुधारीत व संकरित जाती

संपादन

सुधारित सावनेर, सुधारित रामकेल, एन. जे. १३४, टेसपुरी, सातपानी, मालदांडी ३५–१ (सीएसएच क्र. ४)

ज्वारीवर कवकांचे प्रकार वाढतात. काणी, काजळी, तांबेरा, केवडा, अरगट आणि करपा हे कवकजन्य रोग पिकांना रोगग्रस्त करतात.[]

तसेच रुचिरा प्रकार प्रसिद्ध आहे.

संदर्भ

संपादन