हुरडा
हुरडा म्हणजे ज्वारीचे कोवळे दाणे. ज्वारीचे कणीस लागल्यावर परागीकरण झाल्यावर साधारण 3०ते 4० दिवसातील दाणे कोवळे समजले जातात. हे दाणे रंगाने हिरवे असतात तर आकाराने तयार ज्वारीच्या दाण्यापेक्षा थोडेसे मोठे असतात. ते रसदार असतात. हिवाळ्यात हुरड्याचा हंगाम सुरू होतो .[१]
हुरडा सेवन
संपादनज्वारीचे कणीस निखार्यावर किंवा शेकोटीत भाजून एकेक कणीस पोत्यावर चोळून हे दाणे कणसापासून वेगळे केले जातात. ते गरम गरम खाणे अपेक्षित असते. गार झाल्यावर हे दाणे कडक होतात. सर्वानी मिळून हुरडा खात भोजनाचा सामूहिक आनंद घेणे याला हुरडा पार्टी म्हणतात. त्या पार्टीत हुरडा मुख्य असतो. त्याशिवाय वांगे भाजी भाकरी दही असा मेनू असतो. हे जेवणातले पदार्थ स्थानिक प्रांत खाद्य संस्कृतीनुसार बदलतात.[२]
संदर्भ
संपादन- ^ "हुरडा विक्रीतून 'ही' 2 गावं 4 महिन्यात कोट्यवधी रुपये कशी कमावताहेत?". BBC News मराठी. 2023-01-24. 2024-11-26 रोजी पाहिले.
- ^ team, abp majha web (2023-12-11). "PHOTO: गुलाबी थंडी, अशात हुरडा पार्टी; आरोग्यासाठी होणार असे फायदे". marathi.abplive.com. 2024-11-26 रोजी पाहिले.