खानदेशी (अहिराणी) ही खानदेश प्रदेशात बोलली जाणारी हिंद-आर्य भाषा आहे. खान्देशी भाषा महाराष्ट्रातील उत्तरी भागात व गुजरात आणि मध्य प्रदेशातील काही भागांमधील बोलली जाते. खान्देशी भाषा देवनागरी लिपीत लिहिली जाते. खानदेशीचे दोन बोलीभाषा आहे — अहिराणी आणि डांगरी.

Look up अहिराणी बोलीभाषा in
Wiktionary, the free marathi dictionary.
अहिराणी बोलीभाषा ह्या बोलीभाषेची शब्दसूची
विक्शनरी, या मुक्त शब्दकोशात पाहा/तपासा/अद्याप नसलेले शब्द/वाक्यांश जोडा अथवा सूची:मराठी बोलीभाषातील शब्द येथे मराठी बोलीभाषांची सामायिक शब्दसूची पहा
खान्देशी
अहिराणी
प्रदेश महाराष्ट्र
गुजरात
मध्य प्रदेश
लोकसंख्या १८.६० लक्ष (२०११)
बोलीभाषा अहिराणी
डांगरी(डांगी)
गुजरी
भिलाऊ
भाषाकुळ
हिंद-युरोपीय
लिपी देवनागरी (प्रचलित)
गुजराती (प्रचलित)
मोडी लिपी (पुर्वीची)
भाषा संकेत
ISO ६३९-३ khn (खान्देशी)
ahr (अहिराणी)
भाषिक प्रदेशांचा नकाशा
  अहिराणी भाषेचा व्याप

अहिराणीचा उगम इ.स. २०० च्या आसपास झाला असावा व ती खान्देशातच जन्माला आली. चंद्रवंशीय यादव, गोप, यांची इ. स. पांच हजार वर्षापूर्वीची जुनी ईलावर्षी भाषा व आजची नवीन भाषा यांचा संगम होवून आजची अहिराणी भाषा तयार झाली आहे. अहिराणीचा युगारंभ वैभवशाली होता.

ज्यावेळी श्रीकृष्ण दख्खन बाजुला आले त्यांचे बरोबर आभिरही इकडे आले. हळूहळू काठेवाड, भडोच, सुरत, नवापूर या मार्गे खान्देशांत उतरले. हे व्हावयास सुमारे ५००० वर्षे लागलीत. अभिरसेनी उर्फ अभिराणी हीच अहिराणी भाषा होय.

अभिर (आभिर,अहिर) हे यदुवंशीय आर्य होत कारण ते कृष्णाची पूजा करीत. कन्हेर म्हणजेच कृष्ण व कानबाई म्हणजेच राधा आणि कानबाई कन्हेरचा कान्हदेशच - आजचा खान्देश. कानबाई, गौराई (कात्यायनी देवी), डोंगर देव (गोवर्धन पुजा) व बालदेव (भालदेव -कृष्ण बलराम) चे सण फक्त खान्देशातच साजरे केले जातात.

नावाची व्याप्ती

संपादन

जुन्या खानदेश परीसरात म्हणजे अजिंठ्याचे डोंगर, सातपुड्याचे डोंगर, चांदवडचे डोंगर आणि वाघूर नदी या खोल खाणी-खदाणीत वास्तव्यास असलेले अहिर लोक अहिराणी बोलत[१]. खानदेश परिसरातील अहिरांच्या वास्तव्यामुळे, सत्तेतील त्यांच्या प्राबल्यामुळे, त्या परिसरातील सर्वांच्या बोलीवर अहिराणी बोलीची छाप पडली. यातून खानदेशाचे सामाजिक आणि प्रादेशिक प्रभेद झाले आहेत. प्रदेशानुसार बागलाणी, नंदुरबारी, खाल्यांगी, वर्ल्यांगी, तप्तांगी, डोंगरांगी, जामनेरी हे बोलीभाषांतील प्रादेशिक प्रभेदांत, तर जातिवाचक बोली ह्या सामाजिक प्रभेदांत मोडतात. खानदेशातील सर्व जातींची बोली ही अहिराणीची छाप असणारी बोली आहे. या सामाजिक प्रभेदांत महाराऊ, भिलाऊ, लाड सिक्की, लेवापाटिदार, गुजरी, इत्यादी सामाजिक प्रभेदाच्या बोली आहेत. खानदेशात बोलली जाते ती खानदेशी, असे असल्याने खानदेशी ही संकल्पना अहिराणी ह्या संकल्पनेहून विशाल आहे.

जवळपास ९५% टक्के खानदेशी माणसे अहिराणी बोलतात. ती त्यांची बोलीभाषा आहे. जळगाव, धुळे, नंदुरबार, औरंगाबाद तथा नाशिक जिल्ह्याच्या काही भागात अहिराणी भाषा बोलतात. उत्तर महाराष्ट्राच्या अमळनेर, साक्री, इंदवे, पारोळा, दोंडाईचा, शिरपूर, तळोदा, शहादा, धडगाव, नवापूर, नंदुरबार, धुळे, जळगाव, अक्कलकुवा, सिंदखेडा, चोपडा, एरंडोल, चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा, बागलाण ह्या तालुक्यातील बहुतेक सर्व जाती जमातीची ती मायबोली भाषा आहे. गुजरातच्या सुरत, सोनगढ, व्यारा, उच्छल, निझर व मध्यप्रदेशच्या खेतिया, पानसेमल, सेंधवा आणि काही तालुक्यातही अहिराणी भाषा बोलतात.

साहित्य

संपादन

अहिराणी बोली, शब्दकोश, लोकसाहित्य आणि व्याकरण विषयक पुस्तके

संपादन
  • नि. रा. पाटील यांनी खानदेशी भाषेवर आधारित ‘लेवा गण बोली’ भाषेचा शब्दकोश तयार केला आहे.
  • अहिराणी शब्दकोश (अहिराणी- मराठी) (डॉ. रमेश सूर्यवंशी) : अहिराणी बोलीचा पहिला शब्दकोश.
  • " 'वऱ्हाडी' आणि 'अहिराणी' बोलींचा तौलनिक अभ्यास" डॉ. पुरुषोत्तम सदानंद तायडे
  • अहिराणी बोली सुलभ व्याकरण (डॉ. रमेश सुर्यवंशी)
  • खान्देशातील कृषक जीवन सचित्रकोश (डॉ. रमेश सुर्यवंशी)

अन्य पुस्तके

संपादन
  • अहिराणी : आंतरराष्ट्रीय भाषा (डाॅ. बापूराव देसाई)

हेही पाहा

संपादन

संदर्भ व नोंदी

संपादन
  1. ^ सूर्यवंशी,रमेश. अहिराणी बोली - भाषा वैज्ञानिक अभ्यास.