जळगाव जिल्ह्य़ाच्या पूर्व भागात आणि मलकापूर तालुक्यात सर्वत्र लेवा गणबोली बोलली जाते. तापी, पूर्णा, वाधुर आणि गिरणा या नद्यांच्या प्रदेशात शेतीव्यवसाय असलेल्या लेवा पाटीदार समाजाची वस्ती आहे. या व्यवसायात मदतनीस असणाऱ्या बारा बलुतेदारांनीही हीच बोली संपर्कभाषा म्हणून स्वीकारली आहे. म्हणूनच तिला ‘लेवा गणबोली’ असे संबोधले जाते. मात्र, जळगाव जिल्ह्य़ाच्या पूर्व भागात आणि मलकापूपर्यंतच्या परिसरात तावडी बोलली जाते, हा लेखकाचा जावईशोध धक्कादायक आहे. जळगाव जिल्ह्य़ातील उत्तर जामनेर, भुसावळ, जळगाव, रावेर, यावल, मुक्तानगर, तसेच मोताळा, मलकापूर, मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर, शहापूपर्यंतचा भूप्रदेश लेवा गणबोलीचा बालेकिल्ला आहे. तेथे तावडीचा काहीही संबंध नाही.

लेवा गणबोली ही समाजजीवनाशी एकरूप झालेली आहे. या भाषेला स्वतःचे सौष्ठव आहे. गोडवा आहे. शब्दांमध्ये नाद आहे, लय आहे. खास लहेजा आहे. तिला व्याकरण आहे. अशोक कोळी जिला तावडी समजतात, ती लेवा गणबोली आहे. लेवा गणबोली ही प्रामुख्याने पूर्व खानदेशात बोलली जाते. जळगाव,भुसावल ,यावल रावेर बऱ्हाणपूर ,जामनेर ,बोदवड,मुक्ताईनगर- सूर्यकन्या तापी खोऱ्यातील हा प्रदेश तावडी प्रदेश म्हणून ओळखला जातो .तेथील लोकांना लेवा पाटील लोक म्हणतात. ते लेवा गणबोली बोली बोलतात.

कोळी बांधव यांचे प्रामुख्याने संपूर्ण महाराष्ट्रात अशमयुगाच्या आधीपासून

उच्चार प्रक्रियेतील भाषिक काटकसरसंपादन करा

कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय व्यक्त करण्याकडे तावडी बोलीचा कल आहे. जसे आल्ता(आला होता), गेल्ता (गेला होता), कुठलोंग (कुठपर्यंत), काव्हाचा (केव्हापासूनचा), तढ़लोंग (तिथपर्यंत), आढ़लोंग (इथपर्यंत), पहाल्ता (पाहिला होता), राहल्ता (राहिला होता), झाल्ता (झाला होता) इत्यादी.

लेवा गणबोलीतील वैशिष्ट्यपूर्ण सर्वनामेसंपादन करा

भो (भाऊ), बीन (बहिण), बायजा (आत्या), बोय (आजी), म्हतारा (बाप), म्हतारी (आई), जेठाणी (मोठी जाऊ), देराणी (लहान जाऊ), चांबल्डी (आजी), डोबल्डा (आजोबा), बी (सुद्धा), जो (जवळ), न् (आणि), तूं (तर), मीन्हं (मी), तुन्हं (तू), महे (माझे), तुहे (तुझे) इत्यादी. या भाषेला गढरी भाषा म्हणतात. तावडी ही भाषा अस्तीतावत नाही आहे खान्देश मध्ये तिला अहिराणी भाषा बोलली जाते.

संपादन करा


कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.