देवनागरी

भारताची प्रमुख लिपी
(देवनागरी लिपी या पानावरून पुनर्निर्देशित)

देवनागरी लिपी ही बऱ्याच भारतीय भाषांची प्रमुख लेखन पद्धती आहे. मराठी, भोजपुरी, कोकणी, संस्कृत, पाली, सिंधी, काश्मिरी, नेपाळी, बोडो, अंगिका, मैथिली, रोमानी, हिंदी ,बंजारा भाषा इत्यादी भाषा देवनागरीत लिहिल्या जातात. देवनागरी लिपी एकंदरीत देशातल्या व देशाबाहेरच्या एकूण १९४ भाषांसाठी वापरली जाते.[]

देवनागरी लिपीचा जाहिरातीत वापर - मेलबर्न ऑस्ट्रेलिया येथे
परळ, मुंबई येथे जुन्या लिपीत आढळलेला शिलालेख. हा इ.स. ११०९ मध्ये कोरला गेला आहे.

देवनागरीची ओळख

संपादन

मराठी, संस्कृत, हिंदी, कोंकणी, गुजराती, काश्मिरी, सिंधी, नेपाळी आणि रोमानीसारख्या या व इतर काही भारतीय मुळे असलेल्या भाषांची प्रथम लिपी ही देवनागरी आहे. देवनागरी लिपी ही अबुगिडा लेखनपद्धतीमध्ये मोडते. जगातल्या बहुसंख्य लिपींप्रमणे देवनागरीदेखील डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. देवनागरी लिपीचा विकसनकाल हा बराच मोठा असून ह्या लिपीचा ख्रिस्तपूर्व ५०० मध्ये असलेल्या ब्राह्मी लिपीपासून आताची देवनागरी लिपीचा विकास झालेला आहे. साधारणत: इसवी सनाच्या बाराव्या शतकात स्थिरावलेल्या लेखनपद्धतीस देवनागरी असे नांव उपयोजिण्यास आरंभ झाला असावा. प्रत्येक शब्दावर एक रेषा ओढली जाते. तिला शिरोरेषा म्हणतात. तिच्यामुळे लेखन नीटनेटके व सुंदर दिसते. ही एक ध्वन्यात्मक लिपी आहे व त्यामुळे इतर लिप्यांपेक्षा (रोमन, अरबी, चिनी इत्यादी) अधिक वैज्ञानिक आहे. मराठी देवनागरी लिपीला बालबोध लिपी म्हणतात. (बालबोध नसलेली दुसरी मराठी लिपी म्हणजे मोडी लिपी.)

 
मराठी लेखक व कवी दासोपंत यांचे सुमारे १५व्या शतकातील लिहिलेले मराठी.
जगातील विविध भाषांतील बहुतांश शब्द किंवा ध्वनी देवनागरी लिपीमध्ये जवळजवळ जसेच्या तसे लिहिता येऊ शकतात आणि रोमन किंवा इतर लिप्यांपेक्षा देवनागरीत सहज लिहिलेल्या शब्दांचा तुलनात्मकदृष्ट्या हुबेहूब उच्चार करता येतो.

या लिपीत एकूण ५२ अक्षरे आहेत, ज्यात १६ स्वर आणि ३६ व्यंजने आहेत. अक्षरांचा क्रमसुद्धा वैज्ञानिक आहे. स्वर-व्यंजन, कोमल-कठोर, अल्पप्राण-महाप्राण, अनुनासिक-अन्तस्थ-उष्म इत्यादी वर्गीकरणही वैज्ञानिक आहे.

भारत तसेच आशिया मधील अनेक लिप्यांचे (उर्दू सोडून) संकेत देवनागरीपेक्षा वेगळे आहेत. पण उच्चारण व वर्ण-क्रम इत्यादी देवनागरीसारखेच आहेत. त्यामुळे लिप्यंतरण करणे सोपे जाते. देवनागरी लेखनाच्या दृष्टीने सरळ, सुंदर आणि वाचनाच्या दृष्टीने सुपाठ्य आहे.

 
मुंबईतील बेस्ट बसच्या तिकीटावरील देवनागरीचा वापर
 
रामदास स्वामी यांचे इ.स १६०० शतकातले देवनागरी हस्ताक्षर.

देवनागरी : नावाचा अर्थ

संपादन
देवलोक आणि नागरलोक या संबंधी विविध प्रकारच्या लेखनासाठी उपयोजिली जाणारी लिपी, ती देवनागरी लिपी होय.

भाषा आणि लिपी

संपादन

आपले विचार शब्दांच्या किंवा कोणत्याही माध्यमातुन व्यक्त करण्याचे कार्य भाषा करते. तत्त्व: कुठलीही भाषा कोणत्याही लिपीत लिहिता येते. प्रत्यक्षात हे बरेचसे जमले तरी पूर्णपणे शक्य होत नाही. भाषेची लिपी त्या त्या भाषेतून उच्चारलेल्या शब्दांच्या लिखाणासाठी असते. एखाद्या भाषेत जर विशिष्ट उच्चार नसतील तर तिच्या लिपीतही ते दाखवणाऱ्या अक्षरखुणा नसतात. इंग्रजीत ख, च, छ, ठ, फ, घ, ढ, भ, ष, ळ हे उच्चार नाहीत. तमिळमध्ये ख, ग, घ, छ, ज, झ, ठ, ड, ढ, थ, द, ध, फ, ब, भ, श, स, ह ही अक्षरे लिहिता येत नाहीत, पण यांच्यापैकी काही उच्चार आहेत. त्यामुळे लिप्यंतरावर मर्यादा पडतात. उदाहरणार्थ मराठीतला 'पाटील" हा शब्द रोमन लिपीत Patil असा लिहिला जातो. त्याचा उच्चार पतिल/पतिळ/पॅतिल/पॅतिळ/पातिल/पातिळ/पाटिळ असा काहीही होऊ शकतो. देवनागरी लिपीत जगातल्या बहुसंख्य भाषांचे बहुतेक उच्चार जवळजवळ अचूक लिहिण्याची क्षमता असल्याने, तुलनात्मक दृष्ट्या या दृष्टिकोणातून देवनागरी ही एक उत्कृष्ट लिपी समजली जाते.

मराठीमध्ये वापरला जाणारा संगणक हा शब्द देवनागरी लिपीत `संगणक' असा तर रोमन लिपीत 'sanganaka' असा लिहितात. तसेच त्याला इंग्लिश भाषेतला समानार्थी शब्द computer हा देवनागरीतून कम्प्यूटर किंवा कॉम्प्यूटर असा लिहिला आणि यशस्वीरीत्या वाचलाही जाऊ शकतो.

मराठी देवनागरीतले स्वर

संपादन

अ आ इ ई उ ऊ ऋ ॠ ऌ ॡ ए ऐ ओ औ अं अः ॲ ॲा

देवनागरीतील काना-मात्रा चिन्हे

संपादन

ा ि ी ु ू ृ ॄ ॢ ॣ े ै ो ौ ं ः ॅ ॉ ॅं ् र्‍

देवनागरी व्यंजने

संपादन
  • क ख ग घ ङ
  • च छ ज झ ञ
  • ट ठ ड ढ ण
  • त थ द ध न
  • प फ ब भ म
  • य र ल व श
  • ष स ह त्र ज्ञ क्ष ळ

देवनागरी अंक

संपादन

० १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९

मूळ लेख : युनिकोड
देवनागरी युनिकोड 0 1 2 3 4 5 6 7 8 9 A B C D E F
U+090x
U+091x
U+092x
U+093x ि
U+094x
U+095x
U+096x
U+097x ॿ



Unicode Chart for Devanagari

संगणक-मराठी संबंधाविषयी

संपादन
  • संगणकाचा वापर इंग्लिश भाषेतून किंवा अधिक अचूक सांगावयाचे झाल्यास रोमन लिपीतून सुरू झाला आणि नंतर जगभर पसरला. आजमितीला तरी जगाची ज्ञानभाषा आणि संपर्कभाषा म्हणून इंग्रजी भाषेला महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे अनेक महत्त्वाच्या तंत्रज्ञानांचा शोध आणि प्रगती इंग्लिश भाषेतून झाली. यात संगणकाचा देखील समावेश होतो. संगणकाशी निगडित प्रगती झपाट्याने होण्यामागचे एक महत्त्वाचे पण अप्रत्यक्ष कारण रोमन लिपी हे देखील आहे. ही बाब संगणक अभियंत्याना सहज समजेल. यासंबधीची अधिक माहिती संगणक टंक हा लेख देईल. या बाबीचा अप्रत्यक्ष फायदा जर्मनी, स्पेन, रशिया वगैरे देशांना (किंवा त्यांच्या भाषांना वा लिप्यांना) झाला.
  • युनिकोडचा वापर करून संगणकावर मराठी वापरता येते.
  • संगणक आणि मराठी या लेखात संगणकावरील मराठीचा इतिहास तसेच भविष्य याची माहिती मिळू शकेल.
  • महाजाल आणि मराठी या लेखात महाजालावरील मराठीचा इतिहास तसेच भविष्य याची माहिती मिळू शकेल.

हार्दिक देवनागरी युनिकोड कसे वापरावे?

संपादन

Windows 10 या ऑपरेटिंग सिस्टिममध्ये सर्व भारतीय भाषांसाठी पहिल्यापासून कळफलक उपलब्ध असतो. त्याचा वापर कसा करायचा याबद्दलची माहिती पुढीलप्रमाणे.
१. सर्वप्रथम संगणकावर Control Panel मध्ये जाऊन Region यावर टिकटिकवतात.
२. Regionची एक चौकट उघडेल. त्या चौकटीतील Fromat या मथळ्याखालील Language Preferences या दुव्यावर टिकटिकवतात.
३. Language Preferencesच्या चौकटीमध्ये Preferred Languageच्या अंर्तगत असणाऱ्या Add a preferred languageच्या अधिक+ या चिन्हावर टिचकी मारतात..
४. नवीन उघडलेल्या चौकटीतील शोधा या चौकटीत हवी असणारी देवनागरी भाषा (उदा. संस्कृत,मराठी, कोकणी, हिंदी) शोधतात व त्यावर टिकटिकवून Next या बटनावर टिकटिकवतात.
५. त्यानंतर शोधलेली भाषा Install या बटनावर टिकटिकवून आपल्या संगणकावर उतरावून घेता येते..
६. संगणकावर Alt+ Shift कळ दाबून हवी असलेली भाषा निवडता येते, किंवा संगणकाच्या स्क्रीनवर उजव्या बाजूस खाली किंवा वर असणाऱ्या भाषेच्या चिन्हावर टिकटिकवून हवी असलेली भाषा निवडता येते.

देवनागरी लिपी वैशिष्ट्ये आणि इतिहास

संपादन
  • नेहमी देवनागरी डावीकडून उजवीकडे वाचता येते तसेच लिहीता येते.
  • बहुतेक ध्वनींकरिता एक स्वतंत्र वर्ण/ अक्षरचिन्ह /जोडाक्षर वापरले जाते.
  • ध्वनी

देवनागरी अनुदेशन(सॉफ्टवेर)

संपादन
  • बॉस ऑपरेटिंग सिस्टिम आणि आग ऑपरेटिंग सिस्टिम या भारतीय संचालन प्रणाली मराठी भाषेतून आहेत.
  • 'थंडरबर्ड' हे ईमेल सॉफ्टवेर मराठीतून ईमेल पाठवण्यासाठी तसेच आलेले मराठी ईमेल वाचण्यासाठी उपयुक्त आहे. हे सॉफ्टवेर मोझीला.ऑर्ग ह्या संकेतस्थळावरून डाउनलोड करता येईल.
  • वॉशिंग्टन विद्यापीठाकडून मिळालेल्या देवनागरीसाठी कळफलकाच्या (कीबोर्ड) जुळणीचे (मॅपिंग) सॉफ्टवेर उपलब्ध आहे. या जुळणीचा वापर करून युनिकोडमध्ये शब्दरचना करू शकणाऱ्या वर्डपॅडवर लिहिलेला मजकूर विकिपीडियामध्ये कॉपी - पेस्ट करता येतो.
  • अक्षरमाला सॉफ्टवेर अक्षरमाला वापरून विकिपीडियाची पाने बदलता येतात, नाहीतर आय् ट्रान्स् या सॉफ्टवेरचाही वापर करता येऊ शकतो.
  • याशिवाय युडिट एडिटरही वापरता येऊ शकतो.
  • बरहा येथे उपलब्ध असलेल्या देवनागरी सॉफ्टवेरचाही वापर करता येतो. (बरहा फुकट नाही!)
  • देवनागरी लिपीत लिहिण्यासाठी तख़्ती या सॉफ्टवेरचाही वापर करता येतो.

पुस्तके

संपादन
  • देवनागरी लिपी : चिन्हाची शास्त्रीय ओळख आणि आरेखन भाषा लेखक मुकुंद गोखले.
  • भारतीय लिप्यांचे मौलिक एकरूप, (मोडक आवृत्ती), महाराष्ट्र­ राज्य साहित्य संस्कृती मंडळ गणपतीशास्त्री हेब्बार.

हे सुद्धा पहा

संपादन
  • देवनागरी सुलेखन कित्ता (लेखक अच्युत पालव, प्रकाशक ऊर्जा)

बाह्य दुवे

संपादन
  1. ^ "भाषावाहिनी देवनागरी". www.evivek.com. 2019-10-12 रोजी पाहिले.