ब्राह्मी
भाषिक नावे:
- मराठी- ब्राम्ही, कारिवणा,
- हिंदी- ब्रम्हमाण्डुकी, ब्राम्हीभेद, ब्रम्हो, ब्रम्ही,
- गुजराती- ब्राम्हो, खडब्राम्ही, ब्राम्ही,
- इंग्रजी- इंडियन पेनीवर्ट
- संस्कृत नावः मण्डुकपर्णी, माण्डुकी
- लॅटिन नावः Centella asiatica, Hydrocotyle asiatica
- कूळः Apiaceae, Umbelliferae
लागवड
संपादन- ब्राम्ही पसरत वाढते.
- ज्या भागात ऊन असेल तिथे ब्राम्ही लावतात.
- संपूर्ण वाफा थोडेच दिवसात हिरवा गार दिसतो.
- ब्राम्हीच्या झाडाला भरपूर पाणी लागते.
- ब्राम्हीची पाने किडनीच्या आकाराची, हृदयाकृती असतात.
उपयोग
संपादन- याचा जत्रुवर (मानेच्या वरील रोग) फारच उपयोग होतो.
- मेंदुला शांत ठेवायचे कार्य ब्राम्ही कडून फार चांगल्या तऱ्हेने होते.
- ब्राम्ही मेंदुसाठी पुष्टीदायक आहे.डोक्यास लावावयाचे तेलात याचा वापर करतात.
- केंसांच्या वाढीसाठी ब्राम्हीचा उपयोग होतो.पानांचा रस तेलात घालून लावल्यास** केसांना चमक येते, केस वाढतात.
- स्मरणशक्ती सुधारण्यासाठी रोज पाच-सहा पाने खावीत. अपस्मार, फिट्स येणे किंवा झोप येत नसेल तर ब्राम्हीची पाने किंवा रस घ्यावा.